कुंभमेळा सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित
कुंभमेळा हा भारतातील एक श्रद्धेचा विषय असून शेकडो वर्षांच्या परंपरेचा तो अविभाज्य भाग आहे. या पार्श्वभूमीवर युनेस्कोकडून कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले.


युनेस्कोच्या यादीत बोस्वाना, कोलंबिया, व्हेनेझुएला, मंगोलिया, मोरक्को, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती येथील सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

तसेच यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी एका सरकारी समितीची बैठक ४ ते ९ डिसेंबर या काळात होणार आहे.


‘योग’ आणि ‘नवरोज’ यांच्यानंतर गेल्या दोन वर्षात अशा प्रकारची मान्यता मिळालेला ‘कुंभमेळा’ तिसरा वारसा आहे



चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प पाक लष्कराच्या ताब्यात
चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेसाठी पाकिस्तानला निधी उपलब्ध करण्यावर चीनने र्निबध आणले असताना हा प्रकल्प पाकिस्तान लष्कराने ताब्यात घेण्यासाठी चीन प्रयत्नशील असण्याची शक्यता युरोपियन फाऊंडेशन ऑफ साऊथ एशियन स्टडीजच्या (ईएफएसएएस) विश्लेषकांनी वर्तविली आहे.

संयुक्त कार्यकारी समूहाच्या (जेडब्ल्यूजी) २० नोव्हेंबरला झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पातील तीन प्रमुख रस्त्यांच्या बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. परंतु इस्लामाबादला सध्याची निधी वितरित करण्याची प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच लवकरच नवे दिशानिर्देश करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते. 

परंतु या प्रकल्पातील लाचखोरीमुळे चीनने निधी वितरित करण्यास अटकाव केला आहे. यामुळे हा प्रकल्प पाकिस्तानचे सत्ताकेंद्र असलेल्या पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतल्यास प्रकल्पाच्या यशाची हमी वाढेल व दर्जेदार कामही होईल, असे चीनने ईएफएसएएस या अहवालात म्हटले आहे.



भारतीय नौदलाच्या पाणबुडीच्या विभागाला ‘राष्ट्रपती रंग’ सन्मानाने गौरविले
भारतीय नौदलाच्या पाणबुडी विभागाला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती रंग (President’s Colour)’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

देशाची पहिली पाणबुडी INS कलवरीने १९६७ साली ८ डिसेंबरला पाणबुडी विभागाची सुरुवात झाली होती. हे वर्ष या विभागाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून पाणबुडी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. 

१९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युध्दात नौदलाच्या या पाणबुडी विभागाने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. यापूर्वी २७ मे १९५१ रोजी भारतीय नौदलाला ‘राष्ट्रपती रंग’ या सन्मानाने गौरविण्यात आले होते.

राष्ट्रपती मानक/रंग (presidential standard/President’s Colour) किंवा राष्ट्रपती ध्वज हा एक ध्वज आहे, जो राज्यप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष यांचे प्रतीक किंवा राजेशाही मानक म्हणून अनेक देशांमध्ये वापरला जातो. संरक्षण दलाला मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. 

भारतात २६ जानेवारी १९५० पासून हा ध्वज भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून ध्वजांकीत केला जात आहे. या मानकावर चार (२ निळे व २ लाल) भागामध्ये सोनेरी बाह्यरेखांनी काढलेली राष्ट्रीय प्रतीक कोरलेली आहेत आणि ते म्हणजे – सिंह, हत्ती (५ व्या शतकाच्या अजिंठा लेणीमधील आदिमानवांची चित्रकला), तराजू (१७ व्या शतकातील लाल किल्लामधील), कमळ पुष्पाची फुलदाणी



UN च्या स्वच्छ शहर यादीत प्रथम पाचमध्ये केरळचे ‘अलाप्पुझा’ शहर
नुकत्याच प्रकाशित ‘UN स्वच्छ शहर यादी’ मध्ये प्रथम पाचमध्ये केरळच्या ‘अलाप्पुझा’ शहराचा समावेश करण्यात आला आहे.

‘अलाप्पुझा’ यांनी आपल्या घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा सुधारित करून स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल ठरले आहे. अलाप्पुझा हे मोठ्या प्रमाणात जलमार्ग आणि पाण्यावर तरंगणारी घरे असणारे तटिय शहर आहे आणि हा भाग नारळाचे रेषे, मासेमारी, मत्सप्रक्रिया आणि भातशेती अश्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे.

‘अलाप्पुझा’ च्या स्थानिक प्रशासनाने ‘एरोबिक बिन’ नावाची कचरा व्यवस्थापनाची एक नवीन पद्धत वापरली. शहराच्या विविध भागांत अनेक एरोबिक बिन बसवले गेलेत. त्यामध्ये जमा घन कचरा सुपीक कंपोस्टमध्ये तयार केले जाते, जे शेतीत खत म्हणून वापरले जात आहे. याशिवाय, प्रत्येक घरात बायोगॅस संयंत्रे आणि पाईप कंपोस्ट प्रणाली दिसून येते.


नवी दिल्लीत प्रथम ‘SAICON 2017’ चे उद्घाटन
क्रीडासंबंधित औषधी व क्रीडाशास्त्र विषयावर प्रथम आंतरराष्‍ट्रीय परिषद ‘SAICON 2017’ चे नवी दिल्लीत ७ डिसेंबर २०१७ रोजी क्रीडा राज्‍यमंत्री राज्‍यवर्धन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

देशातील वैज्ञानिक वातावरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि क्रीडाशास्त्र आणि या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना, संशोधक आणि शिक्षणतज्ञांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले गेले आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) द्वारा आयोजित तीन दिवसांच्या परिषदेत सुमारे १००० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत.



आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत भारताला पाच पदके मिळाली
जपानमधील वाको शहरामध्ये खेळण्यात आलेल्या १० व्या आशियाई एयरगन नेमबाजी अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत भारताने एकूण पाच पदकांची कमाई केली आहे.

पदक विजेत्यांमध्ये रवी कुमार (पुरुष १० मीटर एयर रायफलमध्ये कांस्य), अर्जुन बबुता (पुरुष जूनियर १० मीटर एयर रायफलमध्ये रौप्य), तीन एयर रायफल स्पर्धेत तीन सांघिक रौप्यपदक यांचा समावेश आहे.

पुरुष१०  मीटर एयर रायफलमध्ये चीनच्या सोंग बुहान याने सुवर्ण आणि चीनच्या काओ यिफेई याने रौप्यपदक पटकावले.

आशियाई नेमबाजी स्पर्धा एशियन शुटिंग कॉन्फेडरेशनद्वारे संचालित केली जाते. १९६७ सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धांमध्ये जवळजवळ सर्व ISSF नेमबाजी प्रकारांचा समावेश असतो. ही स्पर्धा दर चार वर्षांनी खेळली जाते.



क्रिस्टियानो रोनाल्डोला ‘२०१७ बॉलोन डी’ओर’ पुरस्कार मिळाला
पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो याला क्रीडा क्षेत्रातला प्रतिष्ठित ‘२०१७ बॉलोन डी’ओर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

स्पेनच्या रियल मॅड्रिड फूटबॉल क्लबचा स्ट्रायकर रोनाल्डोला हा पुरस्कार फ्रान्सच्या पॅरिसमधील आयोजित एका समारंभात दिला गेला. त्याने पाचव्यांदा (यापूर्वी२००८, २०१३, २०१४ आणि २०१६ साली) हा किताब मिळवलेला आहे. याशिवाय रोनाल्डोने २०१६-१७ सालचा FIFA मेन्स प्लेयर ऑफ द इयर हा किताब मिळवलेला आहे.

बॉलोन डी’ओर (किंवा गोल्डन बॉल) हा फ्रान्स फुटबॉल संघटनेकडून दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. १९५६ सालापासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. 

२००७ सालापासून या पुरस्काराच्या कक्षेत जगभरातील सर्व खेळाडूंना आणले गेले. पहिल्यांदा ब्लॅकपूल क्लबच्या स्टॅन्ले मॅथ्यूजला हा पुरस्कार मिळाला. वर्ष २०१० आणि वर्ष २०१५ दरम्यान हा पुरस्कार FIFA सह झालेल्या करारामधून तात्पुरता FIFA वर्ल्ड प्लेयर ऑफ द इयरमध्ये विलीन करण्यात आला आणि त्याला फिफा बॅलोन डी’ओर हे नाव मिळाले.



ईयू-ब्रिटन यांच्यात करार
युरोपीयन युनियन (ईयू) आणि ब्रिटन यांच्यात ब्रिटनने युरोपियन युनियनमधून कोणत्या अटींवर बाहेर पडायचे यावर ऐतिहासिक करार झाला. 

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या चर्चेसाठी येथे दाखल झाल्यावर हा करार झाला.

युरोपियन कमीशनने म्हटले की ब्रिटनने आयरीशची सीमा, घटस्फोट विधेयक आणि नागरिकांचे हक्क यांच्यासह वेगळे होण्याच्या मुद्यांवर पुरेशी प्रगती केलेली आहे. 

१४ व १५ डिसेंबर रोजी युरोपियन युनियनच्या नेत्यांची शिखर परिषद होत असून तीत ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या वाटाघाटींच्या दुसर्‍या टप्प्यासाठी या कराराने मार्ग मोकळा केला आहे. युरोपियन युनियनचा ब्रिटन जवळपास चार दशकांपासून सदस्य होता व त्यातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनला सार्वमताने जून २०१६ मध्ये परवानगी दिली.