हा ब्रिटन (UK) मध्ये दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे. ‘मॅन ग्रुप’ या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार इंग्रजी भाषेत प्रकाशित होणार्‍या साहित्यासाठी तसेच किंवा सामान्यत: इंग्रजी भाषेत भाषांतरित केल्या गेलेल्या साहित्यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या जिवंत लेखकाला दिला जातो.


मॅन बुकर पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर जून 2004 मध्ये या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 2005 साली पहिला पुरस्कार दिला गेला. पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार असून तो लेखक व भाषांतरकार यांच्यात समानरूपाने वाटला जातो.

२००५ पासून २०१५ पर्यंत हा पुरस्कार दोन वर्षातून एकदा दिला जात असे. परंतु २०१६ पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

२०१९ पर्यंत पुरस्काराचे नाव ‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज’ असे होते. मात्र २०१९ पासून याचे नाव ‘इंटरनॅशनल बुकर प्राईज’ हे आहे.

‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज’ हे केवळ राष्ट्रकुल सदस्य देश, झिम्बाब्वे व आयरलँड देशातील नागरिकांसाठी होते. तर ‘इंटरनॅशनल बुकर प्राईज’ हे सर्वच देशातील नागरिकांसाठी आहे.

विजेते
२००५ – इस्माईल कादरे (अल्बानिया)
२००७ – चिनुआ अचेबे (नायजेरिया)
२००९ – एलिस मुनरो (कॅनडा)
२०११ – फिलिप रॉथ (अमेरिकन)
२०१३ – लिडिया डेव्हिस (अमेरिकन)
२०१५ – लासझलो क्रासझनाहोरकाई (हंगेरी)

२०१६ पासून पुरस्काराचे स्वरूप बदलले. लेखकाऐवजी पुरस्कार पुस्तकाला देण्यात येऊ लागला. लेखकसोबतच त्याच्या इंग्रजी भाषांतरकाराला देखील पुरस्कार देण्यात येउ लागला. 

वर्ष : पुस्तक : लेखक (देश) : भाषांतरकार
२०१६ : द व्हेजटेरियन : हान कांग (दक्षिण कोरिया) : डेबोरा स्मिथ
२०१७ : अ हॉर्स वॉक इनटू बार : डेव्हिड ग्रॉसमन (इस्राईल) : जेसिका कोहेन
२०१८ : फ्लाईट्स : ओल्गा टोकरझुक (पोलंड) : जेनिफर क्रॉफ्ट
२०१९ :