मुंबई विमानतळाचा विश्‍वविक्रमचोवीस तासांत 969 विमानांचे टेकऑफ आणि लॅंडिंग करण्याचा विश्‍वविक्रम मुंबई विमातळाने केला आहे. या विमानतळाने आपलाच 935 विमानांच्या टेकऑफ आणि लॅंडिंगचा विक्रम मोडीत काढला. आता 24 तासांत एक हजार विमानांचे लॅंडिंग आणि टेकऑफ करण्याचे विमानतळ प्राधिकरणाचे ध्येय आहे. 


मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेदत असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे एकच धावपट्टी वापरली जाते. 

मात्र या आव्हानाशी दोन हात करत मुंबई विमानतळाने 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 ते 25 नोव्हेंबर पहाटे 5.30 या 24 तासांत हा विश्‍वविक्रम केला. या कालावधीत तासाला सरासरी 50 विमाने झेपावली आणि उतरली.



‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव-2017’ चा शुभारंभ
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर 2017 रोजी हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये दुसर्‍या ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव-2017’ चा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन हरियाणा आणि उत्तरप्रदेश राज्य शासन तसेच मॉरीशस यांच्या सहकार्याने केले गेले आहे. हा महोत्सव 3 डिसेंबर 2017 पर्यंत चालणार आहे.

‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ पहिल्यांदा डिसेंबर 2016 मध्ये हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये आयोजित करण्यात आला होता. 



राष्ट्रीय विधी दिवस 26 नोव्हेंबर
भारतीय स्वातंत्र्याची एक महत्त्वाची घटना म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस वर्ष 2015 पासून राष्ट्रीय विधी दिवस (संविधान दिवस/राज्यघटना दिवस) म्हणून साजरा केला जात आहे.

या दिवसाच्या निमित्ताने, नवी दिल्लीत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर 2017 रोजी दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना सभेकडून भारताचे संविधान अंगिकारले गेले, जे 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले. संविधानानुसार भारत कायद्यात निर्दिष्ट नियमांच्या हद्दीत कामकाज करणारा शासित देश ठरलेला आहे.

भारतात संविधानाची अंमलबजावणी दोन घटकांमधून केली जाते. पहिले राजकारणी द्वारे चालवली जाणारी सभागृहे आणि दुसरे म्हणजे कायदा न्यायप्रणाली (भारतीय न्यायालये).

भारतीय संविधानात सध्या 25 खंड मध्ये 448 कलमे, 12 अनुसूची आणि 5 परिशिष्ट आहेत. 
संविधानाचे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत हस्तलिखीत आहे. प्रेम बिहारी नाराइन राईजदा यांच्या सुंदर हस्ताक्षराने लिहिले गेले आणि त्यामधील कलाकृती नंदलाल बोस आणि इतर कलाकार यांच्याकडून केली गेली.



जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताला 5 सुवर्णपदक
आसामच्या गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या ‘AIBA जागतिक युवा महिला मुष्टियुद्ध स्पर्धा 2017’ मध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण व दोन कांस्य अशी एकंदर 7 पदके पटकावली.

नीतू (48 किलो), ज्योती गुलीया (51 किलो), साक्षी चौधरी (54 किलो), शशी चोप्रा (57 किलो) आणि अंकुशिता बोरो (64 किलो) या खेळाडूंनी भारताला सुवर्ण मिळवून दिले. शिवाय अंकुशिता बोरो हिला स्पर्धेतली सर्वोत्तम मुष्टियुद्धपटू म्हणून गौरवण्यात आले. हे आत्तापर्यंतचे भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

आंतरराष्ट्रीय आर्मेचर मुष्टियुद्ध संघटना (AIBA) हे मुष्टियुद्ध क्रीडाप्रकाराचे जागतिक महासंघ आहे. याची स्थापना 1946 साली झाली. याचे मुख्यालय लॉंसन, स्वीत्झर्लंड येथे आहे. 



चीनमध्ये 7 वे ‘लष्कर जागतिक खेळ’ होणार
जगभरातील लष्कर दलांची 7 वी ‘लष्कर जागतिक खेळ’ स्पर्धा चीनच्या हुबेई प्रांतातील वूहान शहरात आयोजित केली जाणार आहे. 100 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशातून खेळाडू यात सहभाग घेतील.

‘बिंग बिंग’ हे स्पर्धेचे मॅस्कॉट आहे, जे चीनी खाण्यासाठी एक मोठा मासा (पाण्यातला पांडा म्हणून ओळखतात) याच्यावर आधारित आहे. “लष्करी वैभव, जागतिक शांतता (Military glory, world peace)” हे घोषवाक्य आहे. 

आंतरराष्ट्रीय लष्कर क्रीडा परिषद (CISM) कडून आयोजित लष्करी कर्मचार्‍यांसाठी ‘लष्कर जागतिक खेळ’ हा एक सर्वोच्च क्रीडा उत्सव आहे. यात 27 वर्गवारीत 329 स्पर्धा खेळल्या जातात. 

प्रथम ‘लष्कर जागतिक खेळ’ 1995 साली रोममध्ये खेळले गेले होते आणि दर चार वर्षांनी आयोजित केला जातो.


डेमी नेल पीटर्स ठरली मिस युनिव्हर्स 
मिस युनिव्हर्स 2017 चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्स ही यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे. लासवेगासमध्ये झालेल्या सोहळ्यात मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती घोषीत करण्यात आले.

डेमी नेल पीटर्सला 2016 ची मिस युनिव्हर्स आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला. 
दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचं लौरा गोन्जालेज तगड आव्हान होते. या स्पर्धेत मिस जमाईकाने तिसरे स्थान मिळवले तर फर्स्ट रन अप मिस कोलंबिया झाली. 

मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करायला दुनियाभरातून 92 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. पण अंतिम फेरीत फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने मजल मारली. 26 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार लास वेगास येथे सायंकाळी सात वाजता (भारतीय वेळेनुसार 27 नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता) ही स्पर्धा सुरू झाली होती. 

मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत श्रद्धा शशिधरने भारताचे नेतृत्व केले होते. पण टॉप 10ची यादी श्रद्धाला गाठता न आल्याने भारताकडे मिस युनिव्हर्सचा किताब येण्याचे स्वप्न भंगले.



बांग्लादेशात ‘IMMSAREX’ हा आंतरराष्ट्रीय सागरी सराव सुरु
26 नोव्हेंबर 2017 रोजी बांग्‍लादेशमध्ये ‘आंतरराष्‍ट्रीय बहुपक्षीय सागरी शोध आणि बचाव सराव (IMMSAREX)’ ला सुरुवात झाली. हा सराव 28 नोव्हेंबर 2017 पर्यंत चालणार आहे.

IMMSAREX-2017 हा इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (IONS) च्या अखत्यारीत आयोजित करण्यात आलेला पहिला-वहिला क्रियान्वयन सराव आहे.

27 नोव्हेंबर 2017 रोजी कॉक्‍स बाजार येथे या सरावाचे उद्घाटन बांग्‍लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सरावात भारतीय नौदलाचे INS रणवीर, INS सहयाद्री, INS घडि़याल आणि INS सुकन्‍या ही जहाजे आणि P-8I हे सागरी गस्त विमान भाग घेणार आहे.

इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (IONS) पुढाकाराची सुरुवात भारतीय नौदलाकडून 2008 साली करण्यात आली होती, जी आज 23 सदस्‍य देश आणि 9 पर्यवेक्षक देशांसह एक महत्त्वपूर्ण संघटना बनली आहे. हा हिंद महासागराची सीमा असलेल्या देशांचे एक प्रादेशिक मंच आहे, ज्यामध्ये सदस्य देशांचे नौसेनाप्रमुख आपापल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतात. 

बांग्‍लादेश IONS चा वर्तमान अध्‍यक्ष आहे. 2014 साली स्वीकारलेल्या ठरावानुसार IMMSAREX आयोजित केले गेले आहे.



आदित्य-L1 : सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अंतराळ मोहीम 
‘आदित्‍य-1’ मोहीमेची संकल्‍पना दृष्य उत्‍सर्जन रेखा कोरोनाग्राफ (Visible Emission Line Coronagraph -VLEC) नामक मुख्य भार वाहून नेण्याकरिता 400 किलोग्रॅम श्रेणी उपग्रहाच्या रूपात केली गेली होती तसेच त्याला पृथ्वीपासून 800 किलोमीटर दूर खालच्या भू-कक्षेत पाठविण्याची योजना होती.

मात्र आता ‘आदित्‍य-1’ मोहिमेत सुधारणा करून त्याला ‘आदित्‍य-L1 मोहीम’ हे नाव देण्यात आले आहे आणि आता याला L1 च्या आस-पास कोरोनाग्राफ कक्षेत पाठवले जाणार आहे, जे की पृथ्‍वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. ही मोहीम PSLV-XL प्रक्षेपकाद्वारा सन 2019-2020 च्या काळात अंतराळात पाठवली जाणार आहे.

या मोहिमेमधून सूर्याचा बाह्य-थर (जो की डिस्‍क (फोटोस्फियर) च्या वरती हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे) तपासला जाणार आहे. तेथील तापमान दशलक्ष डिग्री केल्विन याहून अधिक आहे, जे की जवळपास 6000 केल्विनच्या सौर डिस्‍क तापमानापेक्षा अधिक आहे. 

सौर भौतिकशास्त्रामध्ये अजूनही या प्रश्नाचे उत्‍तर नाही मिळाले, की कश्याप्रकारे बाह्य चमकदार आवरणाचे तापमान इतके जास्त आहे. तसेच चुंबकीय क्षेत्र, भार असलेले कण अश्या अनेक बाबींचा यादरम्यान अभ्यास केला जाणार. या मोहिमेत दृष्य उत्‍सर्जन रेखा कोरोनाग्राफ (VELC) सह आणखी सहा भार आहेत.