MPSC Academy तर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर दिनांक ८ ऑक्टोबर २०१७ पासून  दर रविवारी साप्ताहिक सराव परीक्षासुरु करण्यात आली आहे. 


ही परीक्षा निःशुल्क आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा.


विद्यार्थी ही परीक्षा MPSC Academy च्या वेबसाईटवर तसेच अकॅडमीच्या ‘MPSC Online Exam’ या अँड्रॉइड एप्लिकेशन वर सोडवू शकतील.


जर विद्यार्थ्याकडे अँडॉईड मोबाईल असेल तर त्यांनी सर्वोत्तम अनुभवासाठी अँडॉईड ऍप्लिकेशनच वापरावे.


बहुतांश परीक्षा या PSI / STI / ASO संयुक्त पूर्व परीक्षेच्या धर्तीवर १०० गुणांच्या होतील. तर काही परीक्षा राज्यसेवेच्या धर्तीवर २०० गुणांच्या होतील.साप्ताहीक सराव परीक्षांचे नियम आयोगाच्या तत्सम परीक्षांच्या नियमासारखेच असतील. 


प्रत्येक साप्ताहिक परीक्षा एक आठवडा सोडविण्यासाठी उपलब्ध राहील. त्यानंतर ती काढून टाकली जाईल व दुसरी साप्ताहिक परीक्षा प्रकाशित करण्यात येईल.


दर रविवारी मागील आठवड्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी MPSC Academy वेबसाईटवर तसेच Facebook पेजवर प्रकाशित करण्यात येईल.


त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या सुरवातीच्या फॉर्मवर आपले नाव, ईमेल आयडी व शहराचे नाव व्यवस्थित नोंदवावे.


सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! धन्यवाद!


आपल्या काही शंका, प्रतिक्रिया असतील तर खालील फॉर्मचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचवाव्या.