अर्थ मंत्रालयाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर १९७६ मध्ये कम्प्ट्रोलर जनरल ऑफ अकाउंटस् यांच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली.

कार्य:-
१. केंद्र सरकारच्या हिशोबाचे विविध भागांमध्ये विभागीकरण करणे

२. केंद्र सरकारच्या हिशोबावर नियंत्रण ठेवणे

३. विविध मंत्रालयांना, समित्यांना तसेच अन्य शासकीय संस्थांना सल्ले देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्यही या कार्यालयामार्फत केले जाते.

कामकाजाच्या बाबी –

१. केंद्र शासनाच्या व रज्य शासनाच्या हिशोबांची नोंद ठेवण्यासाठी नमुने विहित करणे.

२. हिशोबांची पध्दती विहित करुन देणे.

३. केंद्रीय लेखाधिका-यांकडून योग्य प्रकारे हिशोबांचे कामकाज चालते किंवा नाही यावर देखरेख ठेवणे.

४. भारतीय संविधानाच्या कलम २८३ अन्वये भारताच्या एकत्रित व संचित निधीतील तसेच अकस्मात खर्च निधीतीत जमा खर्चावर नियंत्रण ठेवणे.

५. केंद्र शासनाच्या हिशोबाच्या संदर्भात नियम वा नियमावली विहित करणे, अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा घडवून आणणे

६. मध्यवर्ती सरकारचे हिशोब विषयक मासिक व वार्षिक अहवाल, तसेच संक्षिप्त वृत्तांत तयार करणे

कम्प्ट्रोलर जनरल ऑफ अकाउंटस् यांनी ठेवलेले हिशोब व त्यांचा अहवालाची कम्प्ट्रोलर ऍड ऑडिटर जनरल (भारताचे सरहिशोब तपासणीस) यांच्याकडून तपासणी (Audit) केली जाते व हे अहवाल आणि संबंधित लेखे सरहिशोब तपासणीसांच्या तपासणी अहावालासह संसदेच्या दोन्ही गृहांपुढे मांडण्यात येतात.