महाराष्ट्रातील मनमाड-चांदवड रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्यामधील मनमाड-चांदवड दरम्यानचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग ‘क्र. ७५२ G’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्याच्या या राज्य रस्ता क्र. ३७ ची एकूण लांबी ७९२८ किलोमीटर आहे आणि आतापर्यंत मंत्रालयाकडून ७० प्रकल्पांसाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. हे प्रकल्प मार्च २०२० पर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे.



भारताकडून AAD सुपरसॉनिक लक्षवेधी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी
भारताने २८ डिसेंबर २०१७ रोजी ओडिशाच्या बालासोर येथील तळावरून अत्याधुनिक हवाई संरक्षणासाठी (AAD) सुपरसॉनिक लक्षवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

हे क्षेपणास्त्र रिमोटद्वारे नियंत्रित करता येणारे ७.५ मीटर लांबीचे सिंगल स्टेज सॉलिड रॉकेट क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या हवाई कक्षेत ३० किलोमीटर उंचीवरच डागलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करण्याची क्षमता ठेवते. ही या वर्षातली तिसरी यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी आहे.



‘उत्तर प्रदेश PPTD’ प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेसोबत $40 दशलक्षचा कर्ज करार झाला
‘उत्तर प्रदेश प्रो-पूअर टुरिजम डेव्हलपमेंट’ प्रकल्पासाठी भारताने जागतिक बँकेसोबत $४० दशलक्षचा (सुमारे २६० कोटी रुपये) कर्ज करार केला आहे.

उत्तरप्रदेशातील स्थानिक समुदायांसाठी पर्यटना संबंधित लाभांमध्ये वाढा करण्याच्या उद्देशाने पर्यटन सुविधांच्या विकासासाठी सादर करण्यात आलेल्या UPPPTD प्रकल्पासाठी ५ वर्षांमध्ये एकूण जवळपास $५७.१४ दशलक्षचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी $४० दशलक्ष जागतिक बँकेकडून तर उर्वरित राज्याच्या अर्थसंकल्पातून खर्च वितरित होणार.

जागतिक बँक ही भांडवल लागणार्‍या कार्यक्रमांसाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association-IDA) अश्या दोन संस्थांचा समावेश आहे. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना १९४४ साली ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली. जागतिक बँकेचे मुख्यालय अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.



जैविक इथेनॉलच्या निर्मितीसाठी हरयाणात इंडियन ऑईलचा प्रकल्प उभारला जाणार
भारताच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने कृषी-कचरा आणि अन्य जैविक (बायोमास) पदार्थांचा वापर करून दुसर्‍या पिढीच्या इथेनॉलचे उत्पादन घेण्यासाठी हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या बाओली गावात प्रकल्प उभारणार आहे.

प्रस्तावित प्रकल्पाची क्षमता प्रति दिन १०० किलो लिटर इथेनॉल इतकी असणार आहे. इंडियन ऑईलने २ लक्ष टन भाताच्या चार्‍याची खरेदी करणार आहे, जो कर्नाळ, पानिपत, सोनिपत आणि कुरुक्षेत्र या चार जिल्ह्यांमधून घेतला जाईल.


‘२०१८ भारतीय विज्ञान परिषद’ इंफाळमध्ये आयोजित होणार
इंफाळमधील मणिपूर केंद्रीय विद्यापीठात ‘२०१८ भारतीय विज्ञान परिषद (Indian Science Congress -ISC)’ आयोजित करण्याचा निर्णय ISC असोसिएशनने घेतला आहे.

यापूर्वी ३-७ जानेवारी २०१८ या दरम्यान ओस्मानिया विद्यापीठात आयोजित ‘भारतीय विज्ञान परिषद’ काही कारणास्तव रद्द केली गेली.


भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे. याची १९१४ साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात. यामध्ये ३०००० हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत. 

१५-१७ जानेवारी १९१४ या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली.



आंध्रप्रदेशात १०० वी भारतीय आर्थिक संघ परिषद आयोजित
२७ डिसेंबर २०१७ रोजी आंध्रप्रदेशच्या गुंटूरमधील आचार्य नागार्जुन विद्यापीठात (ANU) येथे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘भारतीय आर्थिक संघ (Indian Economic Association)’ च्या १०० व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

‘भारतीय आर्थिक विकासः स्वातंत्र्योत्तर अनुभव’ या विषयाखाली परिषदेत राजस्व धोरणासंबंधी परराष्ट्र व्यापार सहित कृषी व सामाजिक-आर्थिक असमानता या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे.

‘भारतीय आर्थिक संघ’ ची स्थापना १९१७ साली करण्यात आली आणि याचे जवळपास ७००० सदस्य आहेत. अर्थशास्त्रासंबंधी मुद्द्यांवर धोरणांसंबंधी हे एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. १९१७ सालापासून संघाकडून ‘इंडियन इकोनॉमिक जर्नल’ नियतकालिक निरंतर प्रकाशित केले जात आहे.



तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर 
तिहेरी तलाक पद्धत गुन्ह्याच्या चौकटीत आणणारे ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक’ २८ डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर झाले. 

या विधेयकामधील काही तरतुदींवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर त्यात बदल सुचवण्यात आले होते. मात्र, हे बदल सदस्यांचे मतदानाद्वारे पूर्णपणे नाकारले. त्यामुळे अखेर हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले.

तसेच एकतर्फी तीनदा तलाक म्हणून घटस्फोट घेण्यावर या कायद्यामुळे चाप बसणार आहे.



काबुल-मुंबई यांना जोडणारा दुसरा हवाई मालवाहू मार्ग सुरू करण्यात आला
काबुलला मुंबईशी जोडणारा दुसरा भारत-अफगाणिस्तान हवाई मालवाहू मार्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे अफगाणिस्तानपासून ताजे फळे आणि औषधी वनस्पतींची निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे.

यापूर्वी जूनमध्ये काबुल-नवी दिल्ली हवाई मार्ग सुरू केला गेला होता. पहिल्या मार्गिकेच्या शुभारंभानंतर आतापर्यंत $२० दशलक्षहून अधिक किंमतीचा १०६४० टन माल निर्यात करण्यात आला आहे.