चालू घडामोडी २५ जानेवारी २०१८

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर 
पोलिस दलात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर उपायुक्त संजीवकुमार पाटील आणि बिंदू चौक सबजेलचे पोलिस हवालदार संजीव घाणेकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले.

पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताकदिनी गौरव केला जातो. 

कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी गुप्तवार्ता विभागात अपर उपायुक्त म्हणून सेवा बजावणारे संजीवकुमार विश्‍वास पाटील आणि बिंदू चौक सबजेलमध्ये पोलिस हवालदार म्हणून सेवा बजावणारे संजीव सखाराम घाणेकर यांना राष्ट्रपदी पोलिस पदक जाहीर झाले.जयपूरमध्ये केंद्रीय होमीओपॅथी संशोधन संस्थेची कोणशीला ठेवली गेली
होमीओपॅथीमध्ये वैज्ञानिक संशोधन चालविण्यासाठी राजस्थानच्या जयपूरमध्ये केंद्रीय संशोधन संस्थेची कोणशीला ठेवली गेली आहे.
AYUSH मंत्रालयांतर्गत केंद्रीय होमीओपॅथी संशोधन परिषद (CCRH) अखत्यारीत ही तिसरी केंद्रीय संशोधन संस्था आहे. अश्या देशभरात २३ संस्था स्थापन केल्या जाणार आहेत'विक्टोरिया अँड अब्दुल' चित्रपटाला ऑस्करसाठी दोन गटात नामांकन प्राप्त
'विक्टोरिया अँड अब्दुल' चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे. भारतीय अभिनेता अली फझल आणि ब्रिटिश अभिनेत्री ज्यूडी डेंच हे प्रमुख भूमिकेत आहेत.

निर्देशक स्टीफन फ्रेअर्स यांच्या 'विक्टोरिया अँड अब्दुल' या चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि सर्वोत्कृष्ट शिंनगार व केशरचना या दोन गटात नामांकन प्राप्त झाले आहे. हा चित्रपट शरबनी बासू लिखित एका पुस्तकावर आधारीत आहे.

'अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस' ही चित्रपट जगतातली सर्वात जुनी संस्था आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया स्थित या संस्थेकडून १९२९ सालापासून ऑस्कर पुरस्कार दिला जात आहे. या संस्थेची स्थापना ११ मे १९२७ साली करण्यात आली

युरोपीय संघाने पनामासह आणखी सात देशांना त्यांच्या प्रतिबंधित यादीतून वगळले
युरोपीय संघाने करापासून मुक्ती मिळवून देणार्‍या आठ देशांना त्यांच्या प्रतिबंधित यादीतून वगळले. पनामा प्रकारणानंतर उद्भवलेल्या आर्थिक चिंतेचा प्रश्न सोडवण्यासाठी पाऊले उचलण्याची शपथ घेतल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले.

या आठ देशांमध्ये पनामा, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिरात, ट्युनिशिया, मंगोलिया, मकाऊ, ग्रेनडा आणि बार्बाडोस यांचा समावेश आहे.चीन सहा पदरी 'इंटेलिजेंट एक्सप्रेसवे' तयार करणार
चीन वर्ष २०२२ पर्यंत पूर्वेकडील झेजियांग प्रांतात १६१ किलोमीटर लांबीचा सहा पदरी 'इंटेलिजेंट एक्सप्रेसवे' तयार करण्याची योजना आखत आहे.
नियोजित द्रुतगती मार्ग हँगझौ ला निंगबोशी जोडणार, त्यामुळे सरासरी वाहतूक गती २०-३०% ने वाढेल आणि दोन शहरांमधील प्रवास कालावधी दोन तासावरून एक तासावर येणार.

नव्या 'इंटेलिजेंट एक्सप्रेसवे' प्रणालीमध्ये वाहनांची सुरक्षितता राखण्यासाठी देखरेख यंत्रणा तसेच चेतावणी प्रणाली सज्ज असेल. तसेच यामध्ये भविष्यात स्वयंचलित वहनासाठी उपयुक्त वाहन इंटरनेट तंत्रज्ञान (Internet of Vehicles) याचाही समावेश असेल.