ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर कालवश
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे ४ डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. 

२०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.



राष्ट्रीय कृषी शिक्षण दिवस ३ डिसेंबर
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वात ३ डिसेंबरला राष्ट्रीय कृषी शिक्षण दिवस साजरा करण्यात आला.

भारत सरकार वर्ष २०१५ मध्ये दरवर्षी ३ डिसेंबरला राष्ट्रीय कृषी शिक्षण दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम केंद्रीय कृषी मंत्री (१९४६) व स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा या दिवशी जन्म झाला होता.

कृषी विषयांच्या पदवीधारकांना उद्योजकता विकास आणि रोजगार सुनिश्चित करण्यासाठी ‘स्टूडेंट रेडी’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमादरम्यान कौशल्याच्या दृष्टीने प्रशिक्षित करणे हा आहे. 

पदवीच्या चौथ्या वर्षात समग्र कौशल्य विकास व शेतकर्‍यांसोबत तसेच अतिरिक्त उत्पादन उपक्रमांमध्ये काम करण्याची तरतूद असणार. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा मासिक भत्ता ७५० रूपयांवरून वाढवत ३००० रुपयांपर्यंत केला आहे.



नौदल दिन ४ डिसेंबर
आज ४ डिसेंबरला भारतीय नौदलाने भारतीय नौदलाचे कर्तृत्व आणि वीर सैनिकांचे बलिदान यांचा गौरव करण्याकरिता ४६ वा ‘नौदल दिन’ साजरा केला आहे.

या दिनानिमित्त दिल्लीत भरविलेल्या ‘इनोवेशन पॅव्हिलियन’ प्रदर्शनीत भाग घेतलेल्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 


‘ऑपरेशनल युनिट्स’ श्रेणी – INS कुथार (विजेता) आणि INS विक्रमादित्य (उप-विजेता)

‘शोअर इस्टॅब्लिशमेंट्स’ श्रेणी – वेपन इलेक्ट्रॉनिक सिस्टम इंजिनीयरिंग इस्टॅब्लिशमेंट (विजेता) आणि नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड, कोची (उप-विजेता)


४ डिसेंबर १९७१ रोजी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी ‘ऑपरेशन ट्राय डेन्ट’ अंतर्गत क्षेपणास्त्रांनी कराची बंदरावर चढवलेल्या साहसी हल्ल्याची आठवण म्हणून तसेच त्या युद्धातील सर्व शहीदांना श्रद्धांजली म्हणून भारतात नौदल दिन साजरा केला जातो.



उत्तरप्रदेशचा शामली जिल्हा NCR मध्ये समाविष्ट
उत्तरप्रदेशचा शामली जिल्हा आता राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

यासोबतच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मध्ये सामील जिल्ह्यांची एकूण संख्या दिल्ली व्यतिरिक्त २२ जिल्हे (हरियाणाचे १३, उत्तरप्रदेशचे ७ आणि राजस्थानचे २) असे २३ झालेली आहे. NCR मध्ये सामील शहरांना ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र योजना मंडळ (NCRPB)’ कडून क्षेत्रासाठी विकासासाठी आकर्षक दरांवर निधी उपलब्ध करून दिला जातो.


१९८५ साली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) आणि संलग्न राष्ट्रीय राजधानी क्षेत्र योजना मंडळ (NCRPB) यांची स्थापना करण्यात आली. हे मंडळ या प्रदेशाच्या विकासाची योजना आखते आणि क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नियंत्रणासाठी योग्य धोरणे तयार करते.


नवी दिल्लीत ‘आरोग्य २०१७’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
४ डिसेंबर २०१७ रोजी आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) आणि निरोगीपणा या विषयावरील ‘आरोग्‍य २०१७’ या प्रथम आंतरराष्‍ट्रीय परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे.

‘आरोग्‍य २०१७’ चे आयोजन फार्मेक्‍सिल सहित AYUSH मंत्रालय आणि वाणिज्‍य व उद्योग मंत्रालयाने FICCI सोबत औषधींची परंपरागत प्रणालीचे सामर्थ्य आणि वैज्ञानिक मूल्‍यांकनाला प्रदर्शित करण्यासाठी संयुक्‍त रूपात केले आहे. 

या कार्यक्रमात ६० देशांमधून जवळपास १५०० प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. प्रदर्शनी आणि परिषद या कार्यक्रमांचे आयोजन ४ ते ७ डिसेंबर २०१७ या दरम्यान विज्ञान भवनमध्ये करण्यात आले आहे. 



अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त हवाई युद्धसराव सुरू
४ डिसेंबर २०१७ पासून अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्या ‘व्हिजिलंट एस’ संयुक्त हवाई युद्धाभ्यासाला सुरुवात झाली आहे.

पाच दिवसीय या युद्धाभ्यासात उत्तर कोरियाच्या भूमीवर F-22 लढाऊ विमान सोबतच २३० विमान व १२००० अमेरिकन सैनिकांनी भाग घेतला आहे. हा आतापर्यंतचा अमेरिका व दक्षिण कोरिया यांचा सर्वात मोठा हवाई युद्धाभ्यास ठरला आहे.



UAE, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या ‘फ्लॅग4’ संयुक्त सरावाला सुरुवात
अबू धाबीमध्ये ४ डिसेंबर २०१७ रोजी संयुक्त अरब अमीरात (UAE), ब्रिटन (UK), अमेरिका (US) आणि फ्रान्स यांच्या ‘फ्लॅग4’ नावाखाली संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात झाली आहे.

दोन आठवडे चालणारा हा सराव बहुपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी तसेच UAE सशस्त्र दल आणि सहभागी राष्ट्रांमधील समन्वय वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा एक भाग आहे.



जागतिक मृदा दिवस ५ डिसेंबर 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोम स्थित अन्न व कृषी संघटना (Food and Agriculture Organisation- FAO) च्या नेतृत्वात ५ डिसेंबर २०१७ रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जात आहे.

या वर्षी “केयरिंग फॉर द प्लॅनेट स्टार्ट्स फ्रॉम द ग्राऊंड” या विषयाखाली हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण आणि मानव कल्याणासाठी मृदेच्या गुणधर्मांचे महत्त्व पट‍वून देणारे संदेश पसरवणे.


मृदा हे एक मर्यादित नैसर्गिक स्त्रोत आहे. मानवी कालखंडात मृदा पुनर्निर्मित केली जाऊ शकत नाही. तथापि, मानवी जीवनामध्ये मृदेची भूमिका महत्त्वाची असूनही, अनुचित व्यवस्थापन पद्धतीमुळे मृदेचा कस कमी होण्यामध्ये जागतिक स्तरावर वाढ होत आहे.

हवामानातील बदल, दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकास यादृष्टीने कार्य करण्यासह अन्नसुरक्षा, कृषी यासाठी मृदाचे महत्त्व यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो.

जून २०१३ मध्ये ‘वैश्विक मृदा भागीदारी’ च्या चौकटीत FAO परिषदेकडून प्रस्तावित प्रस्तावादाखल, डिसेंबर २०१३ मध्ये ६८ व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत ५ डिसेंबर २०१४ रोजी प्रथम अधिकृत ‘जागतिक मृदा दिवस’ साजरा करण्याचे मान्य केले गेले. प्रत्यक्षात ही कल्पना २००२ साली इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायंसेस (IUSS) द्वारा प्रस्तावित केली गेली होती.