UNESCO (युनेस्को)

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.

स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.
या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह १९३ देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि११सहकारी सदस्य आहेत. जगभर ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत.
१९२० साली स्थापन झालेल्या  League of Nations’ International Committee on Intellectual Cooperation या संस्थेची UNESCO उत्तराधिकारी आहे.

युनेस्को चे ध्येय ‘शांतता प्रस्थापित करण्यात योगदान देणे, दारिद्र्य निर्मूलन, शाश्वत विकास, शिक्षणाच्या माध्यमातून आंतरसांस्कृतिक संवाद आहे.