भारताचे उपग्रहांचे शतक, ‘पीएसएलव्ही सी-४०’द्वारे ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण
येथील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्र येथून १०० व्या उपग्रहाने शुक्रवारी यशस्वी भरारी घेतली. PSLV-C40 द्वारे Cartosat-2 (कार्टोसॅट) हा हवामानाचा अभ्यास करणारा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. 


२०१८ च्या सुरुवातीलाच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून १०० व्या कक्षाचे यशस्वी प्रक्षेपण केले. 

चार महिन्यांपुर्वी आयआरएनएसएस-१एच या उपग्रहाच्या स्पेस एजन्सीच्या अयशस्वी प्रक्षेपणानंतर कार्टोसॅट मिशनचे काम सुरु करण्यात आले होते. 

PSLV-C40 हे भारताने विकसित केलेले उपग्रह प्रक्षेपणाचे तंत्रज्ञान आहे. ज्यातून हवामान निरीक्षणाचे कार्य करणारा कार्टोसॅट – 2 सहीत आणखी दोन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

हे PSLV-C40 या तंत्रज्ञानाचे ४२ वे मिशन होते. 

आज ‘पीएसएलव्ही सी-40’ द्वारे सोडलेल्या 31 उपग्रहांपैकी तीन भारताचे होते. यातील मायक्रो उपग्रह हा अवकाशात सोडलेला भारताचा शंभरावा उपग्रह ठरला. ‘इस्रो’ने सोडलेल्या शंभर उपग्रहांमध्ये काही नॅनो आणि मायक्रो उपग्रहांचा समावेश असून, यापैकी काही उपग्रह देशातील शैक्षणिक संस्थांनी तयार केलेले आहेत. 

काल सोडलेल्या उपग्रहांपैकी सर्वांत महत्त्वाचा उपग्रह कार्टोसॅट- 2 हा होता. पृथ्वी निरीक्षणासाठी सोडलेला हा 710 किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपकापासून विलग झाल्यानंतर 17 मिनिटांनी आपल्या नियोजित कक्षेत स्थिर झाला. 

या उपग्रहानंतर भारताचा नॅनो सॅटेलाइट आणि अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया, फ्रान्स, फिनलंड आणि कॅनडा या देशांचे मिळून तीन मायक्रो आणि 25 नॅनो उपग्रह अवकाशात सात मिनिटांच्या अवधीत सोडण्यात आले. या सर्वांचे एकूण वजन 613 किलो होते. 

यानंतर पीएसएलव्हीचा चौथा टप्पा दोन वेळेस सुरू करून कक्षा बदलण्यात आली आणि पृथ्वीपासून 359.584 किमी अंतरावर प्रक्षेपकाला खाली आणत अखेरचा भारताचा मायक्रो उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. एकूण दोन तास 21 मिनिटांच्या अवधीत सर्व उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. 

कार्टोसॅट 2 या उपग्रहाद्वारे ग्रामीण आणि शहरी भाग, किनारी भाग यांची उच्चप्रतीची प्रतिमा मिळणार असून त्यामुळे रस्त्यांचे जाळे, पाणीवाटप, इतर भौगोलिक माहिती यावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. इंदू मल्होत्रा थेट एकमताने सर्वोच्च न्यायालयात नियुक्त होणार्‍या प्रथम महिला​ न्यायाधीश
जेष्ठ वकील इंदू मल्होत्रा या वकिलांच्या मंडळाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी थेट नियुक्त करण्यास शिफारस करण्यात आलेल्या प्रथम महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.

सोबतच उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसफ यांची देखील शिफारस करण्यात आली.

इंदू मल्होत्रा स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनणारी सातवी महिला आहे. यापूर्वी आर. भानुमती (सध्या एकमात्र कार्यरत महिला न्यायाधीश), एम. फातिमा बीवी (1989 साली सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश), सुजाता व्ही. मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा आणि रंजना प्रकाश देसाई या महिलांची नियुक्ती झालेली होती.

भारतीय घटनेच्या परिच्छेद १२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयांच्या स्थापनेसंबंधी तरतूद आहे. वर्तमानात न्यायालयात एक भारतीय सरन्यायाधीश (CJI) आणि कमाल ३० अन्य न्यायाधीश पदांची तरतूद आहे. याचे मुख्यपीठ नवी दिल्लीत आहे. भारतीय सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतींकडून (परीच्छेद 124) केली जाते.


राष्ट्रीय युवा दिवस १२ जानेवारी
१२ जानेवारी २०१८ रोजी देशभरात ‘युथ फॉर डिजिटल इंडिया’ या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा करण्यात आला आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त NCR च्या नोएडामध्ये १८ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र संघटनेकडून आयोजित केला गेला आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत सन १९८४ ला ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित केले गेले. त्यापाठोपाठ, भारत सरकारने सन १९८४ पासून दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा करण्याची घोषणा केली.लोकप्रतिनिधीत्व कायद्यात बदल सुचविण्यास निवडणूक आयोगाची समिती स्थापित
लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम १२६ मध्ये बदल सुचविण्यासाठी निवडणूक आयोगाने एक १४ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे आणि ते तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करतील. लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम १२६ अन्वये, प्रसार माध्यमांचा व्यापक विस्तार लक्षात घेता, मतदानासाठी उरलेल्या शेवटच्या ४८ तासांत मतदान मोहिमेवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

समिती ‘शांतता काळात’ वृत्तवाहिन्या आणि सामाजिक माध्यमांमुळे होणार्‍या प्रभावाचा अभ्यास करणार आणि कलम १२६ बाबतीत त्यांचे मत देणार आणि त्यानुसार आदर्श आचारसंहिता (MCC) यामध्ये बदलांची शिफारस करणार. 

बहू-टप्प्यात होणार्‍या निवडणुकीत प्रतिबंधित ४८ तासांच्या काळात प्रसार माध्यमांच्या व्यासपीठांच्या नियमनामध्ये येणाऱ्या अडचणींचे अन्वेषण करणार.

भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व निम-न्यायिक संस्था आहे. ECI ची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी केली गेली. आयोगात वर्तमानात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. ECI ची संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते. 

निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत. पूर्वी आयोगाचे एक सदस्य असलेले मंडळ होते, परंतु १९८९ सालानंतर दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त पद निर्माण करण्यात आले.प्रसिद्ध हिंदी साहित्यिक दुधनाथ सिंह यांचे निधन
भारताचे प्रसिद्ध साहित्यकार दुधनाथ सिंह यांचे निधन झाले आहे.

दुधनाथ सिंह यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३६ रोजी बलिया (उत्तरप्रदेश) मध्ये झाला. त्यांनी कादंबरी, कथा, नाटक, कविता, समीक्षा अश्या विविध क्षेत्रात लिहिले. त्यांना साहित्य भूषण सन्मान आणि कित्येक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.