चांद्रयान १

चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयानअसून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत.

 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.

१४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील ‘शॅकलटन क्रेटर’ येथे आदळला. हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.या दूरसंवेदनशील (रिमोट सेन्सिंग) अंतराळयानाचे वस्तुमान प्रक्षेपणाच्या वेळी ११३० किलोग्रॅम होते व ते चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यावर ६७५ किलोग्रॅम असेल.या अंतराळयानावर उच्च अचूकतेची (रिझोल्यूशनची) दृश्य व अवरक्त प्रकाश तसेच क्ष-किरणांसाठीची दूरसंवेदन उपकरणे आहेत.

 या यानाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून या काळात त्याच्याकडून चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करून त्याचा संपूर्ण रासायनिक नकाशा तयार करणे तसेच चंद्राच्या संरचनेचा त्रिमितीय नकाशा तयार करणे अपेक्षित आहे. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांना अधिक महत्त्व दिले आहे, कारण तिथे बर्फ असण्याची शक्यता आहे.
या मोहिमेचा एकूण खर्च अंदाजे ३८६ कोटी रुपये इतका आहेया मोहिमेमध्ये इस्रोचे पाच भार (payload) व इतर अंतराळसंस्थांचे सहा भार आहेत. यामध्ये नासा, इसा व बल्गेरियाची अंतराळ संस्था यांचा समावेश आहे. या अंतराळ संस्थांची उपकरणे विना-आकार वाहून नेली जात आहेत.

उद्दिष्टे

या मोहिमेची मांडण्यात आलेली उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
अंतराळयानाचा आराखडा तयार करणे, ते विकसित करणे, त्याचे प्रक्षेपण करणे तसेच भारतीय बनावटीच्या प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने चंद्रयानाला चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थित करणे.
यानावरील उपकरणांद्वारे शास्त्रीय प्रयोग करून खालील उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करणेचंद्राच्या पृथ्वीकडील तसेच पलीकडील भागाचा त्रिमितीय नकाशा तयार करणे, (ज्याची उंची व अंतर या बाबतीतील अचूकता (spatial and altitude resolution) ५-१० मी. असेल)
चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक मूलद्रव्ये व खनिजे दर्शविणारा नकाशा तयार करणे.
यामध्ये मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटॅनियम या मूलद्रव्यांचा तसेच रेडॉन, युरेनियम, थोरियम या जड मूलद्रव्यांचा समावेश आहे.

भविष्यातील चंद्रावर अलगद उतरणाऱ्या यानांची नांदी व चाचणी म्हणून “मून इम्पॅक्ट प्रोब” चंद्रावर विशिष्ट जागी आदळवणे.

तपशील

वस्तुमानप्रक्षेपणाच्या वेळी १३८० किलोग्रॅम, चंद्राच्या कक्षेत गेल्यावर ६७५ किलोग्रॅम.आणि “मून इम्पॅक्ट प्रोब” वेगळे झाल्यावर ५२३ किलोग्रॅम.

आकारमान

१.५ मीटर बाजू असलेला जवळपास घनाकृती (घनाभ)दूरसंचार यंत्रणाभार उपकरणांच्या माहिती दळणवणासाठी एक्स बँड मध्ये काम करणारा, ०.७ मी. व्यास असलेला लंबवर्तुळाकार अँटेना.
यान नियंत्रणासाठी होणारे दळणवळण (Telemetry, Tracking & Command (TTC) communication) एस बँड मध्ये केले जाते.
ऊर्जा-यानाला मुख्यत्वेकरून २.१५ * १.८ मी. क्षेत्रफळाच्या सौर-पटलद्वारे (solar panel) जवळपास ७०० वॅट जोर मिळतो. ही सौरउर्जा ३६ ॲम्पियर-तास क्षमतेच्या लिथियम-आयन विद्युतघटांमध्ये (Lithium-ion battery) साठविली जाते.
यानावर जोडलेली बाय-प्रोपेलंट (bipropellant)[मराठी शब्द सुचवा] प्रक्षेपण प्रणाली यानाला चंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच त्याला चंद्राभोवतीच्या कक्षेत ठेवण्यासाठी उपयोगात येईल.
अंतरिक्ष यानाचा प्रवासपी.एस.एल.व्ही. सी११, जे चंद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आले होते.
चंद्रयान ऑक्टोबर २२, २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले. हे प्रक्षेपण इस्रोचे ४४.४ उंचीचे व चार टप्प्यांचे पी.एस.एल.व्ही. प्रक्षेपक वापरून करण्यात आले.
यान चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी जवळपास पंधरा दिवस लागतील. पिन्या, बंगळूर येथील इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क पुढील दोन वर्षे यानाच्या मागावर असेल तसेच त्याचे नियंत्रण करेल.
पी.एस.एल.व्ही. प्रक्षेपकाने चंद्रयानाला २२ ऑक्टोबरला त्याच्या पृथ्वीभोवतीच्या पहिल्या लंबवर्तुळाकार कक्षेत नेऊन सोडले. या कक्षेला इलिप्टिकल ट्रांसफर ऑर्बिट (इ.टी.ओ.) असे म्हणतात.
या कक्षेचा उपनाभी बिंदू (Perigee) पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास २५० कि.मी. तर अपनाभी बिंदू (Apogee) जवळपास २२,००० कि.मी. इतका आहे. यानंतर पाच टप्प्यांमध्ये चंद्रयानाची कक्षा वाढविण्यात आली व त्याला चंद्राभोवतीच्या कक्षेत ठेवण्यात आले.
मून इम्पॅक्ट प्रोबची चंद्राशी धडकमून इंपॅक्ट प्रोब (एम.आय.पी.) १४ नोव्हेंबर २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील शॅकलटन क्रेटरजवळ आदळला.
 
एम.आय.पी. हा यानावरील एकूण आकरा भारांपैकी एक होता.या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.
एम.आय.पी. चंद्रयानापासून रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यशस्वीरीत्या वेगळा झाला. या जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासात एम.आय.पी.ने चंद्राची अनेक छायाचित्रे काढून यानाला पाठविली, जी यानाने नंतर पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाला पाठविली.
या प्रोबवरील अल्टिमिटर, चलचित्र कॅमेरा व मास स्पेक्ट्रोमीटर यांनी पाठविलेली माहिती नियोजित चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान यानाला अलगद चंद्रावर उतरविण्यासाठी वापरण्यात येईल. चंद्राजवळ पोहोचल्यानंतर एम.आय.पी.वरील रॉकेट चालवून त्याच्या चंद्रावर आदळण्याचा वेग कमी करण्यात आला.