भारतात होणार्‍या बालविवाहांत घट 
जगभरात बालविवाहांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून मागच्या दशकात ही संख्या वेगाने कमी झाल्याचे युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 


२.५ कोटी बालविवाहांवर प्रतिबंध घालण्यात यश आल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. हे प्रमाण कमी होण्यामध्ये दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारताच्यादृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब आहे.

भारतात किशोरवयीन लोकसंख्येपैकी २० टक्क्यांहून अधिक किशोरवयीन भारतात आहेत. त्यातही दक्षिण आशियामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. असे युनिसेफच्या बालसंरक्षण विभागाचे प्रमुख जावियर एग्लिवार यांनी सांगितले आहे.

मागील दशकात १८ वर्षाच्या आधी लग्न होणाऱ्या मुलींचे प्रमाण भारतात जवळपास ४७ टक्के होते. हे प्रमाण आता कमी झाले असून २७ टक्क्यांपर्यंत आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आह

भारतात लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ आहे. बालविवाहाच्या संदर्भात कडक कायदेही आहेत. भारतात बालविवाह लावल्यास त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांना १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो.भारतीय नौदलाचा ‘ENCORE’ युद्धसराव संपन्न 
गुजरातजवळ उत्तर अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा दोन महिने चाललेला ‘ENCORE (ईस्टर्न नेव्हल कमांड ऑपरेशनल रेडीनेस एक्झरसाइज)’ नामक युद्धसराव यशस्वीपणे पार पडला.

पूर्व सागरी क्षेत्रातला हा युद्धसराव गुजरातच्या जवळ उत्तर अरबी समुद्राच्या प्रदेशापासून ते इंडोनेशिया जवळ सुंदा खाडी जवळच्या दक्षिण हिंद महासागर पर्यंतच्या क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता.

सरावात लष्करी सैन्य व उपकरणे तसेच हवाई दलाची सर्व प्रकारची विमाने आणि तटरक्षक दलाची जहाजे व विमाने यांच्या समवेत भारतीय नौदलाची कार्यरत जहाजे, पाणबुड्या आणि विमानांचा सहभाग होता.विश्वनाथन आनंदने ताल मेमोरियल रॅपिड चेसचा किताब जिंकला 
मॉस्को (रशिया) येथे खेळल्या गेलेल्या ‘२०१८ ताल मेमोरियल रॅपिड चेस’ या बुद्धिबळ स्पर्धेचा किताब भारताच्या विश्‍वनाथन आनंदने जिंकला आहे.

आनंदने अंतिम फेरीत इस्रायलच्या बोरिस गेलफेंड यांच्या सोबतची लढत ड्रॉ केली आणि किताब आपल्या नावे करून घेतला. आनंदने चार विजयी आणि चार ड्रॉ फेर्‍या खेळल्या.


१० खेळाडूंच्या राउंड रोबिन स्पर्धेत मामेदयारोव, रशियाचा सरगेई कारजाकिन आणि नाकामुरा हे संयुक्त रूपाने दुसर्‍या स्थानी होते.हॅरी अथवाल यांना ‘प्राइड ऑफ बर्मिंगहॅम’चा सर्वोत्कृष्ट वीरता पुरस्कार 
इंग्लंडच्या बर्मिंगहॅममधील भारतीय वंशाच्या हॅरी अथवाल याला ‘प्राइड ऑफ बर्मिंगहॅम’चा सर्वोत्कृष्ट वीरता पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण ८ मार्चला होणार आहे.

४५ वर्षीय हॅरी अथवालने २०१७ साली बार्सिलोना दहशतवादी हल्ल्यात आपल्या जीवाची पर्वा न करता सात वर्षीय जुलियन एलेसंद्रो कॅडमॅन (ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन नागरिक) नावाच्या जखमी मुलाची मदत केली होती. या धैर्याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जात आहे.


चीन २०१९ साली सर्वाधिक क्षमतेचे ‘लोंगमार्च 5B’ प्रक्षेपक अंतराळात सोडणार 
चीन २५ टन (२५००० किलोग्राम) वजनी भार पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यामध्ये सक्षम अश्या ‘लॉन्गमार्च 5B’ या वाहक प्रक्षेपकाला २०१९ साली अंतराळात सोडणार आहे.

चीनचा सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक म्हणून तयार करण्यात आलेला ‘लॉन्गमार्च 5’ पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) २५ टन तर भूस्थिर हस्तांतरण कक्षेत (GTO) १४ टन वजनी भार वाहून नेण्याची क्षमता ठेवतो. 

मानव अंतराळ अन्वेषण योजनेसाठी चीन प्रयत्नशील असून मानव मोहिमांसाठी असे प्रक्षेपक तयार करीत आहे.कृष्णा कुमारी कोहली पाकिस्तानमधील पहिली दलित महिला सिनेटर 
कृष्णा कुमारी कोहली या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून सिनेटर पदावर निवडून आलेल्या प्रथम दलित महिला सिनेटर ठरल्या आहेत.

शिवाय कृष्णा कोहली पाकिस्तानच्या सर्वोच्च कायदेमंडळात निवडून आलेल्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या आहेत. ३९ वर्षीय कोहली बिलावल भुट्टो जरदारी यांच्या नेतृत्वात असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या बाजूने निवडून आल्या. ही जागा सिंध प्रांतात महिलांसाठी आरक्षित होती.

पाकिस्तान हा दक्षिण आशियामध्ये स्थित एक देश आहे आणि मध्य पूर्व आणि मध्य आशियासाठी प्रवेशद्वार आहे. इस्लामाबाद हे देशाचे राजधानी शहर आहे आणि पाकिस्तानी रुपया हे चलन आहे. लोकसंख्येत हा पाचव्या क्रमांकाचा देश आहे. देशात वर्तमान पंतप्रधान शाहिद खैकान अब्बासी आणि वर्तमान राष्ट्रपती ममून हुसैन हे आहेतभारत  अमेरिकेच्या सरकारी रोख्यांचा १२ वा मोठा परकीय धारक 
२०१७ मध्ये, भारत अमेरिकेच्या सरकारी रोख्यांचा (US securities) १२ वा सर्वात मोठा परकीय धारक बनला आहे.

माहितीनुसार, अमेरिकेच्या सरकारी रोख्यांमध्ये भारताची गुंतवणूक २०१७ सालच्या शेवटी वाढून USD 144.7 अब्जपर्यंत पोहचली. २०१६ सालच्या तुलनेत ही वाढ जवळजवळ USD 26 अब्ज एवढी आहे.

२०१७ साली अमेरिकेच्या सरकारी रोख्यांमध्ये सर्वाधिक USD ११८० अब्ज एवढी गुंतवणूक चीनने केलेली आहे. त्यानंतर जपान (USD १०६० अब्ज) व आयरलँड यांचा क्रमांक लागतो. सौदी अरेबियाची गुंतवणूक USD 147.4 अब्ज एवढी आहे.