राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पक्षाचे विधिमंडळातील गटनेते जयंत पाटील यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत एकमताने निवड करण्यात आली. अन्य पदाधिकाऱ्यांची निवड येत्या दहा दिवसांत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले. तटकरे यांच्याकडे गेली चार वर्षे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली.भारताच्या सी. ए. भवानी देवीने सॅटलाइट फेन्सिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले 
भारताची तलवारबाज सी. ए. भवानी देवी हिने आइसलँडमध्ये खेळल्या गेलेल्या ‘टूरनोई विश्वचषक सॅटलाइट तलवारबाजी अजिंक्यपद 2018’ या स्पर्धेत सब्रे प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये अमेरिकेच्या अॅलेक्सिस ब्राउने हिने भवानी देवीला हरवून सुवर्णपदक जिंकले. भवानी देवी आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी (2017 मध्ये) पहिली भारतीय आहे.अडॉप्ट ए हेरिटेज’ योजनेंतर्गत दालमिया भारत ग्रुपकडे लाल किल्ल्याचे कंत्राट
पुढील पाच वर्षांकरिता 25 कोटी रुपयांच्या कराराअंतर्गत दालमिया भारत ग्रुप या उद्योग समुहाची दिल्लीच्या लाल किल्ल्याची जबाबदारी घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

ही निवड ‘अडॉप्ट ए हेरिटेज’ योजनेंतर्गत करण्यात आली आहे. यासोबतच दालमिया भारत ग्रुप हा या योजनेंतर्गत निवड झालेला भारताच्या इतिहासात पहिला कॉर्पोरेट समूह बनला

राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 2017 साली ‘अडॉप्ट ए हेरिटेज: अपनी धरोहर, अपनी पहचान’ योजना सुरू केली. पर्यटन मंत्रालय, संस्कृती मंत्रालय व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश राज्य शासन यांचा हा एक सहयोगी प्रयत्न आहे. 

“जबाबदार पर्यटनाला” प्रभावीपणे प्रोत्साहन देण्यासाठी सर्व भागीदारांमध्ये समन्वय विकसित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत एकूण 31 संस्थांना (ज्यास मोन्युमेंट मित्र असे म्हटले जाईल) मान्यता देण्यात आली आहे. ते भारतातील एकूण 95 स्मारके /पर्यटन स्थळांची जबाबदारी स्विकारतील.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खासगी क्षेत्रातील कंपन्या आणि कार्पोरेट नागरिक / व्यक्ती यांना देशातील वारसा जपण्यासाठी आणि पर्यटनाला अधिक टिकाऊ बनविण्यासाठी तसेच जागतिक दर्जाच्या पर्यटनासंबंधी पायाभूत सुविधा आणि तयार करण्यासाठी सहभागी करून घेणे हा याचा हेतू आहे. अश्या भागीदारांना ‘मोन्युमेंट मित्र’ म्हणून संबोधले जाईल.


पवन चामलिंग: दीर्घकाळापर्यंत मुख्यमंत्री पद सांभाळणारे मुख्यमंत्री 
68 वर्षीय सिक्किमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग भारताच्या इतिहासात कोणत्याही राज्यात दीर्घकाळापर्यंत मुख्यमंत्री पद सांभाळणारे मुख्यमंत्री बनले आहेत.

सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट (SDF) पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष पवन चामलिंग डिसेंबर 1994 मध्ये मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी सलग 25 वर्ष मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा 23 वर्षांचं विक्रम मोडलेला आहे.भारत, पाकिस्तान प्रथमच रशियात होणार्‍या बहुराष्ट्रीय युद्धसरावात सहभागी होणार 
प्रथमच भारत आणि पाकिस्तान एकत्रितपणे सप्टेंबर 2018 मध्ये रशियात होणार्‍या बहुराष्ट्रीय दहशत विरोधी युद्धसरावात भाग घेणार आहेत.

या युद्धसरावात चीनसहित शांघाय सहकार संघटना (SCO) देशांच्या सहभाग राहणार आहे. हा अभ्यास रशियाच्या यूराल पर्वतीय भागात चालणार आहे. हा सराव एक शांती अभियान आहे.बार्सिलोना फूटबॉल क्लबने ला लीगा स्पर्धा जिंकली 
स्पेनच्या बार्सिलोना या फूटबॉल संघाने डिपोर्टिवो ला कोरूना संघाला पराभूत ‘2018 ला लीगा’ ही फूटबॉल स्पर्धा जिंकली आहे.

बार्सिलोना संघाचे हे 25 वे ला लीगा अजिंक्यपद आहे. स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्यासाठी बार्सिलोनाच्या स्ट्रायकर लियोनेल मेस्सीने सलग तीनदा गोल नोंदवला.

ला लीगा ही स्पॅनिश फुटबॉल लीगच्या व्यावसायिक संघाची फुटबॉल स्पर्धा आहे. 1929 सालापासून ही स्पर्धा खेळली जात आहे.56 व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदके 
सर्बियात खेळल्या गेलेल्या 2018 बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकांसह एकूण 13 (5 रौप्य आणि 5 कांस्य) पदकांची कमाई केली आहे.

सुमित सांगवान (91 किलो), निखात जरीन (51 किलो), हिमांशू शर्मा (49 किलो) यांनी सुवर्णपदक जिंकले. 

महिलांमध्ये जमुना बोरो (54 किलो) आणि राल्टे लालफाकमावी (81 किलो+) यांनी तर पुरुषांमध्ये लालदिनमाविया (52 किलो), वरिंदर सिंग (56 किलो) आणि पवन कुमार (69 किलो) यांनी रौप्यपदक जिंकले.