नंदूरबार येथे विद्रोही साहित्य संमेलन 
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन येत्या २३ व २४ डिसेंबरला नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे होत आहे. 


१४ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी दलित आदिवासी, ग्रामीण साहित्यिक व कष्टकरी आदिवासी समाजाच्या नेत्या नजूबाई गावित यांची निवड केली आहे.



IFFI २०१७ चे ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटाने उद्घाटन होणार
२० नोव्हेंबर २०१७ रोजी गोव्यात आयोजित ४८ व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) चे उद्घाटन इराणी दिग्दर्शक माजीद माजीदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने केल्या जाणार आहे.

माजीद माजीदी यांचा ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री मालवीका मोहनन ही आहे.

भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) ची सन १९५२ मध्ये स्थापना करण्यात आली आणि हा कार्यक्रम गोवामध्ये आयोजित केला जातो. एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत


उर्जित पटेल यांची BIS च्या FSI सल्लागार मंडळामध्ये नेमणूक
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) च्या फायनॅनष्यल स्टॅबिलिटी इंस्टीट्यूट (FSI) सल्लागार मंडळामध्ये नेमणूक करण्यात आली आहे.

स्वित्झर्लंडमधील बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) ने १९९८ साली तयार केलेल्या फायनॅनष्यल स्टॅबिलिटी इंस्टीट्यूट (FSI) सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्याचे ठरविले आहे. 

सध्या नव्या FSI सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष पदावर BIS चे महाव्यवस्थापक जेमी करुआना हे असतील, मात्र ३० नोव्हेंबर २०१७ नंतर ही जबाबदारी ऑगस्टिन केस्टरन्स यांना देण्यात येणार आहे.

नव्या FSI सल्लागार मंडळामध्ये अन्य सदस्यांमध्ये विल्यम डुडले (फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कचे अध्यक्ष), तसेच ब्राझील, दक्षिण आफ्रिका, जपान आणि जगभरातील अन्य अग्रगण्य केंद्रीय बॅंकांचे गव्हर्नरांचा समावेश आहे.

१७ मे १९३० रोजी स्थापित बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) ही एक वैश्विक वित्तीय संघटना आहे, जी जगभरातील ६० मोठ्या केंद्रीय बँकांच्या मालकीची आहे. 

BIS चे फायनॅनष्यल स्टॅबिलिटी इंस्टीट्यूट (FSI) जगभरातील वित्तीय क्षेत्रातील अधिकार्‍यांना त्यांच्या वित्तीय प्रणालींना बळकट करण्यासाठी मदत करते. याचे मुख्यालय बेसेल, स्वित्झरलँड येथे आहे



मिजोरममध्ये भारत-बांग्लादेश सराव ‘संप्रिती २०१७’ संपन्न
१६ नोव्हेंबर २०१७ रोजी मिजोरममध्ये काऊंटर इनसर्जेंसी अँड जंगल वॉरफेयर स्कूल (वैरेंगटे) येथे आयोजित भारत-बांग्लादेश यांच्यातील ‘संप्रिती २०१७’ या संयुक्त प्रशिक्षण लष्करी सरावाची सांगता झाली.

भारत-बांग्लादेश यांच्या ‘संप्रिती’ श्रृंखलेमधील हा ६ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१७ दरम्यान आयोजित ७ वा सराव होता. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये परस्पर सहकार्याला बळकट करणे आणि त्या संबंधांचा विस्तार करणे हा या सरावा मागचा हेतू असतो



राष्ट्रीय प्रेस दिवस १६ नोव्हेंबर
भारतीय प्रेस परिषद (Press Council of India) कडून दरवर्षी १६ नोव्हेंबरला ‘राष्ट्रीय प्रेस दिवस’ साजरा करण्यात येतो.

प्रेस परिषदची स्थापना सन १९५६ मध्ये झाली, जे की देशातील पहिले प्रेस आयोग होते. त्यानंतर १६ नोव्हेंबर १९६६ रोजी भारतीय प्रेस परिषद (PCI) ची स्थापना करण्यात आली. पहिल्यांदा १६ नोव्हेंबर १९९७ पासून दोन दिवसीय सेमिनार भरवण्याची प्रथा तयार करण्यात आली

या निमित्ताने भारतीय प्रेस परिषदकडून आयोजित समारंभात उपरा‍ष्‍ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘पत्रकारीतेमधील उत्कृष्टतेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार’ चे वाटप करण्यात आले.

राजाराम मोहन राय पुरस्‍कार  प्रसिद्ध पत्रकार सेन राजप्‍पा आणि सरत मिश्रा यांना संयुक्‍त रूपाने देण्यात आला. तर 
ग्रामीण पत्रकारीता व विकासविषयक रिपोर्टिंगसाठी पुरस्‍कार शालिनी नायर (द इंडियन एक्‍सप्रेस) यांना प्रदान करण्यात आला.

तपास विषयक पत्रकारीतेसाठी पुरस्‍कार के. सुजीत (मंगलम दैनिक) आणि चित्रांगदा चौधरी (ओडिशा), छायाचित्र पत्रकारीतेसाठी पुरस्‍कार सी. के. थानसीर (चंद्रिका दैनिक) विजय वर्मा (PTI) आणि जे. सुरेश (मल्याळम मनोरमा) या तिघांना तर बेस्‍ट न्‍यूज पेपर आर्ट गिरिश कुमार (टाइम्‍स ऑफ इंडिया) यांना देण्यात आला.


जलक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी ‘INS सर्वेक्षक’ टांझानियाला पोहोचले
हिंद महासागर क्षेत्रातल्या परकीय नौदलांबरोबर द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित संयुक्त जल सर्वेक्षणासाठी भारताचे ‘INS सर्वेक्षक’ १५ नोव्हेंबर २०१७ रोजी टांझानियातील दार-ए-सलाम बंदरावर पोहचले आहे.

भारताच्या गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोग्राफी या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या टांझानियाच्या नौदल कर्मचाऱ्यांबरोबर संयुक्त जलक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.


‘INS सर्वेक्षक’ हे भारतीय नौदलाच्या दक्षिणी आदेशाखाली असलेले जलक्षेत्राचे सर्वेक्षण करणारे एक जहाज आहे. हे जहाज दर्शक श्रेणीमधील दूसरे जहाज आहे. कोचीमध्ये या जहाजाचे तळ आहे. 

या जहाजामध्ये जलक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे, जसे की डीप सी मल्टी बीम इको साऊंडर सिस्टम, साइड स्कॅन सोनार आणि स्वयंचलित सर्वे यंत्रणा बसविलेली आहेत. तसेच जहाजावर एक चेतक हेलिकॉप्टर सुद्धा तैनात आहे



झिम्बाब्वेमध्ये लष्करी राजवट 
१५ नोव्हेंबर २०१७ रोजी देशातील चिघळलेल्या राजकीय आणि हिंसक परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी झिम्बाब्वेच्या लष्कराने मुगाबे सरकारला आपल्या ताब्यात घेत देशाचा कारभार सांभाळलेला आहे.

देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या राज्यात बर्‍याच काळापासून राजकीय वाद उसळलेला आहे, त्यामुळे हिंसक घटनांना सुरुवात झालेली होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.

झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेमधील सर्व बाजूने भूमीने वेढलेला देश आहे. हरारे शहर ही या देशाची राजधानी आहे



जिनेव्हामध्ये सर्वात मोठ्या हिर्‍याचा $33.8 दशलक्षने विक्रमी लिलाव
१४ नोव्हेंबर २०१७ रोजी स्वीत्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये या १६३.४१ कॅरट वजनाच्या सर्वात मोठ्या हिर्‍याच्या लिलावात यावर सर्वाधिक ३३.५ दशलक्ष स्विस फ्रँक ($33.8 दशलक्ष) इतकी विक्रमी बोली लागली.

ही बोली ‘डी’ कलर हिर्‍यासाठी बोलल्या गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व बोलींमध्ये सर्वाधिक आहे. ‘डी’ हा हिर्‍यांच्या सर्वोच्च रंगासंबंधी वर्ग आहे, जो हे दर्शवितो की हा दगड पूर्णपणे रंगहीन आहे आणि अत्यंत दुर्मिळ आहे.

हा हिरा फेब्रुवारी २०१६ मध्ये अंगोलामधील लुलो खानित आढळलेल्या ४०४ कॅरेटच्या दगडापासून तयार केला गेला आहे



नेपाळ आणि चीन यांच्यात पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्पासाठी करार
नेपाळ वीज प्राधिकरणाने (NEA) ७५० मेगावॅट क्षमतेचा पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी चायना थ्री जोर्जेस कॉर्पोरेशन या चीनी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम तयार करण्यासंबंधी करार केला आहे.

प्रकल्पाला अंदाजे $1.8 अब्जचा खर्च येणार आहे. यासाठी तयार करण्यात येणार्‍या संयुक्त उपक्रमात CTGC चा ७५% हिस्सा असेल आणि उर्वरित २५% NEA चा असणार.


पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्प हा नेपाळमधील सर्वात मोठ्या जलसाठा आधारित जलविद्युत प्रकल्पांपैकी एक असेल.