अंदमान व निकोबारमधील तीन बेटांचे नामकरण

३० डिसेंबर २०१८ रोजी अंदमान व निकोबारमधील तीन बेटांच्या नावात बदल करण्यात आले आहे. नव्या बदलानुसार आता बेटांचे नामकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहेत

रॉस बेटाचे नामकरण – नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप
नैल बेटाचे नामकरण – शहीद द्वीप
हेवलॉक बेटाचे नामकरण – स्वराज्य द्वीप

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकवण्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ही घोषणा करण्यात आली आहे. ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजींनी या बेटावर सर्वप्रथम तिरंगा फडकवला होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडविरुद्ध लढणाऱ्या जपानने अंदमान निकोबार बेटांचा परिसर ताब्यात घेतल्यानंतर नेताजींची हे ध्वजारोहण केले होते.

जालंधर येथे १०६ वी ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC)’ या कार्यक्रमाचे आयोजन

पंजाब राज्यात जालंधर या शहरात ३ ते ७ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार्‍या ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC) २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. ही जगातली सर्वात मोठी विज्ञान परिषद आहे.


‘फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर ही परिषद भरवली जाणार नाही. लवली प्रॉफेशनल विद्यापीठ (LPU) तर्फे या परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

या पाच दिवस चालणार्‍या परिषदेत चिकित्सा, रसायन, पर्यावरण आणि विज्ञानाच्या इतर क्षेत्रांसहित १८ पूर्ण सत्र होणार. या कार्यक्रमात जगभरामधील जवळपास १५००० प्रतिनिधी, ३०० शास्त्रज्ञ भाग घेतील.

भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे. याची १०१४ साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात. यामध्ये 30,000 हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत.

१५-१७ जानेवारी १९१४ या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली. ISCA च्या नेतृत्वात आयोजित भारतीय विज्ञान परिषद (Indian Science Congress -ISC) हा विज्ञान क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे.


सुधीर भार्गव: नवे मुख्य माहिती आयुक्त

सुधीर भार्गव यांची केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्‍तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय चार माहिती आयुक्‍तांचीही नेमणूक करण्यात आली आहे.


सुधीर भार्गव हे माहिती विभागात सूचना आयुक्‍त आहेत आणि त्‍यांना आता बढती देत मुख्य आयुक्‍तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी IFS अधिकारी यशवर्धन कुमार सिन्हा, माजी IRS अधिकारी वनजा एन सरना, माजी IAS नीरज कुमार गुप्ता आणि माजी विधी सचिव सुरेश चंद्र यांच्या केंद्रीय माहिती अयोगात माहिती आयुक्‍तपदी नियुक्‍तीला मंजुरी दिली आहे. 

मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथुर आणि माहिती आयुक्त यशोवर्धन आझाद, श्रीधर आचार्युलू आणि अमिताव भट्टाचार्य यांच्या निवृत्तीनंतर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

शेख हसीना: बांग्लादेशाच्या परत पंतप्रधान

बांग्लादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना व त्यांचा पक्ष ‘अवामी लीग’ सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे. त्या बांग्लादेशाच्या 11व्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.


३०० जागांपैकी २६० जागा जिंकत सत्तारूढ अवामी लीगच्या नेतृत्त्वाखालील आघाडीने बांग्लादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळवले आहे. यात सहयोगी पक्षांना २१ जागा मिळाल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय एकता फ्रंट (UNF) आणि BNP यांच्या आघाडीला फक्त ७ जागा मिळाल्या आहेत.

बांग्लादेश हा बंगालचा उपसागरालगत असलेला भारताच्या पूर्वेकडे असलेला दक्षिण आशियाई देश आहे. ढाका ही देशाची राजधानी असून चलन बांग्लादेशी टाका हे आहे.