आयआयटीची ३४ व्या स्थानावर झेप
आशियातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेने ३४ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी मुंबई आयआयटी ३५ व्या स्थानावर होती.

क्वाक्वरेली सिमोण्ड्‌स (क्‍यूएस) या ब्रिटिश कंपनीकडून आशियातील विद्यापीठांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये आयआयटीच्या कामातील प्रगतीवरून २०१७ मध्ये संस्थेला ३४ वे स्थान देण्यात आले. क्‍यूएसने सोमवारी ही क्रमवारी जाहीर केली. 


क्‍यूएसने दिलेल्या गुणांमध्ये आयआयटीला १०० पैकी ७५ गुण मिळाले. शैक्षणिक, रोजगार, पीएच.डी. कर्मचारी आदी निकषांमध्ये आयआयटीला चांगले गुण मिळाले. मानांकनात वाढ झाल्याने आयआयटीचे संचालक प्रा. देवांग खाकर यांनी आभार व्यक्त केले. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमुळेच मानांकन वाढल्याचे डॉ. खाकर यांनी सांगितले.

यंदा जूनमध्ये क्‍यूएस जागतिक विद्यापीठाचे मानांकन जाहीर केले होते. यामध्ये आयआयटीला वाढ मिळाली होती. आयआयटीचे जागतिक विद्यापीठाच्या मानांकनामध्ये ४० व्या स्थानाने वाढ होत ते १७९ वर आले होते



दिल्लीमधील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2017 रोजी नवी दिल्‍लीमधील ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्‍था (AIIA)’ राष्ट्राला समर्पित केली.

AIIA आयुर्वेदाचे पारंपरिक ज्ञान आणि निदानासाठी आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञान यांच्यात सांगड घालण्याकरिता आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेली एक शीर्ष संस्था असेल.

AIIA 10.015 एकर परिसरात उभारण्यात आले असून यासाठी पहिल्या टप्प्यात 157 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येथे NABH मान्यताप्राप्त रुग्णालय आणि शैक्षणिक विभाग आहेत. 

येथे पॅथोलॉंजी, जैवरसायन, सूक्ष्मजीव आणि रेडियोलॉंगी प्रयोगशाळा तयार केल्या गेल्या आहेत. येथे शैक्षणिक सत्र 2016-17 पासून MD/MS अभ्यासक्रम आणि सत्र 2017-18 पासून PhD अभ्यासक्रम शिक्षण दिले जात आहे.



‘आय एम दॅट वुमन’ या ऑनलाइन मोहिमेचा शुभारंभ
17 ऑक्टोबर 2017 रोजी महिला व बालविकास मंत्रालयाने ‘आय एम दॅट वुमन’ नावाने एक ऑनलाइन मोहिमेचा शुभारंभ केला.

मोहिमेच्या माध्यमातून मंत्रालय महिलांच्या मदतीला तयार असलेल्या महिलांसंबंधित विविध पैलूंवर प्रकाश टाकू इच्छित आहे. ट्वीटर आणि फेसबुक या व्यासपीठावर महिलांकडून महिलेला केल्या जाणार्‍या मदतीची कथा ऑनलाइन सामायिक करण्याकरिता प्रोत्साहित केले जात आहे.



सुदानमधील सेवेतील 50 भारतीय शांतीरक्षक UN पदकाने सन्मानित
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती मोहीमेंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात असलेल्या 50 भारतीय शांतीरक्षकांना संयुक्त राष्ट्रसंघाचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

नागरिकांना संरक्षण देण्यासाठी आणि संघर्षग्रस्त देशांमध्ये टिकाऊ शांतता प्रस्थापित करण्यासाठी या शांतीरक्षकांच्या व्यावसायिकता आणि सेवांसाठी हे पदक दिले गेले. संयुक्त राष्ट्रसंघ दक्षिण सुदान मोहीम (UNMISS) अंतर्गत हे रक्षक दक्षिण सुदानच्या जोंगले प्रदेशात बोर येथील छावणीत भारतीय तुकडी बरोबर तैनात आहे.

1948 साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघ शांती (UN peacekeeping) चे नेतृत्व डिपार्टमेंट ऑफ पीसकिपिंग ऑपरेशन्स (DPKO) हा विभाग करतो आणि यामधून संघर्षग्रस्त देशामध्ये दीर्घकाळ शांततेसाठी परिस्थिती निर्माण करण्यासाठी कार्य केले जाते. 

मोहिमेमधील शांतीरक्षकांमध्ये (ब्ल्यू बेरेट किंवा ब्लू हेलमेट) सैनिक, पोलीस अधिकारी आणि नागरिक यांचा समावेश असतो. UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी आणि अधिकार दिला आहे.


भारतीय वंशाचे अजय राजू यांना ‘अमेरिकन बजार फिलॅनथ्रोपी’ पुरस्कार मिळाला
प्रख्यात भारतीय वंशाचे अमेरिकावासी वकील अजय राजू यांना अमेरिकेत त्यांच्या कल्याणकारी कामांसाठी ‘अमेरिकन बजार फिलॅनथ्रोपी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

‘द अमेरिकन बजार’ ही एक ऑनलाइन पारंपारीक बातमीपत्र प्रकाशक कंपनी आहे. यापूर्वी हा पुरस्कार फ्रॅंक इस्लाम आणि सुरी सेहगल भारतीय वंशाच्या समाजसेवकांना मिळालेला आहे.



UN मानवाधिकार परिषदेच्या निवडणुकीत 15 देश निवडून आलेत
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेत (UNHRC) सेवा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने गुप्त मतदानातून 15 सदस्य देशांची निवड केली आहे.

यात भारताची शेजारी राष्ट्रे पाकिस्तान, अफगानिस्तान आणि नेपाळ या देशांचाही समावेश आहे. इतर 12 देशांमध्ये अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिली, कांगो प्रजासत्ताक, मेक्सिको, नायजेरिया, पेरु, कतार, सेनेगल, स्लोवाकिया, स्पेन आणि यूक्रेन यांचा समावेश आहे. 

यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2018 पासून सुरू होणार आणि ते तीन वर्षांसाठी सेवा देतील.

परिषदेत 15 जागांमध्ये आफ्रिकेमधील राष्ट्रांसाठी 4 जागा, आशिया-प्रशांत महासागर प्रदेशातील राष्ट्रांसाठी 4 जागा, लॅटिन अमेरिका व कॅरिबियन राष्ट्रांसाठी 3 जागा, पूर्व युरोपीय राष्ट्रांसाठी 2 जागा आणि पश्चिम युरोपीय व इतर राष्ट्रांसाठी 2 जागा याप्रमाणे निवास झाली आहे.

2006 साली स्थापित 47 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद (UNHRC) ही जगभरातील मानवाधिकारांचे रक्षण करण्याकरिता आणि त्यांच्या प्रसारासंबंधित बाबींसाठी कार्य करणारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या यंत्रणेमधील सर्वोच्च आंतरसरकारी संस्था आहे. याचे मुख्यालय स्वीत्झर्लंडच्या जिनेव्हा येथे आहे. 



जगातल्या सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीत जयपुर आणि श्रीनगर यांचा समावेश 
जयपुर विमानतळाला वार्षिक 2-5 दशलक्ष प्रवासी हाताळणार्‍या विमानतळांच्या श्रेणीत जागतिक स्तरावर पहिला तर श्रीनगरला दूसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेकडून (ACI) केलेल्या वार्षिक ACI-ASQ सर्वेक्षणानंतर हे क्रमांक जाहीर करण्यात आले. जयपुर विमानतळाला या श्रेणीत पहिले स्थान मिळण्याचे सलग दुसरे वर्ष आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद (Airport Council International -ACI) – ACI विमानसेवा गुणवत्तेच्या आधारावर दरवर्षी जगभरातील विमानतळांना रॅंकिंग प्रदान करते. ACI 84 देशांमधील विमानतळांचे सर्वेक्षण करतात आणि सर्वेक्षणात 34 मुख्य निर्देशकांचे मूल्यांकन केले जाते



भारत-रशियादरम्यान संयुक्त सराव
भारत आणि रशियादरम्यान तिन्ही सेनादलांच्या संयुक्त सरावामध्ये भाग घेण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस कडमट या युद्धनौका रशियामध्ये पोचल्या आहेत.

काल भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे जवान येथे दाखल झाले. ‘इंद्र- 2017’ या नावाने होणारा हा सराव सुरु होत आहे. आतापर्यंत या सरावात आलटून पालटून केवळ एकच सेनादल समाविष्ट होत असे. यंदा प्रथमच तिन्ही सेनादले एकाच वेळी सहभाग घेत आहेत