बर्फाचा महाराष्ट्र हा पॅटर्न देशभर लागू
महाराष्ट्रातील अन्न प्रशासनाने सुचविलेला बर्फ उत्पादनासंदर्भातील पॅटर्न केंद्र सरकारने स्वीकारला असून देशातील सर्वच राज्यांना तो लागू केला आहे.


खाद्य व औद्योगिक अशा वर्गीकरणामुळे बर्फ उत्पादकांनी चूक केल्यास भविष्यात कारवाईचा दंडुका उगारला जाणार आहे. हा आदेश देशभरात 1 जून 2018 पासून लागू होणार आहे.

अन्न प्रशासनाने गेले काही दिवस बर्फ उत्पादनासंदर्भात पाठपुरावा केला. खाद्य व अखाद्य अशा वर्गीकरणातील बर्फ सर्वसामान्यांनाही समजावा यासाठी अभ्यास केला. 

औद्योगिक (अखाद्य) बर्फ समजावा यासाठी त्यात खाण्यास योग्य असा फिका निळा रंग मिसळण्याचा प्रस्ताव तयार केला.

खाद्य बर्फ मात्र पारदर्शक असावा, म्हणजे दोन्ही बर्फातील फरक लक्षात येईल, अशी योजना आहे. निळ्या रंगाचा बर्फ खाण्यात आला तरी त्यातील रंगाचा परिणाम होणार नाही असा रंग मिसळावा, अशी योजना आहे. मासे, मटन अशा वेगवेगळ्या पदार्थांच्या साठवणुकीसाठी अखाद्य बर्फ वापरण्यात येतो. यासाठी फिका निळ्या रंगाचा बर्फ वापरला जाईल.



रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा व्लादिमीर पुतिन 
रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन (वय 65) यांचा चौथ्यांदा शपथविधी झाला असून त्यांची दोन दशकांची सत्ता आणखी सहा वर्षे राहणार आहे. पाश्चिमात्य देशांशी संबंध तणावाचे बनलेले असताना ते पुन्हा अध्यक्ष झाले आहेत.

1999 पासून पुतिन सत्तेवर असून ते जोसेफ स्टालिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले नेते ठरले आहेत. मार्चमधील निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पुतिन यांनी एकूण 77 टक्के मते जिंकली होती, पण या निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर बंदी घातली होती. 

देशाच्या अर्थव्यवस्थेचे पुनरूज्जीवन करण्याचे आश्वासन देऊन ते सत्तेवर आले असून त्यांच्यासमोवर अनेक जटिल आंतरराष्ट्रीय पेच आहेत.

‘रशियाच्या वर्तमान व भविष्यासाठी सर्व काही करण्याकरिताच माझे आयुष्य आहे व ते मी माझे कर्तव्य समजतो’ असे पुतिन यांनी सांगितले. शपथविधीच्या वेळी अनेकांनी स्मार्टफोनवर चित्रण केले. 

ऑर्नेट आंद्रयेव हॉल या क्रेमलिन राजप्रासाद संकुलाच्या भागात शपथविधी झाला. काळ्या रंगाच्या रशियन बनावटीच्या लिमोझीन गाडीतून ते आले, गेल्या वेळी त्यांनी मर्सिडीज वापरली होती. 

रशियन लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानून त्यांनी सांगितले, की माझ्यावरच्या मोठय़ा जबाबदारीची मला जाणीव आहे. रशियाचे सामथ्र्य, भरभराट व कीर्ती अनेक पटींनी वाढवण्यासाठी मी प्रयत्न करीन.



न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना आजीवन शासकीय सदन देणारा उत्तरप्रदेशचा कायदा फेटाळला 
सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश शासनाच्या ‘उत्तरप्रदेश मुख्यमंत्री कायदा-1997’ यामधील बदल आणि ‘मालमत्ता विभागाच्या नियंत्रणाखाली सदनांचे वाटप विधेयक-2016’ या कायद्याला चुकीचे ठरवले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश कायद्याला रद्द करत, ते संविधानाच्या विरुद्ध आहे, असे ठरवले आहे. उत्तरप्रदेशात माजी मुख्यमंत्र्यांना आजीवन शासकीय सदन देण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. 

या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय बंगले खाली करावे लागणार. लोक प्रहरी नामक अशासकीय संघटनेने या बाबतीत याचिका दाखल केली होती.


भारत आणि ग्वाटेमाला यांच्यात राजनैतिकांच्या प्रशिक्षणासाठी सहकार्य करार 
ग्वाटेमाला आणि भारत यांच्यात राजनैतिकांच्या प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू 7 दिवसांच्या परराष्ट्र दौर्‍यावर आहेत. दौर्‍यात ते ग्वाटेमाला, पनामा आणि पेरू या देशांना भेट देत आहेत. या भेटीत मध्य व दक्षिण अमेरिकेतल्या देशांसोबत द्वैपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा होणार आहे.

ग्वाटेमाला हा लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (LAC) प्रदेशातला देश आहे. ग्वाटेमाला शहर हे या देशाचे राजधानी शहर आहे. ग्वाटेमलन कुएट्झल हे राष्ट्रीय चलन आहे.



भारतात कृत्रिम बुद्धिमत्‍ता संकल्पना रुजविण्याकरिता NITI आयोग आणि गूगल यांच्या इच्छापत्रावर स्वाक्षर्‍या 
भारतात कृत्रिम बुद्धिमत्‍ता संकल्पना रुजविण्याकरिता NITI आयोग आणि गूगल यांच्यात एका इच्छापत्रावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.

देशात कृत्रिम बुद्धिमत्‍ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) अश्या नव्या तांत्रिक विषयांकरिता पोषक वातावरण तयार करण्याकरिता दोन्ही संस्थांनी कार्य करण्यास मान्य केले आहे. 

यामधून प्रशिक्षण, हॅकेथॉन, स्‍टार्टअप यांसाठी सल्ला देणे आणि संशोधनासाठी अनुदान प्रदान करणे अश्या बाबींवर लक्ष्य केंद्रीत केले जाणार आणि त्यासाठी एका राष्ट्रीय कार्यक्रमाची स्थापना केली जाणार आहे.



लठ्ठपणापासून मूत्रपिंडाचे संरक्षण करण्यासंबंधी संशोधनासाठी भारतीय वंशाच्या प्राध्यापकाला अनुदान 
अमेरिकेच्या ताहिर हुसेन या भारतीय वंश असलेल्या प्राध्यापकाला लठ्ठपणामुळे उद्भवणार्‍या सूजपासून मूत्रपिंडाचे संरक्षण करण्यासंबंधी संशोधन चालविण्यासाठी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ (NIH) कडून $1.6 दशलक्षचे अनुदान प्राप्त झाले आहे.

डॉ. ताहिर हुसेन हे हॉस्टन विद्यापीठ येथे औषधनिर्माणशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कामावर आहेत. ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. ते सक्रिय AT2R असलेल्या आणि AT2R नसलेल्या मूत्रपिंडांमधील सूजेमुळे होणार्‍या प्रभावांचा अभ्यास करतील.



भारतीय किशोरवयीन मुलांचा उपग्रह मेक्सिको शहरातून अंतराळात पाठविण्यात आला 
भारतीय किशोरवयीन मुलांनी तयार केलेला ‘अनीता-सॅट’ नावाचा उपग्रह 8 मे 2018 रोजी मेक्सिको शहरातील अझ्त्रा लॅब्स येथून अवकाशात सोडण्यात आला आहे.

तिरुची येथील आर.एस.के. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 17 वर्षीय दोन विद्यार्थ्यांनी वायुप्रदूषण आणि वैश्विक तापमान वाढीचे परिणाम मोजण्यासाठी हा उपग्रह तयार केला होता. 

हा उपग्रह 500 ग्रॅम वजनी होता आणि याला हेलियम फुग्याच्या मदतीने 15 किलोमीटरच्या उंचीवर ट्रोपोस्फीयरमध्ये पाठविण्यात आले.