ASI ने सहा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व घोषित केले

या साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून सहा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ म्हणून घोषित केले आहे. ते आहेत. 


महाराष्ट्रात नागपूरमधील उच्च न्यायालयाची १२५ वर्ष जुनी इमारत
आगा खानची हवेली आणि हाथी खाना (दोन्ही आग्रामधील मुगलकालीन स्मारके), नीमराना बाओरी (राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातली प्राचीन इमारत), रानीपूर झारेल (बोलंगीर जिल्हा, ओडिशा) येथील मंदिरांचे गट
कोटली (पिटोरागड जिल्हा, उत्तरखंड) येथील विष्णू मंदिर

‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वविषयक ठिकाणे व अवशेष अधिनियम-१९५८’ यामध्ये ‘प्राचीन स्मारक’ या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत ‘प्राचीन स्मारक’ घोषित केले जाते, जे ऐतिहासिक आहे आणि १०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे.


या सहाने देशात आता ASI अंतर्गत ३६९३ संरक्षित स्मारके आहेत. त्यात उत्तरप्रदेश (७४५ स्मारके/स्थळे), कर्नाटक (५०६) आणि तामिळनाडू (४१३) या राज्यांमध्ये ASIची सर्वाधिक संख्या आहे.


ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांचे कॅनडात ३१ डिसेंबर २०१८ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.

२२ ऑक्टोबर १९३७ रोजी काबुल येथे जन्मलेल्या कादर खान यांनी १९७३ साली ‘दाग’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्द सुरु केली होती. यापूर्वी ‘जवानी दिवानी’ या चित्रपटासाठी त्यांनी संवाद लेखन केले होते. 

त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केले होते. कादर खान यांनी सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले आणि २५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केलेले आहे.


लोकसभेत ‘भारतीय वैद्यकीय परिषद (दुरुस्ती) विधेयक’ संमत

३१ डिसेंबर २०१८ रोजी लोकसभेत ‘भारतीय वैद्यकीय परिषद (दुरुस्ती) विधेयक-२०१८’ संमत करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात काढलेल्या अध्यादेशाला बदलण्यासाठी हे विधेयक तयार करण्यात आले.


या विधेयकानुसार प्रख्यात व्यवसायिकांच्या एका समितीला ‘भारतीय वैद्यकीय परिषद (MCI)’ चालवण्याची परवानगी देण्यात आली. हे विधेयक संचालक मंडळामध्ये (Board of Governors -BoG) परिषदेचे अधिकार प्रदान करते. विधेयकानुसार BoG मध्ये नामवंत व्यक्ती असतील आणि एम्स आणि पीजीआय चंदीगडचे संचालकही यात असतील.

वर्तमान ‘भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम-१९५६’ याच्या जागी ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) विधेयक-२०१७’ देशात आणण्यासाठी या विधेयकामुळे मार्ग मोकळा झाला आहे.

वर्तमान ‘भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम-१९५६’ याच्या जागी ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) विधेयक-२०१७’ देशात आणण्यासाठी या विधेयकामुळे मार्ग मोकळा झाला आहे. 

देशामध्ये वैद्यकीय शिक्षण गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी आणि वैद्यकीय सेवांच्या सर्व पैलूंमध्ये उच्च मानदंड राखण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) याच्या जागी ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC)’ या नवीन संरचनेची स्थापना करण्याचे प्रस्तावित केले गेले आहे.

ICC महिला ODI आणि T20I ‘टीम ऑफ द इयर 2018’ जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘महिला ODI टीम ऑफ द ईयर २०१८’ आणि ‘महिला T20I टीम ऑफ द ईयर २०१८’ या संघांना जाहीर केले आहे.

न्यूझीलँडच्या सुझी बेट्स हिला ‘महिला ODI टीम ऑफ द ईयर २०१८’ या संघाचे कर्णधारपद दिले आहे.

भारताच्या हरमनप्रीत कौर हिला ‘महिला T20I टीम ऑफ द ईयर २०१८’ या संघाचे कर्णधारपद दिले आहे.

तसेच या संघांमध्ये स्मृती मंदाना आणि पुनम यादव या दोन भारतीय आहेत.

स्मृती मानधना ठरली यंदाची सर्वोत्तम क्रिकेटपटू:

भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे. 


वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासह स्मृतीला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले आहे

तसेच २२ वर्षीय स्मृतीला २०१८ च्या ICC च्या यंदाच्या टी-20 आणि एकदिवसीय संघातही स्मृतीला स्थान देण्यात आले आहे.

स्मृतीने वर्षभरात १२ एकदिवसीय सामन्यात ६७ च्या सरासरीने ६६९ धावा केल्या. तर २५ टी-20 सामन्यांत सुमारे १३० च्या स्ट्राईक रेटने ६२२ धावा लगावल्या. स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

तर या स्पर्धेत तिने ५ सामन्यांत १२५.३५ च्या स्ट्राईक रेटने १७८ धावा केल्या होत्या. ICC च्या महिला क्रिकेटपटूच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीतही ती अनुक्रमे चौथ्या व १० व्या स्थानी आहे.

NASAच्या अंतराळयानाने आतापर्यंतचे सर्वात दूरचे छायाचित्र काढले

अमेरिकेच्या NASAच्या पाठविलेल्या अंतराळयानाने आतापर्यंतच्या सर्वात दूरवरच्या सर्वात जुन्या घटकाचे छायाचित्र काढले आहे.

‘अल्टिमा थुले’ हे आतापर्यंतचे अंतराळातले सर्वात दूरवरचे लहान घटक आहे. हे घटक पृथ्वीपासून सुमारे चार अब्ज मैल दूर आहे, जे ‘क्विपर बेल्ट’ क्षेत्रामध्ये आहे.