आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.

सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.

प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे आयोजित केल्या जाणार्‍या समारंभात आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टता मिळविणार्‍या आशियाई व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार उदयोन्मुख नेतृत्व (2001 सालापासून) आणि वर्गीकृत नसलेले (2009 सालापासून) या दोन श्रेणीमध्ये दिला जातो.

रॅमन मॅगसेसे

रॅमन डेल फिएर्रो मॅगसेसे एक फिलिपिनो राजकारणी होते.

ते फिलिपाइन्सचे सातवे अध्यक्ष होते.

30 डिसेंबर 1953ला विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

कम्युनिस्ट हुकबालाहाप (हुक) चळवळीचा पराजय केल्याबद्दल ते ओळखले जातात.

रॅमन मॅगसेसे यांचा जन्म एका कामगाराच्या घरी झाला होता. ते लुझॉन बेटावरील इबा प्रांतात एका शाळेत शिक्षक होते. फिलिपाइन्समधील बहुतेक राजकीय नेते स्पॅनिश वंशाचे होते. मात्र मॅगसेसे सामान्य फिलिपिनो नागरिकांप्रमाणे मलाय वंशाचे होते.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते लुझॉनमध्ये गोरिलाप्रमुख (युद्धामध्ये सहभागी होणाऱ्या गटाचा प्रमुख) म्हणून सहभागी झाले होते. अमेरिकेने फिलिपाइन्स पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर त्यांची त्यांच्या ‘झंबालेज’ प्रांताच्या ‘मिलिट्री गव्हर्नर’पदी नेमणूक करण्यात आली.

परराष्ट्र धोरणांबाबत बोलायचं झालं तर मॅगसेसे हे अमेरिकेचे जवळचे मित्र आणि समर्थक होते. शीतयुद्धाच्या काळामध्ये त्यांनी कम्युनिझमचा उघडपणे विरोध केला होता.

8 सप्टेंबर 1954 रोजी मनिलामध्ये ‘साऊथ-ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन’ची स्थापना झाली. त्यांनी फिलिपाइन्सला या समूहाचं सदस्य केलं होतं. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच मॅगसेसे यांचा विमान अपघातात मृत्यू झाला

पुरस्कार मिळालेले भारतीय

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे आचार्य विनोबा भावे हे पहिले भारतीय होते. 1958 मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर मदर तेरेसा (1962), जयप्रकाश नारायण (1965), सत्यजीत रे (1967), चंदी प्रसाद भट्ट (1982), अरुण शौरी (1982), किरण बेदी (1994), अरविंद केजरीवाल (2006), पी साईनाथ (2007) यांचाही प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव केला आहे.

उदयोन्मुख नेतृत्व

१९९६ : पांडुरंग शास्त्री आठवले

२००२ : संदीप पांडे

२००६ : अरविंद केजरीवाल

२०११ : नीलिमा मिश्रा

२०१५ : संजीव चतुर्वेदी

२०१६ : टी.एम. कृष्णा

शासकीय सेवा

१९९४ : किरण बेदी

१९९६ : टी.एन. शेषन

२००३ : जेम्स मायकल लिंगडोह

लोकसेवा

१९६५ : जयप्रकाश नारायण

१९७४ : एम.एस.सुब्बालक्ष्मी

१९८२ : मणिभाई देसाई

१९८५ : बाबा आमटे

१९८९ : लक्ष्मी चंद जैन

१९९३ : बानू जहांगीर कोयाजी

२००५ : व्ही. शांता

सामाजिक नेतृत्व

१९५८ : विनोबा भावे

१९६३ : वर्गीज कुरियन

१९६३ : दारा नासरवानजी खुरोडी

१९६३ : त्रिभुवनदास किशाभाई पटेल

१९६६ : कमलादेवी चट्टोपाध्याय

१९७१ : एम.एस.स्वामीनाथन

१९७७ : इला भट

१९७९ : माबेल आरोळे

१९७९ : रजनीकांत आरोळे

१९८१ : प्रमोद कारण सेठी

१९८२ : चंडी प्रसाद भट

२००० : अरुणा रॉय

२००१ : राजेंद्र सिंग

२००३ : शांता सिन्हा

२००८ : प्रकाश आमटे

२००८ : मंदाकिनी आमटे

२०१६ : बेजवाडा विल्सन

पत्रकारिता व साहित्य

१९६१ : अमिताभ चौधरी

१९६७ : सत्यजित रे

१९७५ : बुबली जॉर्ज वर्गीज

१९७६ : सोम्भू मित्रा

१९८१ : गौर किशोर घोष

१९८२ : अरुण शौरी

१९८४ : आर.के.लक्ष्मण

१९९१ : के.व्ही.सुबण्णा

१९९२ : रवी शंकर

१९९७ : महाश्वेता देवी

२००७ : पलागुम्मी साईनाथ

२०१९ : रवीश कुमार

शांती पुरस्कार

१९६२ : मदर तेरेसा

१९६४ : वेलथी फिशर

१९७६ : हेनिंग होल्क लार्सन

२००० : जॉकीन अर्पुथम

२००४ : लक्ष्मीनारायण रामदास

,

२००९ : दीप जोशी

२०११ : हरीश हांडे

२०१२ : कुळांदेई फ्रान्सिस

२०१५ : आशु गुप्ता

२०१८ : सोनम वांगचुक

२०१८ : भारत वटवानी