नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘टेक्निकल ऑडिट’ अनिवार्य 
राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक लेखापरीक्षण अनिवार्य करण्यात आले आहे.


या संस्थांकडून करण्यात येणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण व्हावीत व त्यामधून टिकाऊ मत्ता निर्माण व्हाव्यात, यासाठी या कामांच्या दर्जाचे त्रयस्थ यंत्रणेकडून अधिक प्रभावी व परिणामकारक तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी सरकारने सुधारित कार्यपद्धती अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.

रस्ते अनुदान, विशेष रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नवीन नगरपंचायती/नगर परिषदांना अनुदान, नगर परिषद व महापालिका हद्दवाढ, महापालिका पायाभूत सुविधा अनुदान, याशिवाय नगरविकास विभागाकडून निधी वितरित करण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश आहे.RBI ‘डेटा सायन्स लॅब’ची स्थापना करणार 

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने RBI मध्ये एक ‘डेटा सायन्स लॅब’ स्थापन करून मोठ्या स्वरुपाच्या माहितीचे विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI ने देशातील देयक प्रणाली चालविणार्‍या सर्व कर्त्यांना भारतातील माहिती साठवून ठेवण्यास सांगितले आहे, ज्यायोगे वापरकर्त्यांच्या माहितीची सुरक्षितता आणि सुरक्षा सुनिश्चित होईल. निर्देशांचे पालन करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.‘उडान’ योजनेंतर्गत पठानकोटमध्ये 21 वे विमानतळ उघडले गेले 
देशामध्ये क्षेत्रीय हवाई संपर्क वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत पंजाबच्या पठानकोटमध्ये 21 वे विमानतळ उघडले गेले
दिल्ली आणि पठानकोट दरम्यान ही पहिलीच विमान सेवा आहे. 

नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सेवा सुरू केली. एयर इंडियाच्या संपूर्ण मालकीची ‘एलायंस एयर’ ही विमानसेवा देत आहे.

एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या UDAN (उडे देश का आम नागरिक) या नावाच्या प्रादेशिक जोडणी योजना (RCS) अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. त्यामधून टियर-2 आणि टियर-3 श्रेणीतील शहरांतल्या 43 विमानतळांना जोडण्यात येत आहे. 

योजनेंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50% भाडे केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे


सायबर हल्ल्याच्या बाबतीत भारत तिसरा सर्वात असुरक्षित देश ठरतो
सुरक्षा समाधान प्रदाता संस्था ‘सिमेंटेक’ च्या ‘इंटरनेट सिक्युरिटी थ्रेट’ अहवालानुसार, सायबर धोक्यांमधील जोखीम जसे मालवेयर, स्पॅम आणि रॅनसमवेयर यांच्या प्रकरणात, 2017 साली भारत तिसरा सर्वात असुरक्षित देश म्हणून समोर आला आहे.

हा अहवाल आठ प्रकारच्या हल्ल्यांवर आधरित आहे, ते आहेत – मालवेयर, स्पॅम, फिशिंग, बॉट्स, नेटवर्क हल्ले, वेब हल्ले, रॅनसमवेयर आणि क्रिप्टोमाइनर्स.

2017 साली 5.09% वैश्विक धोके भारतात आढळून आले होते. 2016 साली ही आकडेवारी 5.11% होती. 
अमेरिका (26.61%) या सायबर हल्ल्यांच्या बाबतीत सर्वाधिक असुरक्षित देश आहे. त्यानंतर चीन (10.95%) चे स्थान आहे.

अहवालानुसार, भारत स्पॅम आणि बॉट्स यांच्याद्वारे प्रभावित होण्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे, जेव्हा की नेटवर्क हल्ल्याच्या बाबतीत तिसरा आणि रॅनसमवेयरमुळे प्रभावित होण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे.

सायबर गुन्हेगार आता ‘क्रिप्टजॅकिंग’ वर कार्य करीत आहेत. क्रिप्टोजॅकिंग सायबर आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी एक वाढता धोका आहे.

क्रिप्टोजॅकिंग एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये हॅकर आपल्या कंप्यूटर, स्मार्टफोनच्या क्षमतेचा वापर करून क्रिप्टोकरंसी माइन करतात. या पद्धतीने हॅकर कंप्यूटर वापरकर्त्याला विना कळवता बॅकग्राउंड जावास्क्रिप्टच्या माध्यमातून सहजरीत्या क्रिप्टोकरंसी कमावतात, म्हणून याला क्रिप्टोजॅकिंग म्हणतात.


या पद्धतीत हॅकरला आपल्या कंप्यूटरमध्ये कोणताही हल्ला करावा लागत नाही. जेव्हा कधी आपण एखाद्या असुरक्षित संकेतस्थळावर भेट देतो, तेव्हा हॅकर आपले काम करतो.रियाध मध्ये तब्बल 35 वर्षांनंतर चित्रपटगृह पुन्हा होणार सुरू 

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे तब्बल 35 वर्षांनंतर चित्रपटगृह पुन्हा सुरू होणार आहेत. 18 एप्रिल रोजी सिनेमागृह सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तसेच सिनेमागृह सुरू करण्याचं पहिलं लायसन्स एएमसी एंटरटेन्मेंटला देण्यात आलं आहे.
तर ही अमेरिकी कंपनी पुढील 5 वर्षांमध्ये सौदी अरेबियाच्या 15 शहरांमध्ये 40 पेक्षा जास्त सिनेमागृह सुरू करणार असल्याची माहिती आहे.

35 वर्षांनी सुरू होणा-या चित्रपटगृहांमध्ये सर्वप्रथम ब्लॅक पॅंथर हा सिनेमा दाखवला जाईल असं सांगितलं जात आहे. 
1970 मध्ये सौदीत काही चित्रपटगृह होते, पण त्यावेळी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती.‘सहयोग-हायऑब्ल्युओग 2018’: भारत आणि कोरिया यांच्या तटरक्षक दलांचा संयुक्त सराव सुरू 

5 एप्रिल 2018 पासून चेन्नई किनारपट्टीजवळ भारत आणि कोरिया यांच्या तटरक्षक दलांचा संयुक्त सागरी सराव सुरू करण्यात आला आहे.

‘सहयोग-हायऑब्ल्युओग 2018’ (SAHYOG- HYEOBLYEOG 2018) सरावात चाचेगिरी-विरोधी मोहीम तसेच शोध आणि बचाव कार्यांचा अभ्यास केला जात आहे.

सरावात कोरियाचे ‘बडारो’ जहाज तर भारताचे ICG शौर्य, राणी अब्बाका, सी-423, सी-431 या जहाजांचा सहभाग आहे