कोचीमध्ये ‘वैश्विक डिजिटल शिखर परिषद’ आयोजित 
केरळच्या कोची शहरात २२-२३ मार्च २०१८ रोजी ‘वैश्विक डिजिटल शिखर परिषद (#फ्युचर)’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


परिषदेत ‘टेक्नॉलजी डिसरप्शन अँड इंक्लूजन’ या प्रमुख विषयावर चर्चा केली जाणार आहे. येत्या ५-१० वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात व्यवसायाच्या संधी शोधण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



टाटा सन्स समूहाचे एन. चंद्रशेखरन यांची IISc कोर्टच्या अध्यक्षपदी निवड 
टाटा सन्स या उद्योग समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची २०१८ ते २०२१ या कालखंडासाठी ‘भारतीय विज्ञान संस्था (IISc)’ च्या सर्वोच्च न्यायीक मंडळाचे (IISc कोर्ट) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

चंद्रशेखरन IISc कोर्टचे ८ वे अध्यक्ष आहेत आणि त्यांची ही निवड ISRO चे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या जागेवर झाली आहे.

IISc कोर्ट हे भारतीय विज्ञान संस्थेची सर्वोच्च समिती असते, ज्यामध्ये संस्थेचे वरिष्ठ शिक्षक आणि भारत सरकार, कर्नाटक सरकार, उद्योग आणि नागरी समाजाचे प्रतिष्ठित प्रतिनिधींचा समावेश असतो.

बेंगरुळूमधील भारतीय विज्ञान संस्था (IISc) याची स्थापना १९०९ साली नामवंत उद्योगपती जमसेठजी नुसरवानजी टाटा आणि त्यांच्यानंतर म्हैसूरचे महाराज कृष्णराज वोडेयार यांनी केली.



नेपाळ क्रिकेट संघाला प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला
नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त केला आहे. 

हरारेमध्ये क्रिकेट विश्वचषक पात्रतेमध्ये पापुआ न्यू गिनी विरूद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासोबतच नेपाळने हा ऐतिहासिक क्षण देशाच्या इतिहासात नोंदवला.


मॉरीशसच्या राष्ट्रपती अमीनाह गुरीब-फकीम यांचा राजीनामा 
मॉरीशसच्या राष्ट्रपती अमीनाह गुरीब-फकीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

५८ वर्षीय अमीनाह गुरीब-फकीम या आफ्रिकेमधील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत. त्यांच्यावर असा आरोप लावण्यात आला आहे की, एका NGO कडून मिळालेल्या बँक कार्डचा त्यांनी वैयक्तिक खरेदीसाठी वापर केला. 

त्या १२ मार्चला ५० व्या स्वातंत्र्यदिनानंतर पदावरून हटणार.

अमीनाह गुरीब-फकीम आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि जीवशास्त्र तज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्या २०१५ सालापासून राष्ट्रपतीपद सांभाळत होत्या.

मॉरीशस आफ्रिका खंडाच्या तटावरील दक्षिण-पूर्व क्षेत्रातला एक बेट राष्ट्र आहे. पोर्ट लुईस हे राजधानी शहर आहे आणि मॉरीशस रुपया हे चलन आहे.



नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टवर स्वच्छता मोहीमेला सुरुवात 
नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टवर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मोहिमेत पर्यटकांनी मागे सोडलेला जवळजवळ १०० टन कचरा हवाई मार्गे उचलण्यात येणार आहे. 

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे १२०० किलोचा कचरा स्थानिक खाजगी विमानाने काठमांडूला नेण्यात आला. 

माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतराजीतील या शिखराची उंची ८८४८ मीटर (२९००२ फूट) इतकी आहे. ते नेपाळ व चीन (तिबेट) या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला ‘सगरमाथा’ तर तिबेटमध्ये ‘चोमो लुंग्मा’ म्हणून ओळखतात. 

हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या शिखरावर पहिली चढाई १९५३ साली ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली.