नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग १

नदी एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी,उपनदी सहाय्यक नदी या सर्वांचा एक वाहण्याचा क्रम असतो. या क्रमालाच नदी प्रणाली असे म्हणतात.
०१. प्रारंभावस्था (सुरुवातवस्था) (Intantion stage)
कोणत्याही प्रदेशात लहान ओव्होळच्या स्वरुपात
०२. लांबीतवाड अवस्था (Elongation stage)
या ओव्होळीचे रुपांतर लहान नदी मध्ये होण्यास सुरवात होते.नदीच्या दोन्ही बाजूवरुन उपनद्या येऊन मिळतात.
०३. शाखावृद्धी अवस्था (Elaboration)
उपनद्यांना सहाय्यक नद्या येऊन मिळतात.
०४. विस्तारवाढ अवस्था (Extension stage)
मुख्य नद्या व उपनद्या यांचा उगमाकडे विस्तार होत जातो.
०५. सामिलीकरण अवस्था (Integration stage)
नद्या, उपनद्या व सहाय्यक नद्या या सर्वांमुळे जलप्रवाहाचे जाळे निर्माण होते.

नदीप्रणालीचे प्रकार.

नद्यांच्या विकासानुसार व भूपृष्ठाच्या रचनेनुसार,
०१. स्वभावोदभूत नदीप्रणाली
०२. अस्वभावोदभूत नदीप्रणाली

स्वाभावोदभूत नदीप्रणाली

एखाद्या प्रदेशातील नद्यांच्या वाहण्याचा क्रम भूपृष्ठाच्या उताराला व खडकरचनेला अनुसरून ही नदीप्रणाली असलेल्या प्रदेशावरून वाहणाऱ्या नद्यांचे तीन प्रकार पडतात.
०१. स्वाभावोदभूत मूळ नदीउताराला अनुसरून राहणारी मुख्य नदी
०२. अंतरोदभूत नदीमुख्य नदीला दोन्ही बाजूंना उपनद्या येऊन मिळत असतील तर त्याला मुख्य नदीला समकोनात येतात.
०३. साहाय्यक नद्याअंतरोदभूत नद्यांचा विकास झाल्यानंतर या नद्यांना दोन्हीकडून लहान लहान नद्या येऊन भेटतात.

  • प्रतिकूल उपजलधारा :- मुख्य धारेच्या विरुद्ध बाजूने वाहत येतात. हे मुख्य नदीच्या दिशांना अगदी विरुद्ध असतात.
  • अनुकुल उपजलप्रवाह :- मुख्य नदीच्या वाहण्याच्या दिशेला अनुसरून.

अस्वभावोदभूत नदीप्रणाली उतार व खडकाला अनुसरून नदीच्या वाहण्याचा क्रम नसतो.
या नदीप्रणालीचे प्रकार :-

  • पुर्वोत्पन्न नदीप्रणाली :– अंतर्गत हालचालीमुळे उतार जरी वेगळा झाला तरी पूर्वीच्याच मार्गाने वाहते. उदा. सिंधू नदी (भारत) अरुण नदी (नेपाळ), पूर्ववर्ती नदी
  • पूर्वरोपीत नदीप्रणाली :- प्रवाहातील खडकाचा कल आणि प्रकार जरी प्रवाहा विरुद्ध दिशेने असले. भारताच्या रेवा पठारावरून वाहणाऱ्या सोन नदीची प्रवाह प्रणाली. उत्तर अमेरिकेतील कोलोरंडो प्रणाली. पाश्चिम इंग्लंडमधील लेक डिस्ट्रीक्ट मधील नदी प्रणाली. पश्चिम युरोप मधील म्युस नदी प्रणाली.
नदीप्रणालीचे प्रारूप प्रकार
०१. वृक्षाकार नदीप्रणाली
उदा.एकाच प्रकारच्या व समान घनता असलेल्या खडक प्रकारच्या प्रदेशां मध्ये वृक्षाकार नदीप्रणाली तयार होते.
पादपानुरूप नदीप्रणालीशाखाकृती निस्सार प्रणालीउदा. गंगा व गोदावरी नदीप्रणाली.

०२. आयताकृती नदीप्रणाली
भ्रंश आणि जोडांना अनुसरून ही नदीप्रणाली निर्माण होते.
उदा. भारतातील कावेरी नदी,मध्यप्रदेशातील नर्मदा नदी, कृष्णा नदी, दामोदर नदी (प.बंगाल)
०३. जाळीदार नदीप्रणाली
मंद उतार खडकाची घनता कमीअधिकमंद उतारावरती मृदू आणि कठीण खडक
उदा.आप्लेशियन पर्वतातील नदीप्रणाली.
०४. केंद्रत्यागी प्रवाह प्रणाली
घुमटाकार प्रदेशात चार हे बाजूने नद्या
उदा. कच्छ व मेघालय पठार,फांस केंद्रीय पठार,श्रीलंका मध्यवर्ती
०५. केंद्रगामी
सभोवतालचा प्रदेश उंच चारही बाजूने पर्वत सभोवतालच्या उंच भागातून मध्य खोलगट भागात सर्व नद्या एकत्र येतात.
सांबर सरोवर व लडाख पठारकॅस्पियन व मृत समुद्र.
०६. वलयी प्रवाह प्रणाली प्रारूप
वली पर्वतीय प्रदेशात आढळतात.
उदा.USA मधील BLOCK HILLS &HENRY पर्वतीय नदी प्रणाली
०७. समांतर नदी प्रणाली प्रारूप
उदा.भारतातील सुरमा नदी.
मणिपूर मिझोराम व त्रिपुरा या भागात सुद्धा नदीप्रणाली
८. अनियमित निस्सार नदी प्रणाली.
उदा. फिनलंड मधील अनेक लहान मोठी सरोवरातील विखुरीत नदी प्रणाली.
०९. भूमिगत नदी प्रणाली प्रारूप
चुनखडीच्या प्रदेशात युगोस्लाव्हियातील कास्ट प्रदेश.
१०. विक्षेपात्मक नदी प्रणाली प्रारूप
प्रवाह बाहेर जाऊन परत मध्ये येतो.
हिमालयाच्या पायथ्याशी भांबर.
११. अंडाकृती नदी प्रणाली प्रारूप
पर्वतीय प्रदेशात नदीचौर्य प्रकार जेथे होते तेथे अंडाकृती भाग तयार होतो.
उदा.कोयना नदी प्रवाहमार्ग
डेव्हिसचे त्रिकुटप्रत्येक भूरूप हे तेथील भूरचना प्रक्रिया आणि कालावस्था यांच्या परिणामातून घडत असते.

डेव्हीसच्या अवस्था

०१. युवावस्था
V आकार दरी, घळई, धबधबे उंच व रुंद जलविभाजक निदरी
०२. प्रौढावस्था 
नागमोडी वळणे, कुंडल सरोवर, पुरमैदाने, पुरतर, पंख्याच्या आकाराची मैदाने
०३. वृद्धअवस्था
त्रिभुज प्रदेश, समतलप्राय मैदाने, दलदल.

नदीचे पुनरूज्जीवन (नवोन्मेर)

कारणे
०१. भूगर्भअंतर्गत हालचाली
०२. समुद्राच्या पाण्याची पातळी बदलणे
०३. हवामान हा घटक

निर्माण होणारी भूरूपे

०१. निक पोइंट (nick point )खाचबिंदू नवीन निर्माण झालेली नदी जुन्या नदीला पत्राला जेथे भेटते त्याला nick point म्हणतात.
उदा. सहयाद्रीतून जाणाऱ्या कोकण नद्या.
०२. संयुक्त दऱ्या पाण्याच्या पातळीमध्ये बदल झाल्याने अशा प्रकरच्या संयुक्त दऱ्या तयार होतात.
०३. नदीवेदिका (नदीतटमंच /नदी पायऱ्या )नदीपात्रात पायऱ्या तयार होतात एक पायरी म्हणजे एक क्षरणचक्र
०४. कर्लित नागमोडी वळणे (निवृत्त वळणे) (निबंधित नागमोडी वळणे)नागमोडी वळणात नागमोडी वळणे निर्माण होणे. 

०५. उत्थापित समतलप्राय मैदाने पाण्याची पातळी खाली गेल्याने भाग वर असल्यासारखाच दिसतो.