देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्यमॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. 


तसेच या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून, त्यासाठी आपण सर्व एकत्रितरीत्या जबाबदार सामाजिक घटक म्हणून काम करूया. त्यांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करून प्रगतशील देश घडवू, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी या कार्यक्रमात केले.

देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.‘जागतिक माहिती तंत्रज्ञान परिषद २०१८’ चा हैदराबादमध्ये शुभारंभ
हैदराबादमध्ये १९ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘जागतिक माहिती तंत्रज्ञान परिषद २०१८’ (World Congress on Information Technology) चा शुभारंभ करण्यात आला आहे. 

२२ व्या WCIT सोबतच याप्रसंगी ‘NASSCOM इंडिया लीडरशिप फोरम (ILF)’ याचेही उद्घाटन करण्यात आले.

तीन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे NASSCOM हे आयोजक आहेत. विडियो कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (NASSCOM) हे भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) उद्योगाची व्यापार संघटना आहे. याची सन १९८८ मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. 

NASSCOM ही एक जागतिक व्यापार संघटना आहे, ज्याचे जगभरात २००० हून अधिक सदस्य आहेतGDP काढण्यासाठी आधारभूत वर्ष म्हणून २०१७-१८ हे करण्यात येणार
भारत सरकारने सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) काढण्यासाठी पूर्वीच्या आधारभूत वर्षाला बदलून ते २०१७-१८ हे करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) आणि किरकोळ महागाईसाठी २०१८ हे वर्ष ठरविण्यात आले आहे.

वर्तमानात GDP आणि IIP याची गणना करण्यासाठी वर्ष २०११-१२ हे तर CPI, किरकोळ महागाई यासाठी २०११-१२ हे आधारभूत वर्ष मानून त्या सालच्या किंमतींना संदर्भ पकडला जातो.

कोकरनाग गावात जम्मू-काश्मीरचे पहिले ग्रामीण व्यापार केंद्र उघडण्यात आले
अनंतनाग जिल्ह्याच्या कोकरनाग गावात जम्मू-काश्मीरचे पहिले ग्रामीण व्यापार केंद्र (rural mart) उघडण्यात आले आहे.

राज्यामधील महिला बचत गटांद्वारा तयार करण्यात आलेल्या हस्तकला उत्पादनांच्या खरेदी-विक्रीला प्रोत्साहन आणि बाजारपेठ तयार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) च्या ‘रूरल मार्ट’ या योजनेंतर्गत हे केंद्र उभारण्यात आले आहे.

भारतात कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी ‘NABARD अधिनियम-१९८१’ अन्वये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याची स्थापना करण्यात आली. 

NABARD कडे कृषी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकासासाठी कर्ज यासारख्या सुविधा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सध्या NABARD मध्ये ९९.६% भागीदारी केंद्र शासनाची तर उर्वरित भारतीय रिजर्व बँकेची आहे.रॉजर फेडररने रॉटरडॅम ओपनचे विजेतेपद जिंकले
स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने नेदरलँडमध्ये खेळल्या गेलेल्या ‘रॉटरडॅम ओपन २०१८’ स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

स्पर्धेच्या अंतिम लढतीत फेडररने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवचा पराभव करून त्याच्या कारकीर्दीतला ९७ वा किताब जिंकला.

रॉटरडॅम ओपन (किंवा ABN AMRO वर्ल्ड टेनिस टूर्नामेंट) स्पर्धा सन १९७२ पासून नेदरलँडच्या रॉटरडॅम शहरात खेळली जात आहे. ही स्पर्धा ATP वर्ल्ड टूरच्या ५०० मालिकांचा एक भाग आहे.रियाधमध्ये भारत-सौदी अरब संयुक्त आयोगाची १२ वी बैठक आयोजित
सौदी अरबच्या रियाधमध्ये भारत-सौदी अरब संयुक्त आयोगाची १२ वी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भारताचे वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या नेतृत्वात एक प्रतिनिधीमंडळ १८-१९ फेब्रुवारी २०१८ रोजी चालणार्‍या या बैठकीत उपस्थित आहेत.‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग’ चित्रपटाला ५ ब्रिटिश बाफ्टा चित्रपट पुरस्कार
लंडनमध्ये आयोजित ७१ व्या ‘ब्रिटिश बाफ्टा चित्रपट पुरस्कार’ समारंभात ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग’ चित्रपटाने ५ पुरस्कार जिंकलेत. 

मार्टिन मॅकडॉनफ दिग्दर्शित ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग’ चित्रपटाला आउटस्टँडिंग ब्रिटिश फिल्म, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सॅम रॉकवेल), सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (फ्रांसिस मॅकडोरमंड) आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब दिला गेला.

ब्रिटिश बाफ्टा चित्रपट पुरस्कार ‘ब्रिटिश अॅकेडमी ऑफ फिल्म अँड टेलीव्हिजन आर्ट्स (BAFTA)’ कडून दिला जातो.