भानू प्रताप शर्मा: बँक्स बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष 
केंद्र सरकारकडून माजी CAG प्रमुख विनोद राय यांना बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) च्या अध्यक्ष (चेअरमन) पदावरून हटविण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी भानू प्रताप शर्मा यांची नियुक्ती केली आहे. 


सोबतच तीन नव्या सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आहेत – वेदिका भंडारकर, पी. प्रदीप कुमार आणि प्रदीप पी. शाह. 

बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. याच्या कार्यास एप्रिल 2016 पासून प्रारंभ झाला. याचे कार्यालय RBI च्या केंद्रीय कार्यालयात मुंबईमध्ये आहे. 

BBB शासकीय बँकांच्या कार्यात सुधारणा आणण्यासाठी भारत सरकारच्या ‘इंद्रधनुष’ धोरणाच्या सात घटकांपैकी एक आहे. यामध्ये पुनः-भांडवल, मालमत्तेची तनावमुक्तता, सक्षमीकरण, जबाबदारी आणि प्रशासन सुधारणांची कार्यचौकट यांचा समावेश आहे. राज कपूर जीवनगौरव आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर
राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शकराजकुमार हिराणी यांना तर चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णीयांना घोषित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. 
जीवनगौरव पुरस्कार 5 लक्ष रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्काराचे रु..3 लक्ष रुपयाचा आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रातत्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.‘डॉ बाबासाहेब आंबेडकर: व्यक्ती नही संकल्प’ शीर्षक असलेले पुस्तक प्रकाशित 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर: व्यक्ती नही संकल्प’ या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

या पुस्तकाचे अनावरण भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचे संपादक किशोर मकवाना हे आहेतभारताची राष्ट्रकुल स्पर्धेत 66 पदकांची कमाई
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा 2018 मध्ये भारताने चांगली कामगिरी नोंदवली आहे. 

भारताने या खेळांमध्ये 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदाकांसह एकूण 66 पदकांची कमाई केली आहे. गोल्ड कोस्टमध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

2014 मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेल्या 64 पदकांच्या तुलनेत यंदाची भारतीय खेळाडूंची कामगिरी अव्वल ठरली आहे.

तसेच भारताने दिल्ली येथे झालेल्या २०१० राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण 101 पदकांची कमाई केली होती. तर 2002 मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये 69 पदके मिळवली होती.


सायनाने अंतिम फेरीत सुवर्ण जिंकले 
राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा 2018च्या बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यांत सायनने पी. व्ही. सिंधूचा पराभव करीत सुवर्ण जिंकले. त्यामुळे सिंधूला रौप्य मिळाले आहे.

तर दुसरीकडे किदांबी श्रीकांतला पुरुषांच्या एकेरीतील अंतिम सामन्यांत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

भारतीय बॅडमिंटनमधील दोन स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यांत एकमेकांसमोर उभ्या होत्या.

या निर्णायक लढतीत सायनाने देशातील अव्वल खेळाडू आणि ऑलंपिक पदक विजेत्या सिंधूला हारवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.पश्चिम बंगाल शासन बालसुरक्षा समित्या तयार करणार आहे
पश्चिम बंगाल राज्य शासनाने अगदी तळागळ पातळीवर लहान मुला-मुलींना सुरक्षा प्रदान करण्याकरिता बालसुरक्षा समित्या तयार करण्याची योजना तयार केली आहे.

राज्यात बालकांसोबत कोणतीही विपरीत घटना घडणार नाही याची खात्री करण्यासाठी विभागीय व ग्राम पातळीवर बालसुरक्षा समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.व्ही. एस. कोकजे: विश्व हिंदू परिषदेचे नवे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष 

व्ही. एस. कोकजे यांची विश्व हिंदू परिषद (VHP) याचे पुढील आंतरराष्ट्रीय अध्यक्षच्या रूपात निवड करण्यात आली आहे.

कोकजे हे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष (प्रभारी) पदी असलेल्या राघव रेड्डी यांच्या जागी येणार आहेत. कोकजे हिमाचल प्रदेशाचे माजी राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. 

विश्व हिंदू परिषद (VHP)ची स्थापना 1964 साली एम. एस. गोलवळकर आणि एस. एस. आपटे यांनी स्वामी चिन्मयनंद यांच्या सहकार्याने केली. यावर्षी विश्व हिंदू परिषद (VHP) याच्या 54 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे