भारतीय पशू कल्याण मंडळाचे नवे मुख्यालय आता हरियाणाच्या बल्लभगड येथे 
भारतीय पशू कल्याण मंडळाचे (AWBI) मुख्यालय हरियाणाच्या बल्लभगड येथे हलविण्यात आले आहे. ते आधी चेन्नईमध्ये होते. पशु कल्याणासंबंधी उपक्रम उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला गेला.


भारतीय पशू कल्याण मंडळ (AWBI) याची १९६२ साली ‘पशू विरोधी क्रुरता प्रतिबंधक अधिनियम-१९६०’ अंतर्गत स्थापना करण्यात आली. ही एक वैधानिक सल्लागार संस्था आहे, जी भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला सल्ला पुरवते.



बंगळुरूमध्ये भारताची पहिली हेलीटॅक्सी सेवा कार्यरत 
बंगळुरूमध्ये भारताची पहिली हेलीटॅक्सी सेवा कार्यरत करण्यात आली आहे. ही सुविधा केरळमधील थंबी एव्हिएशन प्रा. लिमि. कंपनी पुरवत आहे.

प्रारंभी हेलीटॅक्सी सेवा सध्या इलेक्ट्रॉनिक सिटी आणि केंपेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या दरम्यान सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे ७० किलोमीटरचा प्रवास १५ मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण केला जाऊ शकतो.



दक्षिण मध्य रेल्वेतील ‘चंद्रगिरी’ स्थानकावर सर्व महिला कर्मचारी सेवेत 
दक्षिण मध्य रेल्वेने गुंटाकल विभागामधील ‘चंद्रगिरी’ स्थानकावर सर्व महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती करत महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे.

‘चंद्रगिरी’ स्थानकावर महिला कर्मचारी ट्रेनसंबंधी कार्ये, तिकिट सेवा, सुरक्षा आणि इतर संबंधित कर्तव्ये यासह दिवसभरातील संपूर्ण कामकाज हाताळणार.



पोखरणमध्ये M777 हॉवित्झर तोफेच्या चाचणीसाठी भारत-अमेरिका एकत्र आले 
भारत आणि अमेरिका यांनी ६ मार्च २०१८ रोजी पोखरण येथील चाचणी क्षेत्रात अमेरिकेच्या M777 अल्ट्रा-लाईट हॉवित्झर तोफेची चाचणी घेतली.

२०१६ साली अमेरिकेसोबत झालेल्या एका करारांतर्गत मे २०१७ मध्ये भारतीय लष्कराकडे BAE सिस्टम निर्मित दोन M777 अल्ट्रा-लाईट हॉवित्झर तोफा सुपूर्द करण्यात आल्या होत्या. त्यांच्या चाचणी दरम्यान झालेल्या अपघाताच्या कारणाचा तपास लावण्यासाठी दोन्ही देशांच्या संयुक्त चमूने ही पुन्हा एकदा चाचणी घेतली.

M777 अल्ट्रा-लाईट हॉवित्झर ही १५५ मिलिमिटर तोफ आहे आणि ही M198 हॉवित्झरला बदलवणार. याचे वजन 4,200 किलोग्राम आहे. ब्रिटनच्या बर्रो-इन-फरनेस मधील VSEL च्या शस्त्रास्त्रे विभागाने UFH विकसित केली आहे.


नील बसू स्कॉटलंड यार्डच्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख 
ब्रिटनमधील स्कॉटलंड यार्डचे भारतीय वंशाचे अधिकारी नील बसू यांना देशाच्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

बसू दलाच्या ‘नॅशनल लीड फॉर काउंटर टेररिजम’ आणि मेट्रोपॉलिटन पोलीसांच्या विशेष अभियानाचे प्रमुख असतील. मार्क राउली यांच्या जागी बसू २१ मार्चपासून पद सांभाळतील. बसू या पदी नियुक्त होणारे आशिया व भारतीय मूळ असलेले पहिले अधिकारी आहेत.

४९ वर्षीय बसू सध्या मेट्रोपॉलिटन पोलीसात उप-सहाय्यक कमिश्नर पदी आहेत. त्यांना विशेष अभियानासाठी सहाय्यक कमिश्नर पदी बढती दिली जाणार आहे.



आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 
‘द टाइम इज नाऊ: रूरल अँड अर्बन अॅक्टिविस्ट्स ट्रान्सफॉर्मिंग विमेन्स लाईव्हज’ या संकल्पनेखाली आज ८ मार्च २०१८ रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे.

१९०९ साली पहिल्यांदा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेमध्ये राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला होता. १९०८ साली कामाच्या परिस्थिती विरोधात न्यूयॉर्कमध्ये महिला कापड कामगारांनी संप पुकारला होता. या घटनेच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या समाजवादी पक्षाने हा दिवस साजरा केला होता.


१९७५ साली ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ या काळात, संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘८ मार्च’ हा दिवस “आंतरराष्ट्रीय महिला दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

१९४५ साली संयुक्त राष्ट्रसंघाची सनद (Charter) यावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. हा महिला आणि पुरुष दरम्यान समता तत्त्व या आधारावर भर देणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार होता. 

भारत सरकारने १९९९ सालापासून ‘नारी शक्ती पुरस्कार’ देण्याचे सुरू केले. हा पुरस्कार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्‍या महिलांना आणि संस्थांना दिला जातो. हा पुरस्कार महिला व बाल विकास मंत्रालयाकडून विविध क्षेत्रातील महिलांना आणि संस्थांना दिला जातो. 

या क्षेत्रांमध्ये सामाजिक उद्योजकता, कला, फलोत्पादन, योग, पर्यावरण संवर्धन, पत्रकारिता, नृत्य, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान अश्या विविध क्षेत्रांचा समावेश केला जातो.

यापूर्वीच्या पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये ISRO च्या अभियंता व शास्त्रज्ञ मुमताज काझी (पहिल्या डिझेल ट्रेन वाहक), पल्लवी फौजदार (मोटरसायकलस्वार) आणि सुनीता चोकेन (गिर्यारोहक) यांची नावे आहेत