लोहगाव विमानतळ देशात तिसरे 
प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 20.6 टक्‍क्‍यांनी प्रवासी संख्या वाढली आहे.
तसेच कोलकता पहिल्या, तर अहमदाबाद विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे.


देशातील दहा विमानतळांवरून दरवर्षी पन्नास लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची ये-जा होते. लोहगाव विमातळावरून 2017-18 या वर्षात 81 लाख 60 हजार प्रवाशांची वाहतूक झाली होती. 

त्यामुळे देशात ते विमानतळ नवव्या स्थानावर होते. परंतु, प्रवासी संख्यावाढीचा लोहगाव विमानतळाचा वेग 20.6 टक्के असल्यामुळ ते तिसऱ्या स्थानावर आले आहे.

पुण्यातून मध्यम आणि हलक्‍या आकाराच्या विमानांचीच वाहतूक होत असूनही, पुण्यात प्रवासीवाढीचा वेग मोठा आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी दिली.कोलकातामध्ये आंतरराष्ट्रीय बाल रंगमंच महोत्सवाचे आयोजन 
17 ते 21 जून या कालावधीत कोलकातामध्ये अकादमी ऑफ फाईन आर्ट्स येथे आंतरराष्ट्रीय बाल रंगमंच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाच दिवस चालणार्‍या या नाट्य महोत्सवात भारताशिवाय फ्रान्स, स्लोव्हेनिया, स्वाझीलँड, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ आणि बांग्लादेश या आठ देशांमधून स्पर्धकांचा सहभाग असणार आहे.


दिल्लीच्या शाळांमध्ये ‘नून असेंब्ली’ अभियानाला गती 
‘ड’ जीवनसत्व आणि त्याचे आरोग्यवर्धक परिणाम याबद्दल मुलांमध्ये जागरुकता पसरविण्यासाठी दिल्लीच्या शाळांमध्ये ‘नून असेंब्ली (दुपारची शाळा)’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

या उपक्रमाची सुरुवात पूर्व दिल्लीतील ‘हॅपी इंग्लिश स्कूल’ या शाळेने करत त्यांची सकाळची शाळा दुपारच्या कालावधीत भरविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

क्वालिटी लिमिटेड कंपनी आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांनी 9 एप्रिल 2018 रोजी दिल्लीत नॅशनल बाल भवन येथे नून असेंब्ली (दुपारची शाळा) या संकल्पनेला प्रस्तुत केले होते. 

संशोधकांच्या मते, सकाळी 11 वाजेपासून ते दुपारच्या 1 वाजेपर्यंत या काळात मिळणार्‍या सूर्यप्रकाशामुळे त्वचा सकाळच्या तुलनेत पाच पटीने अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्व तयार करते.

भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) याची स्थापना 2011 साली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत झाली. ही एक स्वायत्त संस्था आहे. आशिष बहुगुणा हे FSSAI चे वर्तमान अध्यक्ष आहेत आणि याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे.6 मे 2018 रोजी ‘जागतिक हास्य दिन’ पाळला गेला 
6 मे 2018 रोजी जागतिक हास्य दिन पाळला गेला. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन पाळला जातो. 10 मे 1998 रोजी पहिल्यांदा हा उत्सव मुंबई (भारत) मध्ये साजरा केला गेला होता आणि याची स्थापना ‘लाफ्टर योग’ चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली होती.

हसणे ही एक नैसर्गिक औषधी आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक आणि तनाव स्थितीला कमी करते.रमित टंडनने अबू धाबी ओपन स्क्वॅश स्पर्धा जिंकली 
भारताच्या रमित टंडन ह्याने इजिप्तच्या ओमार अब्देल मेगुइद ह्याचा पराभव करून ‘2018 अबू धाबी ओपन’ या स्क्वॅश स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

टंडनचे हे व्यावसायिक स्क्वॅश संघ (PSA) टूरचे तिसरे जेतेपद आहे.तिसऱ्या दक्षिण आशियाई कनिष्ठ क्रिडा स्पर्धेत भारत अग्रस्थानी 
कोलंबो (श्रीलंका) येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या दक्षिण आशियाई कनिष्ठ क्रिडा स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत अग्रस्थानी राहिला आहे.

स्पर्धेत भारताने 20 सुवर्ण, 22 रौप्य आणि 8 कांस्य अश्या एकूण 50 पदकांची कमाई केली आहे. श्रीलंका 12 सुवर्ण पदकांसह दुसर्‍या क्रमांकावर होता.