भारताची मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड 2017’
जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड 2017’ चा मुकूट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला. 


17 वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे.

चीनमधील सान्या येथे मिस वर्ल्ड 2017 ही स्पर्धा रंगली.
जगभरातून आलेल्या 130 सौंदर्यवतींमध्ये रंगलेली कांटे की टक्कर, ग्लॅमर- फॅशनच्या दुनियेतील तारे आणि गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम अशा वातावरणात हा सोहळा पार पडला. 

अंतिम पाचमध्ये इंग्लंड, फ्रान्स, भारत, केनिया आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले.मनमोहन सिंग यांना यंदाचा इंदिरा गांधी शांती पुरस्कार
19 नोव्हेंबर 2017 रोजी इंदिरा गांधी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 2017 सालचा इंदिरा गांधी शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सन 2004 ते सन 2014 या काळात त्यांच्या नेतृत्वासाठी आणि देशाच्या शांती आणि विकास यासाठी दिलेल्या योगदानासाठी इंदिरा गांधी पुरस्कार दिला गेला.

पंतप्रधान म्हणून दुसरा कार्यकाळ पूर्ण करणारे मनमोहन सिंग हे देशाचे तिसरे असे पंतप्रधान आहेत. ते भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर देखील होते. पी. वी. नरसिंह राव यांच्या काळात ते देशाचे अर्थमंत्री होते.

इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टतर्फे इंदिरा गांधी शांती पुरस्कार दिला जात आहे. 1986 साली या पुरस्काराची स्थापना झाली. एक ट्रॉफी, रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.IFFI 2017 मध्ये कॅनेडियन चित्रपट निर्माता एटम ईगोयन यांना जीवनगौरव पुरस्कार मिळणार
गोव्यात आयोजित भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2017 मध्ये कॅनेडियन चित्रपट निर्माता एटम ईगोयन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

एटम ईगोयन हे “एक्झोटीका”, “द स्वीट हियरआफ्टर” आणि “च्लोए” या यांच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.

भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) ची सन 1952 मध्ये स्थापना करण्यात आली आणि हा कार्यक्रम गोवामध्ये आयोजित केला जातो. एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ‘कौमी एकता सप्ताह’
जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि मिश्र संस्कृती आणि राष्ट्रीय सद्भावना बाळगण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देशात 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2017 या काळात ‘कौमी एकता सप्ताह’ पाळल्या जाणार आहे.

सप्ताह दरम्यान आयोजित कार्यक्रमे :-

19 नोव्हेंबर 2017 – राष्ट्रीय एकता दिवस
20 नोव्हेंबर 2017 – अल्पसंख्यक कल्याण दिवस
21 नोव्हेंबर 2017 – भाषिक सलोखा दिवस
22 नोव्हेंबर 2017 – कमकुवत वर्ग दिवस
23 नोव्हेंबर 2017 – सांस्कृतिक एकता दिवस
24 नोव्हेंबर 2017 – महिला दिवस
25 नोव्हेंबर 2017 – संवर्धन दिवस

गृह मंत्रालयाची स्वायत्त संस्था – नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हॉरमोनी (NFCH) कडून ‘कौमी एकता सप्ताह’ चे आयोजन केले जाते, जी या काळात जातीय सलोखा मोहिमांचे आयोजन करते आणि 25 नोव्हेंबरला जातीय सलोखा ध्वज दिवस साजरा करते.


रॉबर्ट मुगाबेंना यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवले
झिम्बाब्वेतील सत्ताधारी पक्ष झेडएएनयू-पीएलने रॉबर्ट मुगाबे यांना पक्षाच्या नेतेपदावरून हटवले आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झेडएएनयू-पीएलने मुगाबे यांची पत्नीचे प्रतिस्पर्धी एमरसन म्नांगाग्वा यांना पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुगाबे यांनी 52 वर्षीय पत्नी ग्रेसचे प्रतिस्पर्धी राहिलेले उपराष्ट्राध्यक्ष एमरसन म्नांगाग्वा यांना बरखास्त केले होते. त्यामुळे लष्कराने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेऊन मुगाबेंना नजरकैदेत ठेवले होते. 

मुगाबे यांच्या पत्नीने देशाची सूत्रे आपल्या हाती यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांना यापूर्वीच पक्षाने निलंबित केले आहे. 
तसेच लष्कराने जेव्हा सत्तेवर नियंत्रण मिळवले तेव्हाच मुगाबे यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे दिसून आले होते. 

जगात सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे 93 वर्षीय राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांचा उत्तराधिकारी कोण याबाबत चर्चा सुरू झाली होती. नेमके त्याचवेळी लष्कराने ही कारवाई केली.जागतिक बालदिन – 20 नोव्हेंबर 
20 नोव्हेंबरला जगभरात ‘सार्वत्रिक बालदिन / जागतिक बालदिन / जागतिक बालहक्क दिन’ (Universal Children’s Day) साजरा केला जातो.यावर्षी हा दिवस “इट्स ए #किड्स टेकओव्हर” या संकल्पनेखाली साजरा केला जात आहे.

लहान बालकांमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच त्यांच्या अधिकारांची जाणीव पालकांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो.

20 नोव्हेंबर ही तारीख निवडण्यामागचे कारण म्हणजे, 1959 साली ह्याच तारखेस संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने बालहक्कांची सनद (Declaration of the Rights of the Child) स्वीकारली. शिवाय 1989 साली ह्याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर स्वाक्षर्‍या झाल्या.

सर्वांत पहिला बालदिन ऑक्टोबर 1953 मध्ये जिनेव्हाच्या ‘इंटरनॅशनल युनियन फॉर चाइल्ड वेल्फेअर’ या संघटनेच्या पुढाकाराने जगभर साजरा करण्यात आला. 

त्यानंतर व्ही. के. कृष्णमेनन ह्यांनी आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पनेला प्रोत्साहन देत सभेपूढे मांडली, जी 1954 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने स्वीकारली. त्यानुसार, 1954 साली 20 नोव्हेंबरला प्रथम जागतिक बालदिन साजरा झाला.

बालहक्कांमध्ये जगण्याचा अधिकार, ओळख, आहार, पोषण आणि आरोग्य, विकास, शिक्षण आणि मनोरंजन, नाव आणि राष्ट्रीयत्व, कुटुंब आणि कौटुंबिक वातावरण, दुर्लक्ष होण्यापासून सुरक्षा, शोषण, दुर्व्यवहार तसेच बालकांच्या बेकायदेशीर व्यापारापासून बचाव आदी बाबींचा समावेश होतो.

भारतात बालकांची देखरेख आणि सुरक्षा यासाठी मार्च 2007 मध्ये राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षेसाठी एक आयोग वा संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली. बालहक्कांबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी गैर-सरकारी संस्था, सरकारी विभाग, नागरी समाज, स्वयंसेवी संघटना आदी यांच्याद्वारा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.