जानेवारी २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये ‘ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित
जानेवारी २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये दोन दिवसीय ‘ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित करण्यात येणार आहे. 


शिवाय २५-२६ जानेवारीला ASEAN-भारत भागीदारीचे २५ वे वर्ष चिन्हांकित करण्यासाठी ‘अँसीयंट रूट, न्यू जर्नी: डायस्पोरा इन द डायनॅमिक ASEAN-इंडिया पार्टनरशिप’ या विषयाखाली एका शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

शेजारी राष्ट्रांसह व्यावसायिक आणि राजकीय संबंधांना अधिक व्यापक करण्यासाठी आणि परदेशासंबंधी धोरणांना आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने भारत योजनेचे क्रियान्वयन करणार आहे.

‘प्रवासी भारतीय दिवस (PBD)’ भारताच्या विकासात परदेशी भारतीय समाजाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो. 

हा दिवस दरवर्षी ९ जानेवारी रोजी आयोजित केला जातो. हा दिवस दक्षिण आफ्रिकेमधून भारतात महात्मा गांधी यांच्या परतीच्या प्रसंगाला स्मरून साजरा करण्यात येतो.

दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (Association of Southeast Asian Nations -ASEAN) हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे. 

याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे. 



बंगळुरू स्वतःचे ‘बोधचिन्ह’ असलेले भारतातले पहिले शहर
कर्नाटकमधील बेंगळुरु हे असे भारतातले पहिले शहर ठरले आहे, ज्याच्याकडे आपली स्वत:ची ब्रॅंड ओळख आणि बोधचिन्ह (Logo) आहे.

शहराच्या बोधचिन्हाला ‘बेंगळुरु – बी यू (Bengaluru – Be U)’ असे टॅगलाइन दिले आहे. बोधचिन्हात कन्नड आणि इंग्रजी भाषेतून साकारलेल्या बेंगळुरू या शब्दासह १८० अंशांची एक सरळ रेषा दर्शविण्यात आली आहे. शहरात पर्यटन आणि गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनाने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. 



भारतीय वायुदलाने ‘मिशन सेव्हन समिट्स’ पूर्ण केले
कॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील पाच भारतीय वायुदल (IAF) च्या पर्वतारोहणांचा समावेश असलेल्या चमूने २६ डिसेंबर २०१७ रोजी शेवटचे अंटार्कटिकामधील विन्सन पर्वताचे टोक गाठले आणि आपले ‘मिशन सेव्हन समिट्स’ पूर्ण केले. 

IAF कडून २००५ साली सुरू केलेली ‘मिशन सेव्हन समिट्स’ ही पर्वतारोहण मोहीमांची मालिका चालवली गेली. या यशासोबतच IAF ही जगातली सातही सर्वोच्च शिखरे गाठणारी एकमेव संघटना ठरली.

ही शेखरे आहेत – एव्हरेस्ट, नेपाळ (८८४० मीटर, आशिया), कारस्टेंझ पिरॅमिड इंडोनेशिया (ऑस्ट्रेलिया), एलब्रस, रशिया (युरोप), किलिमंजारो, दक्षिण आफ्रिका (आफ्रिका), एन्कॅकागुआ, अर्जेंटिना (दक्षिण अमेरिका), मॅकिन्ले/डेनाली, अलास्का (उत्तर अमेरीका), विन्सन (अंटार्कटिका). 


सुझलॉनने त्यांचे पहिले समुद्रात तरंगणारे हवामानशास्त्रीय केंद्र कार्यान्वित केले
सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रातल्या खाजगी कंपनीने त्याच्या संलग्न सहकार्‍यांच्या मदतीने अरबी समुद्रात त्यांचे पहिले समुद्रात तरंगणारे हवामानशास्त्रीय केंद्र (offshore met station) कार्यान्वित केले आहे. 

राष्ट्रीय पवन ऊर्जा संस्थेच्या मान्यतेसह राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हे समुद्रात तरंगणारे LiDAR (लाइट डिटेक्शन अंग रेंजिंग) आधारित पवन मापन केंद्र स्थापन केले गेले. हे केंद्र गुजरातच्या कच्छमध्ये जाखऊ बंदराच्या नैऋत्येकडे आहे. 

समुद्रात तरंगत्या पवन ऊर्जा तंत्रज्ञानावर सक्रियपणे काम करण्याच्या उद्देशाने या केंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी दोन वर्षांसाठी माहिती गोळा केली जाणार आहे. 



गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजप सत्तेवर
गुजरातच्या नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. विजय रूपाणी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

राज्यपाल ओ.पी. कोहली यांनी रूपाणी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्य मंत्रिमंडळातील १९ सदस्यांनीही शपथ घेतली. 



जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
सलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. हिमाचलमधील भाजप आमदारांच्या बैठकीत एकमताने ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला २१ जागांवरच समाधान मानावे लागले. 

भाजपचा विजय झाला असला तरी भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला. यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता.