पद्म पुरस्कार २०१७

पद्म पुरस्कार २०१७

पद्म पुरस्कार ‘भारतरत्न’ नंतर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कारांची सुरुवात १९५४ सालापासून करण्यात आली. पण १९७८ ते १९७९ आणि १९९३ ते १९९६ या कालखंडात यामध्ये खंड पडला. या सहा वर्षात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत. 


पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीत पद्म पुरस्कार विभागलेला आहे. पद्म पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, वैद्यकीय सेवा, साहित्य व शिक्षण, नागरी सेवा, क्रीडा या प्रमुख ९ व इतर काही क्षेत्रातून निवडक लोकांना प्रदान केले जातात.


प्रत्येक राज्यातील सरकार, केंद्रीय मंत्री, पूर्वी भारतरत्न व पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती, राज्यांचे मुख्यमत्री व राज्यपाल इत्यादी व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी समितीकडे कोणत्याही व्यक्तीची शिफारस करू शकतात. पद्म पुरस्कार समिती दरवर्षी पंतप्रधानाकडून ठरविली जाते. यंदा मात्र सामान्य नागरिकालाही ऑनलाईन पद्धतीने शिफारस करण्याचा अधिकार देण्यात आला होता.


प्रत्येक वर्षी १ मे ते १५ सप्टेंबर दरम्यान या शिफारसी स्वीकारल्या जातात. ‘पद्मपुरस्कार समिती’ नंतर या नावातून काही जणांची शिफारस पंतप्रधान व राष्ट्रपतींकडे करते. एका वर्षात पद्म पुरस्कार प्रदान केल्या जाणाऱ्या व्यक्तींची संख्या १२० पेक्षा जास्त असू नये. (विदेशी नागरिक व मरणोत्तर पुरस्कार वगळता).


प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात. दरवर्षी नंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात एक सोहळ्यात हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात.

राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीचा पुरस्कार रद्द करू शकतात किंवा परत काढून घेऊ शकतात.

प्रत्येक विजेत्याला एक पदकाची प्रतिकृती दिली जाते. विजेते ती प्रतिकृती कोणत्याही समारोहात किंवा शासकीय समारंभात परिधान करू शकतात. पण या पुरस्काराचा वापर विजेत्याला कोठेही म्हणजेच लेटरहेड, इन्विटेशन कार्ड, पोस्टर पुस्तके यावर करता येत नाही. पदकाचा कोणत्याही पद्धतीने गैरवापर केल्यास पुरस्कार जप्त करण्यात येऊ शकतो.

२०१७ साली एकूण ८९ व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी ७ व्यक्तीना पद्म विभूषण, ७ व्यक्तींना पद्मभूषण तर ७५ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला आहेत.

यंदा ६ व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. ०२ व्यक्तीला पद्मविभूषण, ०१ व्यक्तीला पद्मभूषण आणि ०३ व्यक्तींना पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले.

यंदा ५ विदेशी व अनिवासी भारतीय व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला. ०१ विदेशी व्यक्तीला पद्मभूषण, ०१ परदेशी व ०३ अनिवासी भारतीय व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 

२०१६ साली एकूण ११२ व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले होते. त्यापैकी १० व्यक्तीना पद्म विभूषण, १९ व्यक्तींना पद्मभूषण तर ८३ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यावेळी पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला आहेत.

एकूण ८९ ‘पद्म’ मानकऱ्यांमध्ये आठ महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रत्येकी एक पद्मविभूषण व पद्मभूषण तर पाच पद्मश्री आहेत. 

शरद पवार व डॉ. उदवाडिया यांच्याखेरीज कैलाश खेर (गायन), अनुराधा पौडवाल (गायन), भावना सोमय्या (पत्रकारिता), शेफ संजीव कपूर (पाककला), निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा) आणि डॉ. मापुसकर (समाजसेवा, मरणोत्तर) हे राज्यातील ‘पद्मश्री’चे मानकरी आहेत. 

मूळ महाराष्ट्रीय, पण अन्य राज्यांत काम करणाऱ्या डॉ. मदन माधव गोडबोले (उत्तर प्रदेश, वैद्यकीय सेवा) व कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता रघुनाथ भिडे (तमिळनाडू, समाजसेवा) यांनाही ‘पद्मश्री’ जाहीर झाले.



पद्मविभूषण

नाव क्षेत्र  राज्य
श्री. के जे येसूदास कला (संगीत) केरळ
श्री सद्गुरू जग्गी वासूदेव इतर (अध्यात्म) तामिळनाडू
श्री शरद पवार लोकसेवा  महाराष्ट्र
श्री मुरली मनोहर जोशी  लोकसेवा  उत्तर प्रदेश
प्रा उडुपी रामचंद्र राव  विज्ञान आणि तंत्रज्ञान  कर्नाटक
श्री सुंदरलाल पटवा (मरणोत्तर) लोकसेवा  मध्यप्रदेश
श्री पी ए संगमा (मरणोत्तर) लोकसेवा  मेघालय






पद्मभूषण

नाव क्षेत्र राज्य
श्री विश्व मोहन भट  कला (संगीत) राजस्थान
प्रा. डॉ. देवीप्रसाद द्विवेदी  साहित्य व शिक्षण  उत्तर प्रदेश
श्री तेहेमतों उडवडिया  वैद्यकीय महाराष्ट्र
श्री रत्न सुंदर महाराज इतर (अध्यात्म)  गुजरात
स्वामी निरंजन नंदा सरस्वती इतर (योगा) बिहार
राजकुमारी महाचक्री सिरिंधोरण (विदेशी साहित्य व शिक्षण थायलंड
श्री चो रामास्वामी (मरणोत्तर) साहित्य व शिक्षण (पत्रकारिता)  तामिळनाडू



पद्मश्री

नाव  क्षेत्र राज्य
श्रीमती बसंती बिश्त  कला (संगीत) उत्तराखंड
श्री चेमनचारी कुन्हीरामन नायर  कला (नृत्य) केरळ
श्रीमती अरुणा मोहंती कला (संगीत) ओडिशा
श्रीमती भारती विष्णूवर्धन कला (चित्रपट)  कर्नाटक
श्री साधू मेहेर  कला (चित्रपट) ओडिशा
श्री टी के मूर्ती कला (संगीत) तामिळनाडू
श्री लैश्राम बिरेंद्रकुमार सिंग कला (संगीत) मणिपूर
श्री कृष्णराम चौधरी  कला (संगीत) उत्तर प्रदेश 
श्रीमती बाओवा देवी  कला (चित्रकारिता)  बिहार
श्री तिलक गीताई कला (चित्रकारिता) राजस्थान
डॉ. प्रा. अएक्का याडगिरी राव कला (शिल्पकला) तेलंगणा
श्री जितेंद्र हरिपाल कला (संगीत) ओडिशा
श्री कैलास खेर कला (संगीत) महाराष्ट्र
श्रीमती प्रसल्ला बी पोनामल कला (संगीत) केरळ
श्रीमती सुकरी बोम्मागौडा कला (संगीत) कर्नाटक
श्री मुकुंद नायक कला (संगीत) झारखंड
श्री पुरुषोत्तम उपाध्याय कला (संगीत) गुजरात
श्रीमती अनुराधा पौडवाल कला (संगीत) महाराष्ट्र
श्री वारेप्पा नबा निल कला (नाट्यक्षेत्र) मणिपूर
श्री त्रिपुरानेणि हनुमान चौधरी नागरी सेवा तेलंगणा
श्री टी के विश्वनाथन नागरी सेवा हरियाणा
श्री कनवल सिब्बल  नागरी सेवा दिल्ली
श्री बिरखा बहादूर लिंबू मुरिन्गला  साहित्य व शिक्षण सिक्कीम 
श्रीमती एली अहमद  साहित्य व शिक्षण आसाम
डॉ नरेंद्र कोहली  साहित्य व शिक्षण दिल्ली
प्रा जी वेंकट सुबय्या  साहित्य व शिक्षण कर्नाटक
श्री अक्कीथम अच्युतम नंबुथिरी साहित्य व शिक्षण केरळ
श्री काशी नाथ पंडिता  साहित्य व शिक्षण जम्मू काश्मीर
श्री चामूं कृष्ण शास्त्री  साहित्य व शिक्षण दिल्ली
श्री हरिहर कृपालू त्रिपाठी साहित्य व शिक्षण उत्तर प्रदेश
श्री मायकेल डॅनींनो  साहित्य व शिक्षण तामिळनाडू
श्री पुर्णम सूरी  साहित्य व शिक्षण दिल्ली
श्री व्ही जी पटेल  साहित्य व शिक्षण गुजरात
श्री व्ही कोटेश्वरम्मा  साहित्य व शिक्षण आंध्र प्रदेश
श्री बलबीर दत्त  साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) झारखंड
श्रीमती भावना सोमय्या  साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) महाराष्ट्र
श्री विष्णू पंड्या  साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) गुजरात
डॉ सुब्रतो दास  वैद्यकीय  गुजरात
डॉ श्रीमती भक्ती यादव  वैद्यकीय  मध्य प्रदेश
डॉ मोहम्मद अब्दुल वाहिद  वैद्यकीय  तेलंगणा
डॉ मदन माधव गोडबोले  वैद्यकीय  उत्तर प्रदेश
डॉ देवेंद्र दयाभाई पटेल  वैद्यकीय  गुजरात
प्रा हरिकिशन सिंग  वैद्यकीय  चंदीगड
डॉ मुकुट मिन्झ  वैद्यकीय  चंदीगड
श्री अरुण कुमार शर्मा इतर (पुरातत्व शास्त्र) छत्तीसगड
श्री संजीव कपूर इतर (स्वयंपाक शास्त्र) महाराष्ट्र
श्रीमती मीनाक्षी अम्मा इतर (मार्शल आर्ट) केरळ
श्री गेनाभाई दर्गाभाई पटेल  इतर (कृषी) गुजरात
श्री चंद्रकांत पाठवा  विज्ञान आणि तंत्रज्ञान तेलंगणा
प्रा अजयकुमार रे  विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल
श्री चिंतकांडी मल्लेशम  विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश
श्री जितेंद्र नाथ गोस्वामी  विज्ञान आणि तंत्रज्ञान आसाम
श्री दरीपल्ली रामय्या  सामाजिक सेवा तेलंगणा
श्री गिरीश भारद्वाज  सामाजिक सेवा कर्नाटक
श्री करीमुल हक  सामाजिक सेवा पश्चिम बंगाल
श्री बिपीन गणात्रा  सामाजिक सेवा पश्चिम बंगाल
श्रीमती निवेदिता रघुनाथ भिडे सामाजिक सेवा तामिळनाडू
श्री अप्पासाहेब धर्माधिकारी सामाजिक सेवा महाराष्ट्र
बाबा बलबीर सिंग सिचवाल  सामाजिक सेवा पंजाब
श्री विराट कोहली  क्रीडा (क्रिकेट) दिल्ली
श्री शेकर नाईक  क्रीडा (क्रिकेट) कर्नाटक
श्री विकास गौडा  क्रीडा (थाळीफेक) कर्नाटक
श्रीमती दीपा मलिक  क्रीडा (अॅथलेटिक्स) हरियाणा
श्री मॅरियप्पान थंगावेलु  क्रीडा (अॅथलेटिक्स) तामिळनाडू
श्रीमती दीपा कर्माकर  क्रीडा (जिम्नॅस्ट) त्रिपुरा
श्री पी आर श्रीजीश क्रीडा (हॉकी) केरळ 
श्रीमती साक्षी मलिक  क्रीडा (कुस्ती) हरियाणा
श्री मोहन रेड्डी वेंकटराम बोदानापू उद्योग व व्यापार  तेलंगणा
श्री ईम्रात खान (अनिवासी भारतीय कला (संगीत) अमेरिका
श्री अनंत अगरवाल (अनिवासी भारतीय) साहित्य व शिक्षण अमेरिका
श्री एच आर शाह (अनिवासी भारतीय) साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) अमेरिका
श्री श्रीमती सुनीती सोलमोन (मरणोत्तर) वैद्यकीय  तामिळनाडू
श्री अशोक कुमार (मरणोत्तर) इतर (पुरातत्त्वशास्त्र) पश्चिम बंगाल
डॉ मापुस्कर (मरणोत्तर) सामाजिक सेवा महाराष्ट्र 
श्रीमती अनुराधा कोईराला (विदेशी सामाजिक सेवा नेपाळ
Scroll to Top