जागतिक वारसा स्थळ ( World Heritage Sites)

जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) असते.

जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे. एकदा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान दिले जाते.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

जुलै २०१९मध्ये, जगभरातील १६७ देशांमध्ये एकूण ११२१ जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात असून त्यांपैकी २१३ नैसर्गिक स्थळे, ८६९ सांस्कृतिक स्थळे व ३९ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत.
ही स्थाने खालील ५ भौगोलिक गटांमध्ये विभागली गेली आहेतः आफ्रिका, अरब देश, आशिया, ओशनिया, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका व कॅरिबियन बेटे.
चीन (५५) व इटलीमध्ये (५५) सर्वाधिक, स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रांस (४५) भारतामध्ये (३८) तर मेक्सिकोमध्ये (३५) जागतिक वारसा स्थाने आहेत.
आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

महाराष्ट्रात ५ जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यात ५ सांस्कृतिक वारसा स्थळे व १ नैसर्गिक स्थळाचा समावेश आहे.

भारतातील जागतिक वारसा स्थळे

सांस्कृतिक

.आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

 • अजिंठा लेणी, महाराष्ट्र
 • नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार
 • बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)
 • चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
 • छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
 • गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट
 • एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
 • एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र
 • फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश
 • चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू
 • हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
 • महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
 • पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
 • राजस्थानामधील पर्वतीय किल्ले
 • अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर
 • जयपूर एक ऐतिहासिक शहर
 • हुमायूनची कबर, दिल्ली
 • खजुराहो, मध्यप्रदेश
 • महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
 • भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
 • कुतुब मिनार, दिल्ली
 • राणी की वाव, पटना, गुजरात
 • लाल किल्ला, दिल्ली
 • दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश
 • कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
 • ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश
 • ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड
 • जंतर मंतर, जयपूर
 • मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत

नैसर्गिक

.ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

 • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
 • मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
 • केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
 • सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
 • नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
 • पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

मिश्र

.खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम