ग्रेटर नोएडामध्ये 7 व्या ‘होम एक्सपो इंडिया’चे आयोजन 
उत्तरप्रदेशाच्या ग्रेटर नोएडा शहरात ‘होम एक्सपो इंडिया 2018’चे आयोजन करण्यात आले आहे. 


16 एप्रिल 2018 पासून सुरू होणार्‍या या प्रदर्शनीचे आयोजन एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल फॉर हँडीक्राफ्ट (EPCH) तर्फे केले गेले आहे. याचे उदघाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 



सिध्दार्थ वरदराजन: 2017 सालचा शॉरेंस्टाइन पत्रकारिता पुरस्कार प्राप्तकर्ता 

सिध्दार्थ वरदराजन यांना 2017 सालासाठी शॉरेंस्टाइन पत्रकारिता पुरस्कार घोषित झाला आहे. 

सिध्दार्थ वरदराजन हे ‘द वायर’चे संस्थापक संपादक आहेत. त्यांना हा पुरस्कार 16 एप्रिल रोजी स्टॅनफोर्डमध्ये दिला जाणार आहे. 

शॉरेंस्टाइन पत्रकारिता पुरस्कार पत्रकारांना दरवर्षी स्टॅनफर्ड विद्यापीठातील वॉल्टर एच. शॉरेंस्टाइन एशिया पॅसिफिक रिसर्च सेंटर कडून दिला जातो. ज्यांनी आशिया क्षेत्रात उल्लेखनीय अहवाल तयार केला आहे आणि क्षेत्रातील पाश्चिमात्य तत्वांना समजून घेण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे, अश्यांना हा पुरस्कार दिला जातो.



देवकी राजपूत हिने पटकावला ”महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब” 

हैदराबाद मधील एल.बी स्टेडियम येथे 11 ते 13 एप्रिल दरम्यान झालेल्या इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी ‘महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब’ पटकावलाआहे.

सहा महिला प्रतिस्पर्धाकांना मातीत लोलुन गदा जिंकत, ठाणे जिल्ह्याच्या ठाणे शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र-तेलंगाना केसरी ही मातीतिल (पुरुष व महिला) कुस्ती स्पर्धा पहिल्यांदाच खेळवण्यात आल्या. त्यामध्ये 55-65या वजनी गटात खेलताना ठाणे शहर पोलीस दलाच्या देवकी यांनी सहा कुस्तीपट्टू यांच्याशी दोन हात करुन महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब जिंकत ठाण्यातील मुलीही खेलात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

या अजिंक्य पदामुळे ठाण्याला बहुदा पहिली,-वहीली गदा जिंकता आली आहे.विजेत्यांना गदा, पदक, प्रमाणपत्र, आणि रोख रक्कम देत गौरवण्यात आले आहे. 


ड्रोनद्वारे पहिल्यांदाच औषध, रक्ताची डिलिव्हरी 
जगातील अनेक ई-कॉमर्स कंपन्या तसेच फूड चेनमधील उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

परंतु रवांडात ड्रोनच्या माध्यमातून गरजूंपर्यंत औषधी आणि रक्त पोहोचवण्याची सेवा पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियातील व्यावसायिक ड्रोनची निर्मिती करणाऱ्या जिपलाइन या कंपनीद्वारे जगातील सर्वात वेगवान ड्रोन डिलिव्हरी सेवेची सुरुवात करण्यात आली.

रवांडात 2016 पासून ही कंपनी काम करत आहे. ड्रोन डिलिव्हरी प्रणालीद्वारे मागील 15 महिन्यांत 4 हजारे उड्डाणेघेण्यात आली आणि जवळपास 1 लाख लिटर रक्त रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे.

रक्त पुरवठा किंवा औषध मागवण्यासाठी या ड्रोन सेवेचा उपयोग घ्यायचा असेल तर डॉक्टर किंवा रुग्णालयाने मध्यवर्ती वितरण प्रणालीला एक संदेश पाठवणे गरजेचे असते. यानंतर केवळ 20 मिनिटांच्या आत मदत पोहोचवलीजाते.

रक्ताची पिशवी ड्रोनच्या पेलोडमध्ये ठेवली जाते. ड्रोनमध्ये सेट केलेल्या लोकेशनवर पॅराशूटद्वारे ड्रोन लँड न करता औषधी, रक्ताची पिशवी टाकली जाते. कंपनीने नुकतीच वेगवान ड्रोनची निर्मिती केली आहे.

128 किलोमीटर प्रतितास वेगाने हे ड्रोन चालते. एका वेळेस ड्रोन 160 किलोमीटरचे अंतर पार करते. यात 1.75 किलोपर्यंत वजन ठेवता येते.



जगात प्रथमच भारतामध्ये तयार झाले डेंग्यूवर औषध 

जगात प्रथमच भारतीय वैज्ञानिकांनी डेंग्यूच्या आजारावरील औषध विकसित केले आहे. त्याच्या प्राथमिक चाचण्या पूर्णपणे यशस्वी ठरल्या आहेत.

हे औषध बाजारात आणण्यापूर्वी जागतिक निकषांनुरूप त्याच्या मोठ्या प्रमाणात क्लिनिकल ट्रायल घेतल्या जात आहेत. 2019 पर्यंत हे औषध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची आशा आहे.

आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदच्या (सीसीआरएएस) वैज्ञानिकांनी सात प्रकारच्या औषधीय रोपट्यांपासून हे औषध तयार केले आहे. यात 12 पेक्षा जास्त वैद्यांना (विशेषज्ञ) दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.

औषधाची उंदीर आणि सशांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. यानंतर पथदर्शी अभ्यास म्हणून गुरगावच्या मेदांता हॉस्पिटल, कर्नाटकच्या बेळगाव व कोलार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल डेंग्यूच्या 30-30 रुग्णांना औषध देण्यात आले आहे.

औषध सेवनानंतर रुग्णांच्या रक्तात प्लेटलेट्सचे प्रमाण गरजेनुसार वाढल्याचे निष्पन्न झाले आहे.



राष्ट्रकुल खेळ 2018: टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले 

ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल खेळ 2018 मध्ये भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने एक ऐतिहासिक विजय नोंदवत, टेबल टेनिस एकेरीचे सुवर्णपदक जिंकले आहे. मनिका बत्राने अंतिम फेरीत सिंगापूरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत सुवर्णपदक जिंकले. 

टेबल टेनिसच्या एकेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करणारी मनिका बत्रा पहिलीच भारतीय खेळाडूठरली आहे. 

या राष्ट्रकुल स्पर्धेतले मनिका बत्राचे हे तिसरे पदक आहे. याआधी भारतीय महिलांनी टेबल टेनिसच्या सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. यानंतर महिला दुहेरी प्रकारात मौमा दासच्या साथीने तिने रौप्यपदक पटकावले होते.