चंद्रावर पुढील वर्षी सुरु होणार व्होडाफोनची फोर जी सेवा 
चंद्रावर पुढील वर्षांपर्यंत फोर जी नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे असे व्होडाफोन या ब्रिटिश टेलिकॉम कंपनीने म्हटले आहे.


चंद्रावर पहिले फोर जी नेटवर्क सुरू करण्याची योजना 2019 मध्ये पूर्ण होईल. तसेच नासाचे चांद्रवीर चंद्रावर गेल्याच्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता तेथे मोबाइलचे फोर जी नेटवर्क पोहोचणार आहे.

तर पुढील वर्षी केप कॅनव्हरॉल येथून स्पेस एक्सच्या फाल्कन 9 अग्निबाणाच्या मदतीने अवकाशयान सोडले जाईल. चंद्रावर फोर जी सेवा 1800 मेगाहर्टझ्ला सुरू होणार असून, त्याच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाची एचडी चित्रे पृथ्वीवर पाठवली जातील.

तसेच नोकिया बेल लॅब्स या फोर जी सेवेसाठी लागणारे उपकरण तयार करणार आहे. बेस स्टेशन व ऑडी ल्युनर क्वाट्रो रोव्हर्स यांच्यात त्यामुळे फोरजी सेवेतून संपर्क असणार आहे.रॉजर फेडर जागतिक क्रीडा पुरस्काराने सन्मानित 
जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान घेणाऱ्या रॉजर फेडरला ह्या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम पुनरागमन करणारा खेळाडू असे दोन्ही लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्कार मिळाले आहेत.

सर्वोत्तम खेळाडूसाठी फेडररला रॅफेल नदाल या टेनिसपटूबरोबरच ख्रिस्तियानो रोनाल्डो या फुटबॉलपटूचे आव्हान होते. त्यांना मागे टाकून फेडररने हा मान मिळवला आहे.

महिलांमध्ये सेरेना विल्यम्सला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तिने गतवर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकून कारकीर्दीमधील 23 या ग्रँड स्लॅम विजेतेपदाची नोंद केली होती.

अन्य विजेते :-

वर्ल्ड स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर – सेरेना विल्यम्स (अमेरिका)
टिम ऑफ द इयर – मर्सिडीज F1
वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर (दिव्यांग) – मार्सेल हग (स्वित्झर्लंड)
जीवनगौरव पुरस्कार – एडविन मोसेस (अमेरिका)


खासदारांचा भत्ता वाढविण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजूरी 
केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेच्या खासदारांचा भत्ता वाढविण्यासाठीच्या प्रस्तुत प्रस्तावाला मंजूरी देत खालील नियमांमध्ये दुरूस्ती करण्यास मंजूरी दिली आहे

निवास व टेलीफोन सुविधा (संसद सदस्‍य) नियम-1956 – संसद सदस्यांच्या निवासस्थानी बैठकीच्या समानासाठी 1 लक्ष रुपये भत्ता (पूर्वी 75,000 रुपये) (पाच वर्षांमध्ये एकदा) ऑगस्ट 2006 पासून ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा

संसद सदस्‍य (मतदारसंघ भत्‍ता) नियम-1986 – मतदारसंघ भत्‍ता मासिक 70,000 रुपये (पूर्वी 45,000 रुपये)

संसद सदस्‍य (कार्यालय खर्च भत्‍ता) नियम-1988 – कार्यालयीन खर्चाचा भत्ता मासिक 60,000 रुपये (पूर्वी 45,000 रुपये)हरमनप्रीत कौर बनली पोलीस उप-अधिक्षक 
भारतीय महिला क्रिकेट संघाची टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर आता आणखी एक जबाबदारी असणार आहे.

महिला विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्वाचा वाटा असलेल्या हरमनप्रीतला अखेर पंजाब पोलिसांमध्ये पोलिस उप-अधिक्षक पदावर रुजू करुन घेण्यात आलेलं आहे.

तसेच पंजाब पोलिसांमध्ये दाखल होण्याआधी हरमनप्रीत कौर भारतीय रेल्वेचं प्रतिनिधीत्व करत होती. मात्र मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हरमनप्रीतला रेल्वेच्या सेवेतून मुक्त करण्यात आलं आहे.गुगलची मशीन लर्निंग एज्युकेशन सुविधा
आपली ‘मशीन लर्निंग एज्युकेशन’ सुविधा सर्वांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.

गुगलच्या वतीने ‘लर्न विथ गुगल एआय’ ही सुविधा सुरू केली ज्यात याचा समावेश आहे.

यामुळे लोकांना संकल्पना, विकासक कौशल्ये आणि वास्तविक जगातील समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर कसा करावा, हे शिकता येणार आहे. गुगल ने ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे.