महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांसाठी जागतिक बँकेसोबत $420 दशलक्षचा कर्ज करार 
भारत सरकार, महाराष्‍ट्र राज्य शासन आणि जागतिक बँक यांच्यात USD 420 दशलक्षचा कर्ज करार करार करण्यात आला आहे.


महाराष्ट्राच्या मराठवाडा व विदर्भ क्षेत्रात राहणार्‍या छोट्या व सीमांत शेतकर्‍यांना मदत करण्याच्या उद्देशाने एका प्रकल्पांतर्गत कृषी क्षेत्रात हवामानाच्या दृष्टीने लवचिक अश्या पद्धतींच्या अवलंबनात मदत मिळणार आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होणार. 

‘महाराष्‍ट्र हवामान लवचिकता कृषी योजना’ अंतर्गत १५ जिल्ह्यांमधील ५१४२ गावांना छत्रछायेखाली आणले जाणार आहे.



जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज 

भारत सरकारने ११० लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलरच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल ठेवले आहे. वायूदलाने सुरूवातीची निविदा म्हणजे आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्फर्मेशन) जारी केले आहे.

तसेच सर्व ११० लढाऊ विमाने ही एक किंवा दोन इंजिनची असतील. त्याची निर्मिती विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने होईल.
तर जगातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांसाठी आरएफआय जारी करण्यात आला आहे.

या प्रकल्पावर सुमारे १.१५ लाख कोटी रूपये खर्च होण्याची शक्यता आहे.



उत्तरप्रदेशात गंगा हरीतिमा मोहिमेचा शुभारंभ 

उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ७ एप्रिल २०१८ रोजी वन विभागाच्या ‘गंगा हरीतिमा मोहिम’चे उद्घाटन करण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत गंगा नदीच्या दोन्ही तीरावर १ किलोमीटर अंतरामध्ये वृक्षरोपण करण्यात येणार आहे. गंगा नदीच्या तटावर वसलेल्या राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे.

शिवाय, कुंभ-२०१९ मध्ये सामील ६८४.१९ कोटी रुपयांच्या १५६ प्रकल्पांची कोणशीला ठेवण्यात आली आहे.


भारतीय हवाई दलाचा ‘गगनशक्ती-२०१८’ सराव 
१० एप्रिल ते २३ एप्रिल २०१८ या कालावधीत भारतीय हवाई दलाचा ‘गगनशक्ती-२०१८’ सराव आयोजित करण्यात आला आहे.

हा अभ्यास पाकिस्तानच्या सीमेलगत पश्चिम क्षेत्रात आणि उत्तरेकडील भागात चीनच्या सीमारेषेलगत आयोजित केला गेला आहे.

या सरावात वास्तविक वेळेत परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ११०० पेक्षा जास्त युद्ध, वाहतूक आणि रोटरी विंग (हेलिकॉप्टर) विमानांचा सहभाग आहे.



आंबेडकर जयंतीला ‘ग्राम स्वराज’ मोहिमेचा शुभारंभ 

भारत सरकारने ‘ग्राम स्वराज’ मोहिमेची घोषणा केली आहे, जे १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत राबवले जाणार आहे.

१४ एप्रिल २०१८ रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. मोहिमेमधून गरीब कुटुंबांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती पुरविण्यासाठी लोकांशी संवाद साधला जाणार आहे. 

या मोहिमेंतर्गत ७ कल्याणकारी योजना ठळक केल्या जातील. त्या आहेत –
प्रधान मंत्री जन धन योजना (PMJDY), सुकन्या समृद्धी योजना (SSY), राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (RSBY), राष्ट्रीय सामाजिक मदत योजना, प्रधान मंत्री मुद्रा योजना



कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष पार्क यांना २४ वर्षांची कैद 

दक्षिण कोरियाचे पहिल्या महिला माजी राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून हे यांना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून जिल्हा न्यायालयाने त्यांना २४ वर्षांची कैद ठोठावली आहे. पार्क यांच्यावर लाच घेणे, सत्तेचा दुरुपयोग करण्यासह भ्रष्टाचाराच्या १६ प्रकरणांचा ठपका होता.

राष्ट्राध्यक्ष पदावर असताना अधिकाराचा गैरवापर केल्याचा व फौजदारी गुन्ह्याखाली दोषी आढळून येणाऱ्या पार्क दक्षिण कोरियाच्या तिसऱ्या राष्ट्रप्रमुख ठरल्या आहेत.

यापूर्वी चून डू वॉन, रोन टे-वू यांनाही भ्रष्टाचार व देशविरोधी कारवायांमुळे १९९० च्या दशकात दोषी ठरवण्यात आले होते.