पोर्ट ब्लेअरचे वीर सावरकर विमानतळ अधिकृत ‘इमिग्रेशन तपास नाका’ म्हणून घोषित
सर्व प्रवाशांच्या प्रवासासाठी वैध प्रवासी दस्तऐवजांसह भारतात प्रवेश घेण्यासाठी / बाहेर जाण्यासाठी सुविधा म्हणून अंदमान-निकोबारच्या पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला अधिकृत ‘इमिग्रेशन तपास नाका’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. 


इमिग्रेशन तपास नाक्याचा हेतू पूर्ण करण्यासाठी अंडमान आणि निकोबार पोलीस विभागाचे पोलिस अधीक्षक (CID) यांना ‘नागरी अधिकारी’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.



बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. ही योजना १ एप्रिल २०१९ पासून लागू होईल.

निर्णयानुसार, हस्तांतरी (ज्याच्या नावावर संपत्ती किंवा कागदपत्रे हस्तांतरित केली आहेत अशी / transferee) बँक म्हणून बँक ऑफ बडोदा तर विजया बँक आणि देना बँक हस्तांतरक (transferor) बँका असतील.

योजना सुरु झाल्यानंतर हस्‍तांतरणकर्ता बँकांचे सर्व व्‍यवसाय हस्‍तांतरित बँकेला हस्‍तांतरित केले जातील आणि हस्‍तांतरित बँकेकडे सर्व व्‍यवसाय मालमत्ता, अधिकार, स्‍वामित्‍व, दावे,परवाने, मान्यता, अन्‍य विशेषा‍धिकार आणि सर्व संपत्ती, देणी, दायित्‍व असतील

हस्‍तांतरणकर्ता बँकेचे सर्व स्‍थायी आणि नियमित अधिकारी किंवा कर्मचारी हस्‍तांतरित बँकेत अधिकारी आणि कर्मचारी असतील.  हस्‍तांतरित बँक हस्‍तांतरणकर्ता बँकेच्या भागधारकांना समभाग अदला-बदली गुणोत्तरानुसार समभाग जारी करेल. 

भारतातल्या बॅंकांचे हे पहिलेच त्रिपक्षीय विलीनीकरण असेल. विलीनीकरणांनंतर ही बँक देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनणार.

विलीनीकरणामुळे गुणवत्तेचे मोठे भांडार प्राप्‍त होईल आणि मोठा डाटाबेस मिळेल ज्याचा लाभ वेगाने डिजिटलाईज्ड होणाऱ्या बँकिंग प्रणालीत स्पर्धात्मक लाभ उठवण्यासाठी होईल. लोकांना मजबूत नेटवर्कच्या माध्‍यमातून व्‍यापक बँकिंग सेवा उपलब्ध होतील आणि कर्ज सहजपणे उपलब्ध होईल.


NHAची ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण’ म्हणून पुनर्रचना करण्यास मंजुरी
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी सध्याच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेची (NHA) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) म्हणून पुनर्रचना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

यानुसार सध्याची राष्ट्रीय आरोग्य संस्था विसर्जित होऊन त्याची जागा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण घेणार. हे प्राधिकरण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संलग्न राहणार.

यासाठी नवा निधी मंजूर करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य संस्थेसाठी याआधी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी या प्रस्तावित प्राधिकरणासाठी उपयोगात आणला जाईल.

प्रधान मंत्री – जन आरोग्य योजना (PM-JAY) याची उत्तम अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. योजनेच्या सुलभ आणि त्वरित अंमलबजावणीसाठी एक प्रशासकीय मंडळ असणार आहे, ज्याचे अध्यक्ष केंद्र सरकारचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री असतील



सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे निधन 
क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे २ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचा सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंची कारकिर्द घडवण्यात मोठा वाटा होता.

त्यांना भारत सरकारकडून १९९० साली क्रिडा क्षेत्रात प्रशिक्षकांना दिला जाणारा सर्वोच्च ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ देऊन सन्मान केला होता. शिवाय २०१० साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.



के. पी. जॉर्ज: अमेरिकेमध्ये टेक्सास येथील फोर्ट बेंड काउंटी न्यायाधीश 
भारतीय मूळ असलेल्या अमेरिकेमधील के. पी. जॉर्ज यांना टेक्सास येथील ‘फोर्ट बेंड काउंटी न्यायाधीश’ पदाची शपथ देण्यात आली आहे.

यासोबतच के. पी. जॉर्ज हे अमेरिकेतल्या सर्वाधिक सांस्कृतिक विविधता असलेल्या प्रदेशाच्या कार्यालयात प्रथम पद धरण करणारी पहिली भारतीय-अमेरिकी व्यक्ती बनले आहेत.