भारतीय नौदलाचे ‘INS गंगा’ जहाज सेवेतून निवृत्त 
स्वदेशी बनावटीचे ‘INS गंगा’ हे जहाज भारतीय नौदलातील तीन दशकांची सेवा पूर्ण झाल्यानंतर २२ मार्चला सेवेतून निवृत्त झाले आहे.


३० डिसेंबर १९८५ रोजी ‘INS गंगा’ भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू करण्यात आली. INS गंगा प्रकल्पाच्या पुढाकारामुळे भारताने युद्धनौका बांधणीच्या क्षमतेसाठी एक मोठे पाऊल पुढे टाकले होते.२०१८ हे ‘ज्वारी-बाजरीचे राष्ट्रीय वर्ष’ भारत सरकार 
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांनी २२ मार्चला २०१८ हे ‘ज्वारी-बाजरीचे राष्ट्रीय वर्ष(National Year of Millets)’ घोषित केले आहे.

पोषणविषयक गरजा आणि सुरक्षा साध्य करण्यासाठी एक अभियान म्हणून ज्वारी, रागी व बाजरी यासारख्या धान्यांची लागवड करण्यास भारत सरकार प्रोत्साहन देत आहे. 

यावर्षी कडधान्य योग्य दरात खरेदी केले जाणार आणि त्यांचा ‘मध्यान्ह भोजन’ योजनेत तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (PDS) समावेश करण्यात येत आहे.स्वदेशी साधकासह प्रथमच ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची चाचणी 
राजस्थानच्या पोखरण चाचणी क्षेत्रात भारतीय लष्कराने प्रथमच स्वदेशी साधक (indigenous seeker) याने सज्ज असलेले भारताचे सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ याची यशस्वी चाचणी घेतली आहे.

ब्रह्मोस कॉरपोरेशनचे ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र भारत आणि रशिया संबंधातून विकसित करण्यात आले आहे. ‘ब्रह्मोस कॉरपोरेशन’ भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची NPO मशीनोस्त्रोयेनिशिया यांचा एक संयुक्त उपक्रम (JV) आहे. 

ब्रह्मोस (BrahMos) हे नाव भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मस्कवा नदीवरून ठेवण्यात आले आहे. ब्रह्मोस जवळपास ३०० किलोचे विस्फोटक वाहून नेण्यास सक्षम आहे. ब्रह्मोसच्या नावावर सर्वाधिक गतिमान सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा जागतिक विक्रम आहे. याची गती ताशी सुमारे 3400 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. 

भारतीय सेवेत ब्रह्मोस २००६ सालापासून आहे. हे एयर लॉंच्ड क्रुज क्षेपणास्त्र (ALCM) जल-थल-वायू अश्या तीनही परिस्थितीत भारतीय सेवेत आहे.


आंध्रप्रदेश शासनाच्या ‘नैपुण्य रथम’ किंवा ‘वर्ल्ड ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ 
आंध्रप्रदेश राज्य शासनाकडून २२ मार्चला अमरावतीत ‘नैपुण्य रथम’ किंवा ‘वर्ल्ड ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी यावर्षी मे महिन्यांत आणखी १२ गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

‘नैपुण्य रथम’ हे एक बहु-उपयुक्तता वाहन, जे राज्याच्या दूरगामी भागात तंत्रज्ञानाची सोय उपलब्ध करून देणार आहे. राज्याच्या ‘स्मार्ट व्हीलेज स्मार्ट वार्ड’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, ‘नैपुण्य रथम’ डिजिटल साक्षरता, डिजिटल कौशल्य सुधारण्यासाठी आणि राज्यात सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांविषयी जागरुकता निर्माण करण्याची सुविधा देते.कृष्णपट्टणम बंदर अधिकृत इमिग्रेशन चेक पोस्ट 
भारत सरकारने आंध्रप्रदेशातील क्रिष्णापट्टणम सागरी बंदराला एक अधिकृत ‘इमिग्रेशन चेक पोस्ट (आवागमन तपास नाका)’ म्हणून मान्यता दिली आहे.

या अधिकृततेमुळे सर्व श्रेणीतील सर्व प्रवाशांसाठी वैध प्रवास कागदपत्रांसह भारतातून बाहेर जाण्याकरिता वा भारतात प्रवेश करण्याचे कार्यास अधिकार प्राप्त झाले आहेत. हा निर्णय ८ फेब्रुवारी २०१८ पासून लागू आहे.जागतिक हवामान दिन २३ मार्च 
‘वेदर-रेडी, क्लायमेट-स्मार्ट’ या विषयाखाली जगभरात ‘जागतिक हवामान दिन २०१८’ पाळला जात आहे.

१९५० साली २३ मार्चला जागतिक हवामानशास्त्र संघटना (World Meteorological Organisation -WMO) स्थापन करण्यात आले. हवामान खात्याशी संबंधित WMO ही एक वैश्विक संघटना आहे आणि १९१ देश व प्रदेश याचे सभासद आहेत. हा दिवस सर्व सदस्य देशांमध्ये पाळला जातो. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्यार्‍या ३१ देशांमध्ये भारत देखील होता.

WMO पृथ्वीची वातावरणीय परिस्थिती आणि व्यवहार, महासागरांसोबतचे संबंध, हवामान आणि परिणामस्वरूप जलस्त्रोतांच्या वितरणासंबंधी माहिती याबाबतीत संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकृत संस्था आहे. जगभरात हवामानावर लक्ष ठेवणारी ‘वर्ल्ड वेदर वॉच’ ही प्रणाली सुरु असून ती आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक मानली जाते.


जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक आंतर-शासकीय संघटना आहे, ज्याचे जगभरात १९१ सदस्य देश आहेत. 

१८७३ साली ‘आंतरराष्ट्रीय हवामान संघटना’ या नावाने संस्था कार्यरत झाली. पुढे तिला १९५० साली WMO ने पुनर्स्थित करण्यात आले. WMO चे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.