रेरा अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वलस्थानी
बांधकाम क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच ग्राहकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या (रेरा) कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. 


या कायद्यांतर्गत महाराष्ट्राने स्थापन केलेल्या ‘महारेरा’ प्राधिकरणाकडे सर्वाधिक म्हणजे 16 हजार 165 बांधकाम प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. तर, आतापर्यंत एक हजाराहून अधिक ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींचे निवारण महारेराकडून करण्यात आले आहे. हादेखील एक विक्रम ठरला आहे.

केंद्र सरकारकडून देशभरात लागू केलेल्या रेरा कायद्यांतर्गत राज्य सरकारने महारेराची स्थापना केली. त्यास 1 मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात लागू झालेल्या कायद्याचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन नोंदणी आणि ग्राहकांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा देणारेही महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.तेजसमधून BVR मिसाईलची चाचणी यशस्वी 
स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानाच्या क्षमतेबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली असली तरी तरी तेजसवरुन नुकतीच घेण्यात आलेली हवेतून हवेत मारा करणाऱ्या बीव्हीआर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली.

तसेच या चाचणीच्या निमित्ताने तेजसने फायटर विमान म्हणून आपली परिणामकारकता आणि क्षमता सिद्ध केली आहे तसेच फायनर ऑपरेशनल क्लियरन्स मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

राफेल या इस्त्रायली कंपनीने बीव्हीआर मिसाईलची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलाने त्यांच्या निवृत्त झालेल्या सी हॅरीयर्स विमानांसाठी बीव्हीआर मिसाईलस विकत घेतली होती. गोव्याच्या किनाऱ्यावर 27 एप्रिल रोजी तेजसमधून बीव्हीआर मिसाईल डागण्यात आले. या चाचणीने सर्व निकष पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती 
वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के. जैन यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

मुख्य सचिव पदासाठी डी.के. जैन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावाची चर्चा होती.

सेवाज्येष्ठतेचा निकष हा गाडगीळ यांच्या बाजूने होता. जैन हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 31 जानेवारी 2019 ला सेवानिवृत्त होतील. कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे.आंतरराष्ट्रीय कामगार दिन: 01 मे 
“यूनायटेड वर्कर्स फॉर सोशल अँड इकनॉमिक अॅडवांसमेंट” या विषयाखाली 1 मे 2018 ला आंतरराष्ट्रीय कामगार दिन पाळला गेला आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा ‘आंतरराष्ट्रीय श्रम दिन’ किंवा ‘मे दिन’ म्हणूनही ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जगभरात 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस पळाला जातो. 1904 साली या दिनाची स्थापना करण्यात आली.


भारत: हवाई प्रवासी वाहतूकीमध्ये सर्वात वेगाने वाढणारा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा उदयोन्मुख देश 
एयरपोर्ट काउंसिल इंटरनॅशनल (ACI) अनुसार, सन 2017-2040 या कालावधीत प्रवासी वाहतुकीच्या अंदाजावर आधारित हवाई प्रवासी वाहतूकीसंदर्भात भारत हा सर्वात वेगाने वाढणारा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा उदयोन्मुख देश मनाला जात आहे.

अहवालानुसार, व्हिएतनाम 8.5%च्या वृद्धीदराने या यादीत शीर्ष स्थानी आहे. त्यानंतर भारत 7.5% तर इराण 7.3% या दराने वाढले आहे. चीनचा वृद्धीदर 5.9% एवढा आहे.

नवी दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (16 वा) हे जगातल्या शीर्ष 20 व्यस्त विमानतळांमध्ये समाविष्ट झाले आहे. 2017 साली अनुक्रमे कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई यांचा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या विमानतळांमध्ये समावेश झाला आहे.

सन 2017-2040 या कालावधीत आशिया-प्रशांत भागातील प्रवासी वाहतुकीचा वृद्धीदर 38.8% असणार, ही जगातली सर्वात वेगवान वृद्धी असेल. 2022 सालापर्यंत, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील प्रवासी वाहतूक 5.4 अब्जपर्यंत पोहचणार. या संदर्भात युरोपमधील वाढ 26% तर उत्तर अमेरिकेत 8.4% होईल.हरियाणाच्या कर्नाळ जिल्ह्यात गोबरधन योजनेचा शुभारंभ 
30 एप्रिल 2018 रोजी हरियाणाच्या कर्नाळ जिल्ह्यात गोबर धन (GOBAR Dhan) योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

गोबर (GOBAR) म्हणजे ‘गॅल्व्हनाइजिंग ऑर्गेनिक बायो एग्रो रिसोर्सेस धन’. राष्ट्र पातळीवर राबविण्यात येणार्‍या ‘गोबर धन’ योजनेमार्फत घन कचरा व जनावरांच्या मलमूत्रापासून खते व बायोगॅस इंधन निर्मिती केली जाणार आहे.

‘गोबर धन’ योजनेंतर्गत शेणापासून बायोगॅस संयंत्रे वैयक्तिक, सामुदायिक, बचत गट किंवा गौशाळा सारख्या NGO च्या पातळीवर स्थापित केले जाऊ शकणार. प्रकल्पासाठी तांत्रिक विशेषज्ञांची मदत घेतली जाणार. 

त्यासाठी केंद्र आणि राज्य शासन 60:40 या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार. योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्हयात एक गावाची निवड केली जाते. यावर्षी योजनेंतर्गत 700 जिल्ह्यांना सामील करण्यात येणार आहेजोहान्सबर्गमध्ये ‘भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार परिषद 2018’ संपन्न 
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये 29-30 एप्रिल 2018 रोजी ‘भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार परिषद 2018’ पार पडली.

परिषदेत भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात भारताच्या शिष्टमंडळाने उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार वृद्धीला चालना देण्यासाठी विविध विषयांवर चर्चा केली.

दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडातला विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. केप टाउन (संविधानक), प्रिटोरिया (कार्यपालिका), ब्लोमफॉन्टेन (न्यायिक) या देशाच्या राजधान्या आहेत. दक्षिण आफ्रिकन रँड हे राष्ट्रीय चलन आहे.साजिद जावेद: ब्रिटनचे गृहमंत्री बनणारे पहिले दक्षिण आशियाई व्यक्ती 
पाकिस्तान वंश असलेले साजिद जावेद यांना ब्रिटनचे नवे गृहमंत्री पदावर नियुक्त केले गेले आहे. त्यांची अंबर रूड यांच्या जागी निवड झाली आहे.

या नियुक्तीसोबतच साजिद जावेद ब्रिटिश मंत्रिमंडळात प्रमुख पदाची जबाबदारी आणि गृहमंत्रालयाचे प्रमुखपद सांभाळणारे दक्षिण आशियाई मूळ असलेले पहिले संसदीय सदस्य आहेत.