MPSC Current

चालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२०

भारतमाला प्रकल्प

‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.

हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.

सुमारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची यात तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे. तसेच, 100 जिल्हा मुख्यालयांचाही यात समावेश आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहे.

देशातली शहरे जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लक्ष 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी भारत-भुटान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जात आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP)

जानेवारी 2019 मध्ये वायु प्रदूषणाविरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) याची घोषणा केली होती.

भारतातली हवेची गुणवत्ता 2024 सालापर्यंत 20 ते 30 टक्क्यांनी अधिक स्वच्छ करण्याचे लक्ष ठेवले गेले आहे.

सन 2017 ते सन 2024 या कालावधीत कमीतकमी 102 शहरांमधल्या पार्टीकुलेट मॅटर (PM) या प्रदूषकाचे प्रदूषण 20 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमाची अंमलबजावणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) करीत आहे.

एका अभ्यासानुसर, भारतातल्या लोकांचे आयुर्मान खराब हवेच्या गुणवत्तेमुळे तब्बल 5 वर्षांनी कमी होत आहे.

“रूद्रम”: स्वदेशी बनावटीचे अँटी-रेडिएशन (विकिरण-रोधी) क्षेपणास्त्र

9 ऑक्‍टोबर 2020 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्यावतीने (DRDO) विकसित करण्यात आलेल्या ‘रूद्रम’ नामक स्वदेशी बनावटीच्या अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली.

ओडिशाच्या व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. सुखोई लढाऊ विमानातून रूद्रम क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.

भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेले ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले विकिरण-रोधी क्षेपणास्त्र आहे.

अंतिम हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रामध्ये पॅसिव होमिंग हेडसह INS-GPS नॅव्हिगेशनची सुविधा आहे. त्यामुळे रूद्रमच्या मदतीने अधिक दूरवरचे लक्ष्य अचूक टिपणे शक्य होणार आहे. पॅसिव्ह होमिंग हेड प्रोग्रॅममुळे व्यापक फ्रिक्वेन्सी बँडच्या मदतीने वर्गीकरण करून लक्ष्य निर्धारित करणे शक्य झाले आहे.

क्षेपणास्त्राच्या मदतीने शत्रू सैन्याची रडार यंत्रणा, संपर्क स्थाने आणि इतर RF (रेडियो फ्रिक्वेन्सी) उत्सर्जित करणाऱ्या दूरसंचार घटकांना लक्ष्य करून या गोष्टी उद्ध्वस्त करता येतात.

जागतिक मानसिक आरोग्य दिन: 10 ऑक्टोबर

दरवर्षी 10 ऑक्टोबर ही तारीख ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी “मेंटल हेल्थ फॉर ऑल: ग्रेटर इन्व्हेस्टमेंट – ग्रेटर अ‍ॅक्सेस” या विषयाखाली जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळला गेला.

या दिनानिमित्त, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी “मानसिक आरोग्य: कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” याविषयी एका आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि मेलबर्न विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) यांनी आयोजित केला होता. ऑस्ट्रेलिया-इंडिया इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. क्रेग जेफ्री हे परिषदेचे सहअध्यक्ष होते.

साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020

साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता – संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (World Food Programme)

साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता – लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)

जागतिक उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्यान्न सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ही सर्वात मोठी संघटना आहे.

ती एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 01 जानेवारी 1961 रोजी झाली. रोम (इटली) या शहरात त्याचे मुख्यालय आहे.

युद्ध-संघर्षग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने मोलाची कामगिरी बजावली आहे.

जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने 2019 साली 88 देशांतल्या जवळपास 100 दशलक्ष लोकांना मदत केली आहे.

भारतीय हवाई दल दिन: 8 ऑक्टोबर

8 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने गाझियाबादमधील हिंडन हवाई तळावर हवाई दलाचे शक्तीप्रदर्शन दाखविण्यात आले. कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग होता. त्यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश होता.

वन्यजीव सप्ताह: 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर

देशभरात दरवर्षी ‘वन्यजीव सप्ताह’ 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या आठवड्यात साजरा केला जातो. 2020 हे या सप्ताहाचे 66 वे वर्ष आहे. यंदा या सप्ताहाचे संकल्पसूत्र ‘सस्टेनिंग ऑल लाइफ ऑन अर्थ’ हे आहे.

वन्यजीवांच्या परस्परसंबंधांविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी माहिती देण्याच्या हेतूने जनजागृती करण्यासाठी 1954 सालापासून दरवर्षी भारत सरकारच्या राष्ट्रीय वन्यजीव विभागातर्फे ‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ साजरा करण्यात येतो.

भारतीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात जनजागृतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

रोजर पेनरोज, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज: भौतिकशास्त्रासाठी 2020 नोबेल पुरस्काराचे विजेते

भौतिकशास्त्रासाठी ‘2020 नोबेल’ पुरस्काराची घोषणा झाली; यावर्षी रोजर पेनरोज (ब्रिटिश), रीनहार्ड गेंजेल (जर्मनी) आणि एंड्रिया गेज (अमेरिका) यांना नोबेल दिला जाणार आहे.

रोजर पेनरोज यांना अल्बर्ट आइंस्टीन यांच्या ‘सापेक्षतेचा सिद्धांत’ याबाबतची माहिती मिळवण्यासाठी गणिती पद्धत तयार केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. तर, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज यांना एकत्रितपणे कृष्णविवर आणि आकाशगंगा याचे रहस्य उलगडण्यासाठी पुरस्कार दिला जात आहे.

12 वी BRICS शिखर परिषद

17 नोव्हेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने 12 वी BRICS शिखर परिषद आयोजित करण्याचे नियोजित आहे.

कार्यक्रमात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रतिनिधी परस्पर सहकार्यावर चर्चा करणार.

कार्यक्रमाचा विषय – “जागतिक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि नाविन्यपूर्ण वाढ यासाठी BRICS भागीदारी”.

परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे आहे.

शैक्षणिक साहित्याचे सांकेतिक भाषेत रुपांतर करण्यासाठी ISLRTC आणि NCERT यांच्यात करार

कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने भारतीय सांकेतिक भाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (ISLRTC) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) या संस्थांनी शैक्षणिक साहित्याचे डिजिटल स्वरूपात भारतीय सांकेतिक भाषेत रुपांतर करण्याच्या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

सामंजस्य कराराच्या अंतर्गत, NCERT याची क्रमिक पुस्तके, शिक्षकांसाठीचे हँडबूक आणि इतर पूरक साहित्य तसेच इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे इंग्रजी आणि हिंदी भाषेतल्या साहित्याचे भारतीय सांकेतिक भाषेत डिजीटल रुपांतरण करण्यात येणार आहे.

विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकांचे मार्गदर्शक, पालक आणि एकूणच कर्णबधीर समुदायाला याचा लाभ होऊन देशातल्या कर्णबधीर मुलांच्या शिक्षणावर याचा मोठा प्रभाव पडणार आहे.

‘नवीन शैक्षणिक धोरण (NEP), 2020’ यामध्ये भारतीय सांकेतिक भाषा अत्यावश्यक केली आहे, त्यानुसार शैक्षणिक साहित्याचे प्रमाणीकरण सुनिश्चित केले जाणार.

जागतिक प्राकृतिकवास दिन: 5 ऑक्टोबर 2020

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार या दिवशी ‘जागतिक प्राकृतिकवास दिन’ साजरा करतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात यंदा म्हणजेच 5 ऑक्टोबर 2020 रोजी प्राकृतिकवास (निवासस्थान/ अधिवास/ वसतिस्थान) दिन साजरा करण्यात आला.

यावर्षी हा दिवस “हाऊसिंग फॉर ऑल – ए बेटर अर्बन फ्युचर” या संकल्पनेखाली पाळला गेला.

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि उद्योगांमुळे पशुपक्ष्यांच्याच नाही तर खुद्द मानवाच्याही छताची आवश्यकता या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या अधिकारांची आणि मानवाला जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

‘स्मार्ट’ (सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपेडो) याची चाचणी यशस्वी

‘स्मार्ट / SMART’ (सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपेडो) याची 5 ऑक्टोबर 2020 रोजी ओडिशा किनारपट्टीलगतच्या व्हीलर बेटावरून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. क्षेपणास्त्रातून टॉरपेडो (जलतीर) सोडणे तसेच त्याचा वेग कमी करण्याचे तंत्रज्ञान (VRM) या सर्व चाचण्यांची निश्चित केलेली उद्दिष्टे या क्षेपणास्त्राने यशस्वी केली आहेत.

पाणबुड्ष्या नष्ट करण्यासाठी आवश्‍यक असणारी युद्धक्षमता निर्माण करण्यासाठी या जलतीराचे काम महत्वाचे मानले जाते.

Scroll to Top