कांदळी ही राज्यातील पहिली ऑनलाईन ग्रामसभाकांदळी (ता.जुन्नर) येथे 1 मे रोजी राज्यातील पहिली ऑन लाईन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. 


‘ज्या नागरिकांना ग्रामसभेला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही त्यांना आपल्या समस्या, प्रश्न मांडता यावेत यासाठी ऑनलाइन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

ग्रामपंचायतीने एक ऍप तयार केले आहे. यात ग्रामपंचायतीची सर्व माहिती देण्यात आली आहे. ग्रामसभेच्या वेळेस ज्या ग्रामस्थास सहभाग घ्यायचा असेल त्यांनी ऍप डाऊनलोड करुन घेतले तर प्रत्यक्ष ग्रामसभा सुरु असताना सभेत जे काही प्रश्न उपस्थित होतील ते दिसतील त्यात हो किंवा नाही अशा स्वरूपात उत्तर नोंदविता येणार आहेत.

गावातील एकूण एक हजार 700 खातेदार असून आजपर्यंत 1077 जणांनी ऐप डाउनलोड करून घेतले आहे.



शाहझार रिझवी जागतिक तिरंदाजी क्रमवारीत अव्वलभारतीय तिरंदाज शाहझार रिझवी याने 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी फेडरेशनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली.

कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या तिरंदाजी विश्वचषकात 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात त्याने रौप्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे 1654 रेटिंग पॉईंट्ससह शाहझार जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला. त्याने रशियाच्या आर्टम चेर्नोसोव्ह (1046) आणि जपानच्या टोमोयुकी मत्सुदा (803) यांना मागे टाकले.

शाहझारने या आधी मार्चमध्ये मेक्सिकोत झालेल्या विश्वचषकात विश्वविक्रम करत सुवर्ण पदक पटकावले होते. शाहझार व्यतिरिक्त ‘टॉप 10’ मध्ये जितू राय या भारतीय तिरंदाजाचा समावेश आहे. तर ओम प्र
काश मिठरवाल याला 12व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. 



सितांशू कार: PIB चे नवे प्रधान महासंचालकभारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ अधिकारी सितांशू रंजन कार यांनी नवी दिल्लीतील पत्र माहिती कार्यालय (Press Information Bureau -PIB) याच्या प्रधान महासंचालक पदाची आणि भारत सरकारचे 27 वे प्रमुख प्रवक्ताम्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.

माजी महासंचालक फ्रँक नोरोन्हा यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्र माहिती कार्यालय (Press Information Bureau -PIB) ही भारत सरकारची एक केंद्रीय वृत्त संस्था आहे. याची स्थापना 1919 साली करण्यात आली. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.



राजस्थानमध्ये ‘विजय प्रहार’ युद्धसरावाचे आयोजन1 मे 2018 पासून राजस्थानच्या सूरतगड जवळील महाजन रेंजमध्ये ‘विजय प्रहार’ नावाच्या युद्धसरावाला सुरुवात झाली. हा सराव 9 मे 2018 पर्यंत चालणार आहे.

युद्धसरावात राजस्थानमध्ये तैनात लष्कराच्या दक्षिण-पश्चिम कमांडच्या 20000 सैनिकांनी भारतीय वायुदलासोबत सहभाग घेतला आहे. अणुहल्ल्यापासून बचावासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी यावेळी अभ्यास केला जात आहे. यामध्ये ड्रोन, उपग्रहांचा उपयोग केला जाईल.

हरेंद्र सिंग: पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकहॉकी इंडियाकडून महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

सोबतच महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून शोर्ड मरिजन यांना नियुक्त केले आहे. ते याआधी पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक होते.

हॉकी इंडिया हे भारतातले हॉकी खेळाचे प्रशासकीय मंडळ आहे. IOA ने 2008 साली भारतीय हॉकी महासंघ बरखास्त केल्यानंतर सन 2009 मध्ये हॉकी इंडियाची स्थापना करण्यात आली. याचे प्रायोजकत्व सहारा इंडिया परिवाराकडे आहे.



मोहम्मद सालेह याला ‘2017/18 साठी रायटर्स असोसिएशन फुटबॉलर ऑफ द इयर’ हा किताबइजिप्तचा फुटबॉलपटू मोहम्मद सालेह याला ‘2017/18 साठी फुटबॉल रायटर्स असोसिएशन फुटबॉलर ऑफ द इयर’ या शीर्षकाने गौरविण्यात आले आहे.

मोहम्मद सालेहने सन 2017/18 या हंगामात सर्व स्पर्धांमधील त्याच्या 48 प्रदर्शनात लिव्हरपूल संघासाठी 43 गोल केले होते आणि लिव्हरपूलला समोर आणण्यास अग्र भूमिका निभावलेली आहे. 

एप्रिल-18 मध्ये त्याला ‘प्रिमीयर लीग्स प्लेअर्स प्लेअर ऑफ द इयर’ हा सन्मान दिला गेला आणि सन 1948 नंतर हा सन्मान प्राप्त करणारा तो आफ्रिकेतील पहिला खेळाडू बनला.



जगातील 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत 14 भारतीय शहरांचा समावेशजागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतामधील तब्बल 14 शहरांचा समावेश झाला आहे.

दिल्ली हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. या यादीत दिल्ली, कैरो, ढाका नंतर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईतले प्रदूषण बिंजिंगपेक्षाही अधिक असल्याचे निर्देशनास आले आहे. 

याशिवाय कानपूर, फरीदाबाद, वाराणसी, गया, पटना, दिल्ली, लखनऊ, आग्रा, मुजफ्फरपूर, श्रीनगर, गुरगाव, जयपूर, पटियाला आणि जोधपूर या शहरांमध्ये PM2.5 प्रदूषकांची पातळी सर्वाधिक आहे.

भारतामध्ये सर्वाधिक (जवळपास 24 लक्ष) अकाली मृत्यूचे कारक प्रदूषण ठरत आहे. अहवालानुसार सद्यपरिस्थितीत 10 पैकी 9 जण सर्वाधिक प्रदूषके असलेल्या हवेत श्वास घेत आहेत.



सुभाष चंद्रा खुंटिया: IRDAI चे नवे अध्यक्षसुभाष चंद्रा खुंटिया यांची भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सुभाष खुंटिया यांची नेमणूक टी. एस. विजयन यांच्या जागी करण्यात आली आहे. ही नियुक्ती 3 वर्षांकरिता झाली आहे.

भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे जी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे विनियमन करते व प्रोत्साहन देते. 

हे ‘विमा विनियमन व विकास प्राधिकरण अधिनियम-1999’ अन्वये स्थापन करण्यात आले. याचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे. IRDAI च्या संरचनेत एक अध्यक्ष, पाच पूर्णवेळ आणि चार अंशकालिक सदस्य असतात जे भारत सरकारकडून नियुक्त केले जातात.