बालकृष्ण दोशी यांना वास्तुरचना क्षेत्रातला ‘प्रित्झकर’ पुरस्कार 
भारताचे प्रसिद्ध वास्तुरचनाकार बालकृष्ण दोशी यांना प्रतिष्ठित ‘प्रित्झकर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.


‘प्रित्झकर’ पुरस्कार वास्तुरचना (Architecture) क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍याला दिला जातो. हा पुरस्कार वास्तुकलारचना जगतातला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.


बालकृष्ण दोशी हे पुणे (महाराष्ट्र) येथील रहिवासी आहेत. ते व्यापक स्वरुपात स्वस्त गृहनिर्माण प्रकल्पांसाठी ओळखल्या जातात. 90 वर्षीय दोशी हा सन्मान प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत. 

ते स्कूल ऑफ आर्किटेक्चर (अहमदाबाद) चे प्रथम संस्थापक संचालक, स्कूल ऑफ प्लॅनिंग याचे प्रथम संस्थापक संचालक, सेंटर फॉर एनवायरनमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी याचे प्रथम संस्थापक डीन, तसेच व्हिज्युअल आर्ट्स सेंटर (अहमदाबाद) याचे संस्थापक सदस्य आणि अहमदाबादच्या कनोरिया सेंटर ऑफ आर्ट्स याचे संस्थापक संचालक आहेत. बिप्लब देब – त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री 
त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून बिप्लब देब यांनी ८ मार्च २०१८ रोजी पदाची शपथ घेतली.

बिप्लब देब हे भारतीय जनता पक्षाचे नेता आहेत. त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ३५ तर IPFT ने ८ जागांवर विजय संपादन केला. यावेळी भाजपाने २५ वर्षापासून कॉंग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात प्रथमच विजय प्राप्त केला.‘विंग्स इंडिया २०१८’ कार्यक्रमाचा शुभारंभ 
हैदराबादमध्ये ‘विंग्स इंडिया २०१८’ नामक चार दिवसीय द्वैवार्षिक कार्यक्रमाचा ८ मार्च २०१८ रोजी शुभारंभ करण्यात आला आहे.

‘इंडिया-ग्लोबल एव्हिएशन हब’ या विषयाखाली कार्यक्रमाचे आयोजन नागरी उड्डयन मंत्रालय आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण आणि FICCI यांच्याद्वारे करण्यात आले आहे. यावर्षी FICCI प्रथमच हवाई वाहतूक क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेसाठी ‘विंग्स इंडिया पुरस्कार’ देण्याचे सुरू करणार आहे. 

हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपन्या/संस्था/संघटनांना 14 श्रेणींमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

‘विंग्स इंडिया’ हा राज्य, हवाई वाहतूक क्षेत्रातले जागतिक उद्योजक आणि भागधारक यांच्यातील संवाद, गठबंधन, गुंतवणूक आणि हवाई संपर्क या गोष्टींसाठीचा एक मंच आहे.


२०१७ मध्ये भारत-चीन द्विपक्षीय व्यापार $84.44 अब्जच्या ऐतिहासिक उच्चांकावर 
भारत-चीन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापाराने २०१७ मध्ये USD 84.44 अब्ज (जवळजवळ 5,47,982 कोटी रुपये) चा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

चीनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सामान्य सीमाशुल्क प्रशासनाच्या आकड्यांनुसार, २०१७ मध्ये चीनचा भारताकडे निर्यात व्यापार जवळजवळ 40% वाढून USD 16.34 अब्जपर्यंत पोहचला. तर द्विपक्षीय व्यापारात 18.63% वाढ झाली. ही उच्चांक पातळी प्रथमच गाठली गेली आहे.आशियाई तिरंदाजीमध्ये भारताला ३ सुवर्णासह एकूण पाच पदके 
बॅंकॉक (मलेशिया) मध्ये खेळल्या गेलेल्या ‘२०१८ आशिया चषक तिरंदाजी स्टेज-१’ स्पर्धेत भारताला ३ सुवर्ण आणि २ कांस्य अशी एकूण पाच पदके प्राप्त झाली आहेत.

गोरा हो, आकाश आणि गौरव लांबे या भारतीय चमूने रिकर्व टीम प्रकारात मंगोलियाच्या चमुचा पराभव करत स्पर्धेच्या सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर आणखी दोन सुवर्णपदक प्रोमिला दाईमरे आणि मुस्कान किरार यांनी वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. महिला रिकर्व प्रकारात भारताच्या मधु वेदवान हिने तर भारतीय कंपाउंड महिला गटाने भारताला दोन कांस्यपदके जिंकून दिलीत.जुनिपर कोब्रा २०१८ – अमेरिका आणि इस्रायल यांचा संयुक्त सैन्याभ्यास 
४ मार्च ते १५ मार्च २०१८ या काळात अमेरिका आणि इस्रायल यांचा संयुक्त सैन्याभ्यास ‘जुनिपर कोब्रा २०१८’ इस्रायल मध्ये सुरू आहे.

हा द्वैवार्षिक युद्धसराव इस्रायली लष्कर आणि अमेरिकन युरोपियन कमांड (USEUCOM) यांच्यात सुरू आहे. सैन्याभ्यासामध्ये अमेरिकाकडून २५०० तर इस्रायलकडून २००० सैनिकांचा सहभाग आहे. यादरम्यान क्षेपणास्त्र हल्ला हाताळण्यासाठी विशेष सराव केला जात आहे.