मालदीवचा बहुराष्ट्रीय नौदल सरावास नकार
पुढील महिन्यात भारताने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय नौदल सराव कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण मालदीवने नाकारले असून, मालदीवमधील आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचे स्पष्टीकरण दिले.


या सरावापासून दूर राहण्याचे कारण देताना मालदीवच्या नौदल अधिकाऱ्यांनी सावधपणे त्यांचे म्हणणे मांडले की, ‘या नौदल सरावात मालदीवच्या नौदलाचे अधिकारी हे केवळ प्रक्षेक म्हणून असतील, त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही फार लक्षणीय नसेल.’

भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या या आठ दिवसांच्या नौदल सराव कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर मालदीवच्या दिल्लीतील दूतावासातून या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची माहिती मिळाली.

यापूर्वी नौदल सराव कार्यक्रम 1995 साली पहिल्यांदा पाच नौदलांबरोबर, क्षेत्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने केला होता. यात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, न्यूझिलंड आणि ओमान या देशांच्या नौदलाचा सहभाग होता.विद्यापीठांच्या मानांकनात आयआयटीची घसरण 
2018 सालासाठीचे ‘द क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी’ रँकिंग जाहीर करण्यात आले असून, त्यात प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक विषयांमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) आणि आयआयटी खरगपूर या ‘अभियांत्रिकी- खनिज व खाणकाम’ या विषयात पहिल्या 50 क्रमांकातील स्थान राखण्यात यशस्वी झाल्या असल्या, तरी त्यांची क्रमवारी घसरली आहे.

आयआयटी (आयएसएम) 29व्या, तर आयआयटी खरगपूर 40व्या क्रमांकावर आहे. गेल्या चार वर्षांशी तुलना करता, विषयनिहाय श्रेणीच्या पहिल्या पन्नास (‘टॉप 50’) यादीत स्थान मिळवण्यात केवळ तीन भारतीय संस्था यशस्वी ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी असलेल्या 109व्या स्थानाच्या तुलनेत यंदा केवळ 20 भारतीय संस्था ‘सर्वोच्च 100’च्या यादीत आहेत.

तसेच ताज्या श्रेणीकरणानुसार, ‘इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी’ या विषयाने सर्वोत्तम कामगिरी केली असून, टॉप 100 मधील तीन विद्यापीठांसह 10 विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवले आहे.चंदीगडमध्ये ‘उड्डयन बहू-कौशल्य विकास केंद्र’चे उद्घाटन 
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री पी. अशोक गजपती राजू यांच्या हस्ते हरियाणाच्या चंदीगडमध्ये ‘उड्डयन बहू-कौशल्य विकास केंद्र (MSDC)’ याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

उड्डयन बहू-कौशल्य विकास केंद्र (Aviation Multi Skill Development Centre -MSDC) हा त्याच्या प्रकारचा एकमेव असा भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) चा CSR उपक्रम आहे. हे केंद्र राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) च्या सहकार्याने स्थापन करण्यात आले आहे आणि याला भारताच्या अंतराळशास्त्र व उड्डयन क्षेत्र कौशल्य परिषद (AASSC) या संस्थेचे समर्थन लाभलेले आहे.

देशात नागरी विमानवाहतूक क्षेत्रात झालेल्या भरभराटीमुळे विमानातील कुशल कर्मचार्‍यांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुढील 3 वर्षांत विमानासंबंधी रोजगा
राभिमुख 8 विषयात 2,400 युवांना प्रशिक्षित केले जाणार आहे. 


दिल्लीत दुसरी भारत-कोरिया व्यापार परिषद संपन्न 
नवी दिल्लीत 27 फेब्रुवारी 2018 रोजी दुसरी भारत-कोरिया व्यापार शिखर परिषद पार पडली.

या परिषदेचा मुख्य उद्देश्य म्हणजे भारत आणि कोरिया यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून विशेष धोरणात्मक संबंध तयार करणे. परिषदेत 200 हून अधिक व्यापार प्रतिनिधींचा सहभाग होता. आशियात भारत आणि कोरिया या अनुक्रमे तिसरी व चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहेत.चिल्का सरोवर – इरावडी डॉल्फिनसाठी जगातले सर्वात मोठे निवासक्षेत्र 
ओडिशामधील चिल्का सरोवर 155 इरावडी डॉल्फिनसह जगातले इरावडी डॉल्फिनचे सर्वात मोठे निवासक्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

चिल्का सरोवर ओडिशा प्रदेशातल्या सागरी अप्रवाही पाण्यात बनलेले एक सरोवर आहे. हे भारतातले सर्वात मोठे आणि जगातले दुसरे सर्वात मोठे सरोवर आहे. सरोवरचा परिसर 70 किलोमीटर लांबीचा आणि 30 किलोमीटर रुंदीत पसरलेला आहे. हा समुद्राचाच एक भाग आहे, जो महानदीमधून वाहत आलेली माती जमा झाल्यामुळे समुद्रापासून वेगळे होऊन एका सरोवराच्या रूपात तयार झाला आहे.कांची कामाकोटी मठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन 
कांची कामाकोटी मठाचे जेष्ठ शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 28 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती कांची कामकोटी पीठाचे 69 वे शंकराचार्य होते. त्यांचा जन्म 18 जुलै 1935 रोजी झाला. ते सन 1954 मध्ये शंकराचार्य बनले.ब्रिटनच्या जॉन इंन्स सेंटरची ‘जानकी अम्माल शिष्यवृत्ती’ योजना 
वनस्पती आणि सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधनामध्ये गुंतलेल्या ब्रिटनमधील जॉन इंन्स सेंटर या संस्थेनी ‘जानकी अम्माल शिष्यवृत्ती’ योजना सुरू केली आहे.

जानकी अम्माल शिष्यवृत्ती योजना विकसनशील देशांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. संस्थेत वनस्पती आणि सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करू इच्छिणार्‍या 88 पात्र देशांच्या पदव्युत्तर संशोधकांना ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार.

डॉ. जानकी अम्माल या एक भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ होत्या. त्या वनस्पती शास्त्रात PhD प्राप्त करणार्‍या भारतामधील प्रथम स्त्रियांपैकी एक होत्या. त्या 1930 च्या दशकात आणि त्यानंतर सन 1940-1945 या काळात जॉन इंन्स हॉर्टिकल्चरल इंस्टिट्यूशनमध्ये कार्यरत होत्या.