ICC क्रिकेट पुरस्कार 2018
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘ICC क्रिकेट पुरस्कार 2018’ या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात भारताचा विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासात पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने सर्वोच्च तीन पुरस्कार पटकावले आहेत. 


ते म्हणजे –
ICC वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (सर गारफील्ड सोबर्स चषक)
ICC वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी खेळाडू
ICC वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू

यासोबतच, ICC पुरस्कारांमध्ये ‘क्लीन स्वीप’ प्राप्त करणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला. शिवाय ICC कसोटी संघ व ICC एकदिवसीय (ODI) संघाचा कर्णधार म्हणूनही त्याची निवड करण्यात आली आहे.

इतर पुरस्कारांचे विजेते-
ICCचा वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू – ऋषभ पंत (भारत)
फॅन्स मोमेंट ऑफ द इयर – भारत 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला
वर्षातील सर्वोत्तम पंच – कुमार धर्मसेना (श्रीलंका)
ICC खिलाडूवृत्तीचा पुरस्कार – केन विल्यम्सन (न्यूझीलँड)
ICC वर्षातील सर्वोत्तम टी-20I कामगिरी – एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) जम्मूच्या कठूआ जिल्ह्यात केरियन गंडियाल पूलाचे राष्ट्रार्पण
जम्मू-काश्मीरमध्ये, केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जम्मूच्या कठूआ जिल्ह्यात केरियन गंडियाल पूलाचे राष्ट्रार्पण करण्यात आले.

केरियन गंडियाल पूल रावी नदीवर बांधण्यात आला आहे. या पूलाची लांबी सुमारे 1.2 किलोमीटर एवढी आहे. याच्या बांधकामाला 158.84 कोटी रुपयांचा खर्च आला. हा पूल जम्मूमधील कठूआ आणि पंजाबमधील पठाणकोट या ठिकाणांना जोडतो.गुवाहाटीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ‘जोयमती बहीणी’ हे रेल्वे सुरक्षा दलाचे नवे पथक तैनात
आसामच्या गुवाहाटी शहरात भारतीय रेल्वेच्या ‘जोयमती बहीणी’ या महिला सुरक्षा दलाच्या नव्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गुवाहाटीच्या कामाख्या रेल्वे स्थानकावर एका कार्यक्रमात या पथकाचे औपचारिकपणे उद्घाटन करण्यात आले. 

आसाममध्ये लुमदिंग विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने ईशान्य क्षेत्रातल्या रेल्वेच्या परिसरात आणि गाड्यांमध्ये महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हे पथक तयार केले.


सी व्हिजील 2019: भारतीय नौदलाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा तटीय संरक्षण सराव अभ्यास
भारतीय सागरी किनारपट्टीला संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने, “26/11″च्या हल्ल्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी, दिनांक 22 जानेवारी 2019 रोजी भारतीय नौदलाने ‘सी व्हिजील 2019’ (SEA VIGIL) नावाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तटीय संरक्षण सराव अभ्यासाला सुरुवात केली.

सर्व समुद्री भागधारक, कोळी आणि तटीय समुदाय यांच्या सहकार्याने भारताला लाभलेली 7516.6 किलोमीटरची संपूर्ण किनारपट्टी आणि भारताचे विशिष्ट आर्थिक क्षेत्र तसेच 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.

या सरावादरम्यान भारतीय विकास क्षेत्र आणि लागून असलेल्या बेटांच्या सुरक्षिततेबाबत सागरी पाळत व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सागरी पोलीसांच्या समर्थनाने भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल एकत्र येवून हा कार्यक्रम चालवत आहेत.JNPT: जगातल्या प्रथम 30 प्रमुख कंटेनर बंदरांमध्ये सूचीबद्ध होणारे एकमेव भारतीय बंदर
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) हे जगातल्या प्रथम 30 प्रमुख कंटेनर बंदरांमध्ये सूचीबद्ध होणारे एकमेव भारतीय बंदर ठरले आहे.

लॉयड्स कंपनीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात प्रमुख कंटेनर बंदरांच्या सूचीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) याला 28 वे स्थान मिळाले आहे.

‘व्यवसाय सुलभीकरण’ पुढाकाराच्या अंतर्गत सक्रिय केलेल्या विविध नवीन प्रक्रियांनी बंदर व्यवसायाच्या एकूण वाढीस मदत केली आहे आणि सोबतच आयात आणि निर्यात यामधील वेळ आणि खर्च वाचविण्यास देखील मदत झाली आहे. 

JNPT ने सुलभ व्यवस्थापनासाठी आपली स्वत:ची ऍप सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे मालवाहतुकीच्या विविध टप्प्यात त्याचा मागोवा घेण्यास मदत मिळाली.