भारताची क्षेपणास्त्रे

स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे हवाई संरक्षणाकडे फार उशिरा लक्ष गेले. पाकिस्तानबरोबरच्या १९६५ च्या युद्धानंतर हवाई संरक्षणाला चालना मिळाली आणि इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये अणु-स्फोटाचा प्रयोग करून भारताने अण्वस्त्रधारी राष्ट्राकडे वाटचाल केली.

 विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात भारतास शेजारील पाकिस्तान व चीन या राष्ट्रांच्या युद्धपिपासू वृत्तीला पायबंद घालण्यासाठी हवाई संरक्षणाची निकड भासली कारण पाकिस्तानने एम्-११ क्षेपणास्त्रे चीनकडून खरेदी केली.
भारताच्या सीमावर्ती प्रदेशांतील या शेजारच्या देशांची आक्रमक वृत्ती आणि घुसखोरी याला प्रतिबंध करण्यासाठी भारताने १९९५ मध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी एस्-३०० ही क्षेपणास्त्रे रशिया-कडून मिळविली.
पुढे मे १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे अण्वस्त्राचा यशस्वी स्फोट करून अण्वस्त्रधारी राष्ट्राचा दर्जा प्राप्त केला आणि क्षेपणास्त्राची निष्कास योजनाही कार्यवाहीत आणली. त्यानंतर अल्पावधीतच पाकिस्ताननेही अणुस्फोट करून अण्वस्त्रधारी राष्ट्राचा दर्जा प्राप्त केला.
१९९९ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये कारगील युद्ध होऊन त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. या युद्धात भारतीय हवाई दलाने स्पृहणीय कामगिरी केली. तत्पूर्वी पाकिस्तानातील लोकांनी अण्वस्त्रांचा वापर करावा म्हणून त्या देशावर दडपण आणले होते पण पाकिस्तानने हवाई संरक्षणावर भर देऊन अमेरिकेकडून लष्करी मदत घेतली.
त्या वेळी भारताने क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्र यंत्रणेच्या कार्यक्रमास प्राधान्य दिले आणि ४० खासगी व सार्वजनिक कंपन्यांना या उपक्रमाधिकारात सामील करून घेतले. त्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., भारत डायनॅमिक्स लि., ॲस्ट्रॉ मायक्रोवेव्ह, ए. एस्. एल्. लार्सन अँड टुब्रो, व्हेम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लि., केल्टेक इ. कंपन्यांचा अंतर्भाव होता.
या वेळी भारतानेमल्टी फंक्शन फायर कंट्रोल रडार (एम्. एफ्. सी. आर्.) विकसित केले. तसेच डिफेन्स रिसर्च अँड डिव्हेलप्मेन्ट लॅबरेटरी (डी. आर्. डी. एल्.) या संस्थेने मिशन कंट्रोल सॉफ्टवेअर हे ॲड्व्हान्स्ड एअर डिफेन्स (ए.ए. डी.) क्षेपणास्त्रांना शह देण्यासाठी बनविले.
यांशिवाय रिसर्च सेंटर इर्मात या संस्थेने इलेक्ट्रोमेकॅनिकल ॲक्चूएशन (कार्यप्रवण) सिस्टिम्स आणि ॲक्टिव्ह रडार सिकरची रचना केली. त्यानंतर त्यांनी प्रक्षेपी क्षेपणास्त्र संरक्षण हा बहुस्तरीय कार्यक्रम योजिला. 
 
त्याचा हेतू क्षेपणास्त्राच्या हल्ल्यांपासून भारताचे संरक्षण करणे हा होता. ती द्विस्तरीय योजना असून तीत उंचीवरून आकाशात मारा करणारी व जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणारी तद्वतच शत्रूच्या अंतर्गामी क्षेपणास्त्राशी मुकाबला करणारी अशी क्षेपणास्त्रे बनविण्याची योजना होती.
अंतर्गामी ५,००० किमी.वरील क्षेपणास्त्राचा अंतर्च्छेद घेऊ शकेल, अशा क्षेपणास्त्रभेदी पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नोव्हेंबर २००६ मध्ये झाली. त्यानंतर डिसेंबर २००७ मध्ये ॲड्व्हान्स्ड एअर डिफेन्स क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आणि भारत हा क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात अमेरिका, रशिया व इझ्राएल यांखालोखाल चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला.
६ मार्च २००९ रोजी भारताने आणखी एका परिरक्षक क्षेपणास्त्राची यशस्वीचाचणी करून शत्रूच्या अंतर्गामी क्षेपणास्त्राचा आकाशात धुव्वा उड- विण्यात यश मिळविले.
पुढे १० फेब्रुवारी २०१२ रोजी ॲड्व्हान्स्ड एअर डिफेन्सने भुवनेश्वर (ओडिशा) पासून १७० किमी.वर असलेल्या समुद्रातील व्हीलर बेटावर यशस्वी प्रयोग केला.
त्याच वर्षी २३ नोव्हेंबरला भारतात बनविलेले सुपरसॉनिक ॲड्व्हान्स्ड एअर डिफेन्स अंतर्च्छेद क्षेपणास्त्र ओडिशाच्या पूर्व किनाऱ्यावरील संरक्षित तळावरून उडविण्यात आले.
या हवाई संरक्षणाच्या कार्यक्रमांना रडार यंत्रणेची नितान्त आवश्यकता असते. यातील स्वोअर्डफिश रडारची क्षमता ६००–८०० किमी. पल्ल्यावरील लक्ष्य टिपण्याची असून क्रिकेट बॉलएवढी लहान वस्तूसुद्धा त्याच्या कक्षेतून सुटत नाही. त्याचा पल्ला १,५०० किमी. पर्यंत वाढविण्याचा डीआर्डीओचा प्रयत्न असून डॉ. व्ही. के. सारस्वत या शास्त्रज्ञांचे प्रयत्न त्याची क्षमता २०१६ पर्यंत ५,००० किमी. पल्ल्यापर्यंत नेण्याचे आहेत.
हवाई संरक्षणाचा एक अत्यंत प्रगत भाग म्हणून लेसरच्या अधःस्तरावरील महाप्रकल्प अस्त्र बनविण्याचा भारताचा प्रयत्न असून ते शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा अंतर्च्छेद घेऊन ते नष्टही करेल.
प्रक्षेपण पद्धतीनुसार क्षेपणास्त्र प्रकारजमिनीवरून जमिनीवरील क्षेपणास्त्रेस्थलसेनेच्या युद्धामध्ये या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा उपयोग केला जातो. या प्रकारात हारपुन, मिनीटम, पिसकीपर, इत्यादीचा समावेश होतो.
जमिनीवरून हवेतील क्षेपणास्त्रेजमिनीवरील युद्धात सामन्य पल्ल्याची क्षेपणास्त्रे उपयोगी ठरतात. भारताची आकाश, त्रिशूल, हि याच मालिकेतील क्षेपणास्त्रे आहेत.

हवेतून हवेतील क्षेपणास्त्रे

विमाने, हेलीकॉप्टर, इत्यादी मधून शत्रूवर मारा करण्यासाठी या प्रकारची क्षेपणास्त्रे उपयोगात आणली जातात.

हवेतून जमिनीवरील क्षेपणास्त्रे

हवाई युद्धामध्ये आणि जमिनीवरील युद्धामध्ये या प्रणालीतील क्षेपणास्त्रे यांचा उपयोग केला जातो. भारताकडे लेसर, केरी, व करीन ही क्षेपणास्त्रे आहेत.

पल्ल्यावरून क्षेपणास्त्र प्रकार

कमी पल्ल्याची स्फोटक क्षेपणास्त्रे

जमिनीवरील युद्धामध्ये किंवा हवाई युद्धामध्ये उपयोगी ठरणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला.

मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे

सामान्यपणे ५०० ते १५०० सामुद्रिक मैलापासून मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या उपयोगाने युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

माध्यमिक पल्ल्याची स्फोटके

१५०० ते ५००० किमी सामुद्रिक मैलासाठी परिणामकारक मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे उपयोग युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्रे

५००० सामुद्रिक मैलापेक्षा अधिक दूरवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा समावेश या वर्गात केला जातो.

  स्थानकानुसार क्षेपणास्त्र प्रकारपाणबुडीवरून व जहाजावरून सोडलेले क्षेपणास्त्र

जमिनीपेक्षा जलपृष्ठभाग मोठा असल्याने रणभूमी म्हणून समुद्री पृष्ठभाग अधिक महत्वाचा आहे. आरमारी युद्धात किंवा नौसेना युद्धामध्ये SLBM हे क्षेपणास्त्रे अतिशय महत्वाचे शस्त्र आहे.

क्रुझ क्षेपणास्त्र

आजच्या अस्त्रामध्ये हे अतिशय अत्याधुनिक आणि विस्मयकारी अस्त्र आहे. प्राचीन काळातील ब्रम्हास्त्र प्रमाणेच ते आहे. एकदा मार्ग आखून दिला कि निर्धास्तपणे शेकडो किलोमीटर अंतर अल्पावधीत ते कापते. जमिनीच्या उंच सखल भागानुसार क्रुझ आपले अंतर कमी जास्त करते. क्रुझ क्षेपणास्त्र याचे वजन १,२०० किमी व लांबी ६.४ मीटर असते. १००० तशी वेगाने हे क्षेपणास्त्र २,४०० किमी अंतर सहजपणे तोडू शकते.

लान्स क्षेपणास्त्र

टक्टीकल गटातील या क्षेपणास्त्र यांच्याद्वारे न्यूट्रोन बॉम्बचा उपयोग करण्यात येतो. या क्षेपणास्त्र यांच्या मदतीने १३० किलोमीटर अंतरापर्यंत न्युट्रोन बॉम्ब फेकता येतो. या क्षेपणास्त्राद्वारे ४० ते १०० किलो टनाची क्षमतेची अण्वस्त्रे प्रक्षेपित करता येतात.

MX क्षेपणास्त्र

स्ट्रेटेजिकल क्षेपणास्त्र मालिकेतील हे क्षेपणास्त्र रामायणातील दिव्य बाणाप्रमाणेच आहे. अतिशय अवाढव्य अशा या क्षेपणास्त्राचे वजन एक लाख पौंड असते. ७१ फुट लांबीच्या या क्षेपणास्त्रावर व्यास ७.७ फुट एवढा असतो.

भारतीय क्षेपणास्त्रे

अग्नी क्षेपणास्त्रप्रथमता २२ मे १९८९ रोजी ७ वाजून १७ मिनिटानी ओरिसातील चांदीपूर तळावरून अग्नीची पहिली चाचणी झाली.
आतापर्यंत विकसित कार्यक्रमात अनेक चाचण्या होऊन अग्नी क्षेपणास्त्र हे दीर्घपल्ल्याचे गाईडेड प्रक्षेपणास्त्र असल्याचे यशस्वी सिद्ध झालेले आहे.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यावर सरळ हल्ला करीत नाही. क्षेपणास्त्राचे उड्डाण होताच क्षेपणास्त्र आकाशाच्या दिशेने झेप घेते.
सुमारे ३५० किमी अंतर कापून ते पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाते. नंतर गोलाकार फिरून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने झेप घेते.
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून आपल्या लक्ष्यावर अचूक हल्ला करते. त्याचा सध्याचा पल्ला ५००० किलोमीटर असून पुढील आवृत्ती मध्ये ते आंतरखंडिय क्षेपणास्त्र ८००० ते १०००० किलोमीटर पल्ल्याचे म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न चालु आहे. हा संस्कृत मूळ असलेला शब्द आहे.
भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
अग्नि-१ क्षेपणास्त्र सातशे किलोमीटरचा पल्ला असलेले (१९ एप्रिल २०१२)
अग्नि-२ क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटरचा पल्ला असलेले (१५ सप्टेंबर २०१३) भारतानं अग्नी 2 या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली आहे. इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स 4 मधून मोबाइल लाँचरच्या माध्यमातून अग्नी 2 ची चाचणी घेण्यात आली. अग्नी 2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी 2 चा माऱ्याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे.
भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे.
अग्नि-३ क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ३५०० किलोमीटरचा पल्ला असलेले (३१ जानेवारी २०१५)
अग्नि-४ क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र 4000 किलोमीटरचा पल्ला असलेले (९ नोव्हेंबर २०१५)
अग्नि-५ क्षेपणास्त्र आंतरखंडीय क्षेपणास्त्र ५००० किलोमीटरचा पल्ला असलेले (२६ डिसेंबर २०१६ला चाचणी यशस्वी) या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनी पेक्ष्या 24 पटीने अधिक आहे.
अग्नि-६ क्षेपणास्त्र आंतरखंडिय क्षेपणास्त्र ६००० ते १०००० किलोमीटर पल्ला असलेले विकसित केले जात आहे.
पृथ्वी क्षेपणास्त्रसुरवातीस २५ फेब्रुवारी १९८८ रोजी पृथ्वी क्षेपणास्त्राची सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र रशियाच्या SS १५० या श्रेणीचे असून त्याचा मारा १५० ते २५० किमी चा आहे.
या टक्टीकल बटलफिल्ड मिसाईल याचा पल्ला ४० ते २५० कि मी असून जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यात येणाऱ्या या प्रणालीचा या प्रणालीचा विकास मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे.
इतर क्षेपणास्त्रेत्रिशूलजमिनीवरून आकाशात त्वरित झेपावणाऱ्या या क्षेपणास्त्राची रचना रशियाच्या SAM – SA-८ प्रणालीवर आहे. त्या क्षेपणास्त्रचा पल्ला ५०० मीटर ते ९ किमी आहे.
 

आकाश

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या sam प्रकारातील आकाश क्षेपणास्त्र रचना हवाई संरक्षणासाठी करण्यात आलेली आहे. द्विस्तरीय भारवाहक क्षमतेच्या या क्षेपणास्त्राचा पल्ला २५ किमी आहे.

नाग

रणगाडाविरोधी हे क्षेपणास्त्र गोळ्या झाडा व विसरून जा आणि वून आक्रमण तत्वावर तयार झालेले आहे. शत्रूचे रणगाडे फोडणारे नाग क्षेपणास्त्र शत्रूचे मनोध्यर्य नष्ट करणारे व शत्रूला गर्भगळीत करणारे क्षेपणास्त्र आहे.

ब्राम्होस

ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने धावणारे हे क्षेपणास्त्र १४ किमी उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. त्याची मारक क्षमता २५० कि मी पर्यत आहे.

सूर्य क्षेपणास्त्र

भारतीय संरक्षण संशोधन विकास संघटनेच्या शास्त्रज्ञकडून सूर्य क्षेपणास्त्राचा विकास करण्यात आला आहे. सूर्य क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५००० कि मी एवढी असेल. या क्षेपनास्त्रावरून ३००० कि मी पर्यत अणुविषयक शास्त्र वाहून नेण्याची क्षमता राहणर आहे.

अस्त्र क्षेपणास्त्र

DRDO या विभागाने या अस्त्राची निर्मिती केली असून हे अस्त्र क्षेपणास्त्र हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

दानुष क्षेपणास्त्र

त्रिशूल क्षेपणास्त्र मालिकेतील हे क्षेपणास्त्र लढाऊ जहाजावरून सोडण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे आहे. पुष्ठभागावरून १५० ते ३०० समुद्री मैलावरून मारा करू शकते.

धनुष क्षेपणास्त्र

कमी पल्ल्याच्या पृथ्वीक्षेपनास्त्र मालिकेतील या धनुष क्षेपणास्त्र याचा विकास करण्यात आला होता. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २५० कि मी आहे.