भारताच्या सीमा

भारताच्या सीमा

भारताच्या सीमा

भारताच्या सीमा एकूण ७ देशांना लागून आहेत.

 

भारताच्या २९ राज्यपैकी १७ राज्य हे दुसऱ्या  देशांच्या सीमांना लागून आहेत.

सीमांचे भूसीमा व जलसीमा असे दोन प्रकार आहेत.

भूसीमा

भारताच्या भूसीमेची एकूण लांबी १५२०० किमी आहे.

भारताच्या शेजारील राष्ट्रे व भूसीमा

देशसीमा लांबी (किमी)प्रमाण
बांग्लादेश४०९६२६.९५%
चीन३९१७२५.७७%
पाकिस्तान३३१०२१.७८%
नेपाळ१७५२१३.५३%
म्यानमार१४५८९.५९%
भूटान५८७३.८६%
अफगाणिस्तान८००.५२%

देशांचे सीमांची नावे

०१. भारत – अफगाणिस्तान
ड्यूरड रेषा (१८९२)

०२. भारत-पाकिस्तान 
रेड क्लिफ (१९४८)
२४th parallel line (१९६५)
एल.ओ.सी. (१९७१)

०३. भारत-चीन 
मेकमोहन रेषा

०४. भारत-नेपाळ 
तराई प्रदेश (१९२०)

०५. भारत – म्यानमार 
लुसाई पतकोर्ट टेकड्या
भूसीमा (१९६७)
जलसीमा (१९८७)

०६. भारत-श्रीलंका
मन्नारची सामुद्रधुनी
पालची सामुद्रधुनी.
पब्ब्मचे बेट.

अन्य देशाच्या सरहद्द जवळील असणारी राज्ये

भारत – पाकिस्तान
०१. गुजरात
०२. राजस्थान
०३. पंजाब
०४. जम्मू काश्मीर

भारत – चीन 
०१. जम्मू काश्मीर
०२. हिमाचल प्रदेश
०३. उत्तराखंड
०४. सिक्कीम
०५. आसाम
०६. अरुणाचल प्रदेश

भारत – नेपाळ
०१. उत्तराखंड
०२. उत्तरप्रदेश
०३. बिहार
०४. पश्चिम बंगाल
०५. सिक्कीम

भारत – बांग्लादेश
०१. पश्चिम बंगाल
०२. आसाम
०३. मेघालय
०४. त्रिपुरा
०५. मिझोराम

भारत – भूतान
०१. सिक्कीम
०२. पश्चिम बंगाल
०३. आसाम
०४. अरुणाचल प्रदेश

भारत – म्यानमार
०१. अरुणाचल प्रदेश
०२. नागालँड
०३. मणिपूर
०४. मिझोराम

भारत – अफगाणिस्तान
०१. जम्मू काश्मीर

भारतीय राज्यांच्या सरहदीजवळचे देश

जम्मू काश्मीर
०१. पश्चिमेस पाकिस्तान
०२. वायव्येस अफगाणिस्तान
०३. उत्तर पूर्वेस चीन

उत्तराखंड
०१. उत्तरेस चीन
०२. पूर्वेस नेपाळ

पश्चिम बंगाल
०१. उत्तरेस नेपाळ
०२. उत्तरेस भूतान
०३. पूर्वेस बांग्लादेश

सिक्किम
०१. पश्चिमेस नेपाळ
०२. उत्तरेस चीन
०३. आग्नेयेस भूतान

आसाम
०१. उत्तरेस भुतान
०२. दक्षिण व पश्चिमेस बांग्लादेश

अरुणाचल प्रदेश
०१. उत्तरेस चीन
०२. पूर्वेस म्यानमार
०३. पश्चिमेस भूतान

मेझोरम
०१. पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार
०२. पश्चिमेस बांगलादेश

गुजरात 
०१. पाकिस्तान उत्तरेस

राजस्थान
०१. पश्चिमेस पाक

पंजाब
०१. पश्चिम पाकिस्तान

हिमाचल 
०१. पूर्वेस चीन

उत्तर प्रदेश
०१. उत्तर नेपाळ

बिहार
०१. उत्तर नेपाळ

नागालँड
०१. पूर्वेस म्यानमार

मणिपूर
०१. पूर्वेस म्यानमार

त्रिपुरा
०१. उत्तर,दक्षिण, पश्चिम, बांगलादेश

मेघालय
०१. पश्चिम व दक्षिणेस बांग्लादेश

हरियाणा, दिल्ली,मध्यप्रदेश,छत्तीस गड व तेलंगाणा, झारखंड यांच्या सीमा अंतराष्ट्रीय भूसीमा तसेच सागरीकिनारा यांच्याशी संलग्न नाहीत.

जलसीमा

०१. भारताच्या मुख्य भूमीची सागरी सीमा – ६०६३ किमी

०२. भारताची सर्व बेटांसहित सागरी सीमा – ७५७६.६ किमी
*एखाद्या देशाची सागरी सीमा किनाऱ्यापासून २२.२२ किमी (१२ नॉटिक मैल ) पर्यंत असते. परंतु विशेष आर्थिक क्षेत्र ३७०.४ किमी (२०० नॉटिक मैल) पर्यंत असते.

०३. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळील भारताच्या सागरी सरहदीत न्युमुर बेट आहे ते भारत व बांगलादेश यांत वादग्रस्त आहे

०४. इंडोनेशिया व भारत यांच्यात १९७७ साली सागरी सीमा करार झाला.

०५. मालदीव व भारत यांच्यात २००९-१० साली सागरी सीमा करार झाला.

०६. भारत व बांगलादेश यांच्या १९७४ साली सागरी करार होऊन दासीआर चेहरा ही हा भाग सीमावर्ती ठरविण्यात आला.

Scroll to Top