नवी दिल्लीत १६ व्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच मंत्रिस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन 
१६ व्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच मंत्रिस्तरीय (IEF 16) या मेळाव्याचे नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे.


१० एप्रिल २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बैठकीचे उद्घाटन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच (IEF) सदस्य देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रात जागृती वाढविण्यासाठी तयार करण्यात आले आहे. याची स्थापना १९९१ साली करण्यात आली. 

रियाध (सौदी अरब) येथे IEF सचिवालय आहे. याचे ७२ सदस्य देश आहेत. ही जगभरातील ऊर्जा मंत्री, औद्योगिक व्यक्ती आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी सर्वात मोठी बैठक आहे.



राकेश भारती मित्तल CII चे नवे अध्यक्ष 
भारतीय उद्योग संघटना (CII) ने भारती एंटरप्राइजेजचे उपाध्यक्ष राकेश भारती मित्तल यांची अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

वित्त वर्ष २०१८-१९ साठी मित्तल यांनी अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेजचे कार्यकारी उपाध्यक्ष शोबना कामिनेनी यांच्याकडून पदाचा कार्यभार सांभाळला.

भारतीय उद्योग संघटना (Confederation of Indian Industry -CII) ही भारतातील एक व्यवसाय संघटना आहे. याची स्थापना १८९५ साली झाली आणि त्याचे ८३०० सदस्य आहेत. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. CII धोरणाबाबत मुद्द्यांमध्ये भारत सरकारसोबत कार्य करते.



स्वाझीलँडच्या राजाने राष्ट्रपती कोविंद यांना ‘ऑर्डर ऑफ द लायन’ने गौरविले 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाझीलँड या आफ्रिकेतल्या देशाला भेट दिली.

याभेटीत स्वाझीलँडचे राजा मुस्वाती-III यांनी राष्ट्रपती कोविंद यांना देशाच्या सर्वोच्च ‘ऑर्डर ऑफ द लायन’सन्मानाने गौरविले.

दक्षिण आफ्रिकेतील स्वाझीलँड हा एक लहान भूपरिवेष्टित प्रदेश आहे. एमबाबेन, लोबांबा ही या देशाची राजधानी शहरे आहेत.

दोन्ही देशांमध्ये झालेल्या शिष्टमंडळ-स्तरीय बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या गेल्या. हे करार आहेत –

आरोग्य आणि चिकित्सा क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी करार
पारपत्र धारक राजनैतिक आणि अधिकारी यांना व्हिसा सवलत देण्यासाठी करार


भारत, इक्वेटोरीयल गिनी यांच्यात ५ सामंजस्य करार झालेत 
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी इक्वेटोरीयल गिनी (विषवृत्तीय गिनी) या आफ्रिकेतल्या राष्ट्राचा दौरा केला.

गिनीचे राष्ट्रपती टिओडोरो ओबीयांग नगुएमा मबासोगो यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी ५ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. 

  • आरोग्य व चिकित्सा क्षेत्रात सहकार्यासाठी 
  • औषधी वनस्पती क्षेत्रात सहकार्यासाठी
  • पारपंरिक चिकित्‍सा पद्धती क्षेत्रात सहकार्यासाठी
  • भूशास्त्र व खनिज स्त्रोत क्षेत्रात सहकार्यासाठी
  • माहिती व दळणवळण क्षेत्रात सहकार्यासाठी

शिवाय भारताद्वारे गिनीमध्ये एक ‘इंग्लिश ट्रेनिंग लॅबोरेटरी’ आणि एक ‘उद्योजकता विकास व व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र’ उघडण्याची घोषणा भारताच्या राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे.


इक्वेटोरीयल गिनी हा एक मध्य आफ्रिकेतला देश आहे. मालाबो हे देशाचे राजधानी शहर आहे. देशाचे राष्ट्रीय चलन सेंट्रल आफ्रिकन CFA फ्रँक हे आहे.



जागतिक होमिओपॅथी दिन १० एप्रिल 
१० एप्रिल २०१८ रोजी जागतिक होमिओपॅथी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षी डॉक्‍टर हनेमन यांची २६३ वी जयंती साजरी केली जात आहे.

या दिनाच्या निमित्ताने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्लीत दोन दिवसीय ‘विज्ञान परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ‘अभिनवता, विकास आणि प्रगती: चाळीस वर्षापासून विज्ञानाचा शोध’ (Innovate: Evolve; Progress: Exploring Science since 40 years) हा या परिषदेचा विषय आहे. परिषदेचे आयोजन केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH) तर्फे केले गेले आहे.

दरवर्षी १० एप्रिल रोजी होमिओपॅथीचे जनक डॉक्टर क्रिस्चियन फ्रेडरिक सॅम्युअल हनेमन यांचा जन्‍मदिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी १९६९ साली पर्यायी औषधोपचार म्हणून होमिओपॅथी विकसित केली होती.



लियोनल मेस्सी UNWTO चा पर्यटन दूत 
संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) ने पर्यटनाला चालना देण्यासाठी अर्जेंटीना आणि बार्सिलोना फूटबॉल क्लबचा खेळाडू लियोनल मेस्सी याला दूत म्हणून नियुक्त केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) ची स्थापना वर्ष १९७५ मध्ये केली गेली. जागतिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेचे मुख्यालय मॅड्रिड (स्पेन) येथे आहे. संघटनेचे १५६ देश, ६ प्रदेश आणि ५०० संलग्न संस्था सदस्य आहेत.