‘वर्ल्ड एक्सपो २०२०’ सोबत भारताचा सामंजस्य करार 
भारत आणि ‘वर्ल्ड एक्सपो २०२०’ यांच्यात प्रदर्शनीत भारतीय मंडप उभारण्यासाठी भागीदारी करार करण्यात आला आहे.


२० ऑक्टोबर २०२० पासून संयुक्त अरब अमिरातची राजधानी दुबईमध्ये ‘वर्ल्ड एक्सपो २०२०’ या भव्य प्रदर्शनीला सुरुवात होणार आहे. ही प्रदर्शनी पाच वर्षांमध्ये एकदाच आयोजित केली जाते.

करारांतर्गत प्रदर्शनीत जवळजवळ एक एकर भूखंडावर भारतीय मंडप उभारले जाणार. तेथे अंतराळ, औषधी, माहिती तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संपर्क क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती प्रदर्शित केली जाणार



‘ईशान्यसाठी NITI मंच’ याची पहिली बैठक आगरतळात संपन्न 
नवनिर्मित ‘ईशान्यसाठी NITI मंच’ याची पहिली बैठक १० एप्रिल २०१८ रोजी त्रिपुराची राजधानी आगरतळात पार पडली. बैठकीचे आयोजन NITI आयोग (राष्‍ट्रीय भारत परिवर्तन संस्‍था), ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय आणि ईशान्य परिषद यांच्यावतीने केले गेले होते.

बैठकीत हीरा महामार्ग, आईवे (इंटरनेट), रेल्वे व हवाई मार्ग यांच्या विकासासोबतच शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यांसह अन्य पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर दिला गेला.


नवनिर्मित ‘ईशान्येसाठी NITI मंच (NITI Forum for Northeast)’ NITI आयोगाचे उपाध्यक्ष (राजीव कुमार) आणि ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) (डॉ. जितेंद्र सिंह) हे या मंचाचे सह-अध्यक्ष आहेत. मंचाचे सचिवालय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयात आहे. 

हा मंच ईशान्येकडील क्षेत्रातल्या विकास कार्यांमध्ये येणार्‍या अडचनींना ओळखणार आणि ईशान्येकडील क्षेत्रात वेगाने व निरंतर विकासासाठी आवश्यक पावले उचलण्यासंबंधी शिफारसी करणार



भारतात ८ व्या ‘रिजनल 3-R फोरम’ चे आयोजन 
९-१२ एप्रिल २०१८ या काळात भारतात इंदौर (मध्यप्रदेश) मध्ये ८ व्या ‘रिजनल 3-R फोरम’चे आयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालय आणि जपान सरकारचे पर्यावरण मंत्रालय यांच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघाचे क्षेत्रीय विकास केंद्र (UNCRD) तर्फे ही परिषद ‘अचिव्हिंग क्लीन वॉटर, क्लीन लँड अँड क्लीन एयर थ्रू 3R अँड रिसोर्स एफीश्यंसी – ए 21स्ट सेंचुरी व्हिजन फॉर एशिया – पॅसिफिक कम्यूनिटीज’ या विषयाखाली आयोजित करण्यात आली आहे.

3-R – रिड्यूस (कमी करणे), रीयूज (पुनर्वापर) आणि रीसायकल (पुनर्नवीनीकरण) – या सिद्धांतावर आधारित या परिषदेचे उद्घाटन लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रसंघाचे क्षेत्रीय विकास केंद्र (United Nations Centre for Regional Development -UNCRD)क्षेत्रीय विकासासाठी १८ जून १९७१ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) आणि जपान सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार १९७१ साली स्थापित करण्यात आले.


गृहमंत्र्यांच्या हस्ते हैदराबादमध्ये NSG परिसराचे उद्घाटन 
हैदराबादच्या इब्राहिमपट्टनम (तेलंगणा) येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) च्या २८ व्या विशेष समग्र समूह (SCG) च्या २०० एकर परिसराचे उद्घाटन करण्यात आले आहे.

हा परिसर हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळापासून केवळ ३३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. भारतात NSG हब मुंबई (NSG 26), चेन्नई (NSG 27), हैदराबाद (NSG 28), कोलकाता (NSG 29) आणि गांधीनगर (NSG 30) मध्ये NSG परिसर आहेत

“लोन वुल्फ अटॅक” आणि मोठ्या वाहनांद्वारे लोकांना चेंगरणे अश्या नव्या प्रकारच्या दहशतवादी कृत्यांना हाताळण्यासाठी येथे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (National Security Guard -NSG) हा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले एक भारतीय विशेष दल आहे. याची स्थापना १९८४ साली ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दहशतवादी कारवायांना हाताळण्यासाठी करण्यात आली.



बलराम भार्गव ICMR चे नवे महासंचालक 
AIIMS प्रा. बलराम भार्गव यांची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक आणि आरोग्य संशोधन विभागाचे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. भार्गव सध्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) येथे प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांची ही नियुक्ती तीन वर्षांकरिता किंवा वयाच्या ६० वर्षांपर्यंत केली गेली आहे.

याशिवाय, प्रसिद्ध शास्त्रज्ञ रेणू स्वरूप यांना जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव पदी नियुक्त करण्यात आले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याची स्थापना १९११ साली करण्यात आली, जी जगातल्या सर्वात जुन्या वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक आहे. याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. 

ITBRC सार्वजनिक आणि खाजगी संस्थांसोबत कार्य करीत आहे, जे जागेवरच निदान, कमी उपचार प्रक्रिया आणि क्षयरोगासाठी एक प्रभावी लस विकसीत करण्यासाठी देशातील शोध प्रयत्नांचे संचालन करीत आहे.



चीनने ‘याओगान-३१’ दूरस्थ संवेदी उपग्रहांचा पहिला समूह अवकाशात सोडला 
चीनने देशाच्या ‘याओगान-३१’ (Yaogan-31) दूरस्थ संवेदी उपग्रहांचा पहिला समूह अवकाशात सोडला आहे. हे प्रक्षेपण जियूकुयान केंद्रावरून केले गेले.

उपग्रहांना लोंगमार्च-4C अग्निबाणाने सोडण्यात आले आहे. शिवाय या मोहिमेत एक मायक्रो-नॅनो तंत्रज्ञान प्रयोगात्मक उपग्रह देखील पाठविण्यात आला आहे.


चीनने आपल्या ‘याओगान’ उपग्रहाच्या शृंखलेतील पहिले उपग्रह ‘याओगान-१’ २००६ साली अवकाशात सोडले होते. या उपग्रहांचा वापर विद्युत-चुंबकीय पर्यावरण सर्वेक्षण आणि अन्य संबंधित तांत्रिक चाचण्यांसाठी केला जातो.