के. सिवन ISRO चे नवे अध्यक्ष 
प्रसिद्ध वैज्ञानिक के. सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केले गेली आहे.


तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे वर्तमान संचालक के. सिवन यांची नियुक्ती ए. एस. किरन कुमार यांच्या जागेवर करण्यात आली आहे. त्यांच्या या पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ राहणार आहे.


के. सिवन यांच्या नेतृत्वात ISRO ने फेब्रुवारी २०१७ मधील एकाच मोहिमेत अंतराळात १०४ उपग्रह पाठवण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे. 

त्यांनी पोलर सॅटलाइट लॉंच व्हेइकल (PSLV), जिओसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल (GSLV) आणि GSLV Mk-I11 या प्रक्षेपकांच्या संरचनेच लक्षणीय योगदान दिले आहे. तसेच त्यांनी ‘सीतारा’ नामक एक सॉफ्टवेयर तयार केले आहे, जे अग्निबाणाचे उड्डाणादरम्यान मार्गक्रमण तपासून बघण्याकरिता ISRO वापरत आहे. 

ते ISRO च्या रियूजेबल लॉंच व्हेइकल – टेक्नॉलजी डेमोंस्ट्रेटर (RLV-TD) प्रकल्पाचे नेतृत्व करीत आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 

१९६२ साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, १५ ऑगस्ट १९६९ रोजी स्थापित ISRO ने १९६२ साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 

ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ १९ एप्रिल १९७५ रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला. १९८० साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला. 

२२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताची ‘चंद्रयान-१’ मोहीम यशस्वी झाली. 

त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने २४ सप्टेंबर २०१४ रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.हरजिंदर सिंह २०१८ हिवाळी ऑलंपिकसाठी ‘शेफ डी मिशन’
भारतीय ऑलंपिक संघ (IOA) ने भारतीय आइस हॉकी महासंघाचे महासचिव हरजिंदर सिंह यांची २०१८ हिवाळी ऑलंपिक खेळांसाठी भारताचे ‘शेफ डी मिशन’ म्हणून नियुक्ती केली आहे.

दक्षिण कोरियात प्योंगचांगमध्ये हिवाळी ऑलंपिक खेळांचे आयोजन ९-२३ फेब्रुवारी २०१८ या काळात केले गेले आहे.

भारतीय ऑलंपिक संघटना (IOA) ही भारतामधील खेळाडूंना ऑलंपिक, आशियाई खेळ व अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळाडूंची निवड करणारी आणि कार्यक्रमांमध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापन करण्यास जबाबदार संघटना आहे. याची स्थापना १९२७ साली करण्यात आली.


राष्ट्रपतींच्या हस्ते चौथ्या ‘आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषद’ चे उद्घाटन
११ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बिहारच्या राजगीर शहरात चौथ्या आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

धर्म व समाज अध्‍ययन केंद्र, इंडिया फाउंडेशन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या सहकार्याने नालंदा विद्यापीठातर्फे आयोजित या तीन दिवसीय परिषदेत ११ देशांमधून आलेल्या लोकांनी सहभाग घेतला आहे.

भारत आणि परदेशातील शिक्षणतज्ञ आणि धोरण निर्मात्यांना त्यांच्या विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा उद्देश्‍य आहे.ग्रीन कार्डच्या संख्येत वाढ होणार
गुणवत्तेवर आधारित व्हिसा देण्याची आणि ग्रीन कार्डच्या संख्येत ४५ टक्क्य़ांची भरघोस वाढ करण्याची तरतूद असलेले विधेयक अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये सादर करण्यात आले आहे. 

ट्रम्प प्रशासनाचा पाठिंबा असलेल्या या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास भारतीय तंत्रज्ञांना मोठा फायदा होणार आहे.

‘सिक्युअरिंग अमेरिकाज फ्यूचर अ‍ॅक्ट’ नावाचे हे विधेयक काँग्रेसने मंजूर केल्यास आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास व्हिसाबाबत असलेली विविधता संपून, स्थलांतरितांची संख्या सध्याच्या सरासरी १०.०५ दशलक्षावरून वर्षांला २ लाख ६० हजार इतकी कमी होईल.थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे ऋषी सुनक सामील
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करून भारतीय वंशाचे संसदीय सदस्य ऋषी सुनक यांना सामील केले आहे.

३६ वर्षीय ऋषी सुनक ब्रिटनच्या निवास, समुदाय आणि स्थानिक प्रशासन मंत्रालयात राज्य सचिव पदी नियुक्त केले गेले आहे.

सुनक यांनी २०१५ साली सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर यॉर्कशायरच्या रिचमंड क्षेत्रातून निवडणूक जिंकली होती. ते लंडन बेस्ड इन्वेस्टमेंट कंपनीचे सह-संस्थापक आहेत. ते इंफोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ति यांचे जावई आहेत.अॅमेझॉनचे CEO जेफ बेझोस जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती
अॅमेझॉनचे संस्थापक आणि CEO जेफ बेझोस हे $१०५.१ अब्जच्या संपत्तीसह संपूर्ण इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स अनुसार, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना बेझोस यांनी मागे टाकले आहे. गेट्स यांची $९३.३ अब्ज संपत्ती आहे. 

त्यानंतर या यादीत शीर्ष १० मध्ये वॉरन बफेट, मार्क झुकरबर्ग, अमानसिको ओर्टेगा, कार्लोस स्लिम, बर्नार्ड अरनॉल्ट, लॅरी पेज, लॅरी एलिसन आणि सर्जी ब्रिन हे आहेत. 

निर्देशांकातल्या भारतीयांमध्ये, मुकेश अंबानी हे भारतातले सर्वात श्रीमंत आणि जगात २० वे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती $४१.२ अब्ज आहे. त्यानंतर लक्ष्मी मित्तल ($२०.९ अब्ज, ४४ वे), अझीम प्रेमजी ($१८.१ अब्ज, ६१ वे), पलोनजी मिस्त्री ($१७.६ अब्ज, ६२ वे) आणि शिव नादर ($१४ अब्ज, ९४ वे) हे आहेत.