थिरुवनंतपुरममध्ये ‘राष्ट्रीय केळी महोत्सव-२०१८’ सुरू 
केरळच्या थिरुवनंतपुरममध्ये १७-२१ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ‘राष्ट्रीय केळी महोत्सव-२०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 


भारताच्या उष्‍णकटिबंधीय, उप कटिबंधीय तसेच तटीय क्षेत्रांमध्ये केळीचे मोठ्या स्वरुपात पीक घेतले जाते. भारत हा केळीचे सर्वाधिक उत्‍पादन घेणारा देश आहे. 

भारतात ०.८८ दशलक्ष हेक्टर क्षेत्रात २९.८ दशलक्ष टन उत्‍पादन घेतले आहे. जगभरात घेतल्या जाणार्‍या केळीच्या उत्पादनामध्ये भारताचा २५.५८% इतका वाटा आहे. केळीची स्थानिक मागणी सन २०५० पर्यंत ६० दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.उपराष्ट्रपतींच्या हस्ते ८ व्या आंतरराष्ट्रीय रंगभूमी ऑलंपिकचे उद्घाटन
१७ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०१८ या कालावधीत भारतात ‘फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप’ या विषयाखाली आठव्या ‘आंतरराष्ट्रीय रंगभूमी ऑलंपिक’ चे आयोजन केले गेले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (NSD) वतीने करण्यात आले आहे. यावर्षी भारतात प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमात जगभरातील ३० देशांचा सहभाग आहे. 

दिल्लीत लालकिल्यात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आणि मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे या कार्यक्रमाचा समारोप होणार.

२५ हजारांहून अधिक कलाकारांचा यात सहभाग आहे. याचे आयोजन दिल्ली, चेन्नई, बेंगळूरू, भोपाल, चंदीगड, कोलकाता, थिरुवनंतपुरम, पटना, आगरतळा, गुवाहाटी, जयपुर, जम्मू, अहमदाबाद आणि मुंबई याखेरीज देशाच्या आणखी १७ शहरांमध्ये होणार.

वर्ष १९९५ मध्ये ग्रीसच्या डेल्फाई शहरात प्रथम आंतरराष्ट्रीय रंगभूमी ऑलंपिक (International Theatre Olympics) आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर जपान (१९९९), रशिया (२००१), टर्की (२००६), दक्षिण कोरिया (२०१०), चीन (२०१४), पोलंड (२०१६) मध्ये ऑलंपिकचे आयोजन केले गेले.


UDAN योजनेंतर्गत ‘एयर ओडिशा’चे पहिले उड्डाण
भारत सरकारच्या ‘UDAN (उडे देश का आम नागरिक)’ या क्षेत्रीय हवाई संपर्क योजनेंतर्गत ‘एयर ओडिशा’ ने १७ फेब्रुवारी २०१८ रोजी आपले पहिले उड्डाण घेतले.

भुवनेश्वर स्थित ‘एयर ओडिशा’ या कंपनीने गुजरातच्या मुंदडा-अहमदाबाद या टप्प्यात पहिले उड्डाण सुरू केले. कंपनीने अहमदाबाद-मुंदडा-जामनगर या मार्गावर १९ आसनी बीचक्राफ्ट १९००D विमान सेवेत तैनात केले आहे.


एयर ओडिशाने वेळापत्रकाशिवाय कार्यरत असणारी हवाई सेवा कंपनी आहे, जिचे कार्य नोव्हेंबर २०१२ मध्ये सुरू झाले. कंपनी पहिल्या टप्प्यात अहमदाबाद ते जामनगर, मुंदडा आणि दीव या गंतव्यांसाठी सेवा सुरू करणार आहे.

एप्रिल २०१७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या UDAN (उडे देश का आम नागरिक) या नावाच्या प्रादेशिक जोडणी योजना (RCS) अंतर्गत पहिल्या फेरीत ५ हवाईसेवा कंपनींना १२८ मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. 

त्यामधून टियर-२ आणि टियर-३ श्रेणीतील शहरांतल्या ४३ विमानतळांना जोडण्यात येत आहे. योजनेंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी ५०% भाडे केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.कृष्ण मेनन यांचे स्मारक लंडनमध्ये उभारणार 
ब्रिटनमध्ये पहिले भारतीय उच्चायुक्त राहिलेल्या व्ही. के. कृष्ण मेनन यांचे इंग्लंडच्या लंडन शहरात एक स्मारक उभारले जाणार आहे.

लंडनमधील ‘एशियाई लाइट इंटरनॅशनल’ या प्रकाशकाच्या पुढाकाराने मेनन यांची एक प्रतिमा लंडनच्या उच्च आयोग कार्यालयात स्थापित केले जाणार. सेल्वा राजन यांनी ही प्रतिमा तयार केलेली आहे.

वेड्डालिल कृष्णन कृष्ण मेनन हे एक भारतीय राजनैतिक आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री (सन १९५७) होते. सन १९४७ ते सन १९५२ या कालावधीत मेनन यांना ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले गेले होते. 

मेनन सन १९५४ मध्ये पद्म विभूषण या भारताच्या दुसर्‍या सर्वश्रेष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले व्यक्ती होते. लंडनमध्ये मेनन यांची ‘इंडियन लीग’च्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका होती.