चालू घडामोडी २० जानेवारी २०१८

चालू घडामोडी २० जानेवारी २०१८

महाराष्ट्र सर्वंकष आर्थिक विकासात देशात अव्वल 
सर्वंकष आर्थिक विकासात देशात अग्रेसर राज्याचा मान महाराष्ट्राने मिळविला आहे. ‘ग्रोथ इनोव्हेशन लीडरशिप इंडेक्‍स फॉर इकॉनॉमिक डेव्हपलमेंट इन इंडिया’ याबाबत ‘फ्रोस्ट सॉलिव्हॅन’ या जागतिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.


देशातील २९ राज्यांचे १०० निर्देशकांच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले. ‘फ्रोस्ट सॉलिव्हॅन’ संस्थेचे जागतिक अध्यक्ष अरूप झुत्शी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.

या संशोधनाच्या माध्यमातून देशातील २९ राज्यांचा आर्थिक विकास या संबंधी संशोधन करण्यात आले. त्यासाठी प्रमुख दहा मापदंडाच्या आधारे संशोधन करण्यात आले आहे. 

त्यात संगणकीकरण, आर्थिक समृद्धी, शैक्षणिक कौशल्य, प्रशासनातील परिणामकारकता, गुंतवणूक क्षमता, महिला सबलीकरण, पायाभूत विकास, रोजगार कार्यक्षमता, आरोग्य सुधारणा आणि दळणवळणाच्या सुविधा या निकषांच्या आधारे अभ्यास करून एकूणच सर्वंकष आर्थिक विकासात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.



नौदलाच्या महिलांनी पार केला समुद्रातील ड्रेक पॅसेज 
समुद्रमार्गाने जगाची सफर करत असलेल्या भारतीय नौदलातील महिलांची INSV ‘तारिणी’ केपहॉर्नला पोहोचली असून भारताचा झेंडा तेथे फडकावला आहे. 

नाविका सागर परिक्रमा या साहसी मोहिमेतील महिलांचे अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएनएसव्ही तारिणी या देशी बनावटीच्या बोटीतून भारतीय नौदलातील सहा महिला या साहसी मोहिमेवर मार्गस्थ झाल्या होत्या.

या प्रवासादरम्यान समुद्रातील कठीण समजला जाणारा मार्ग ‘ड्रेक पॅसेज’ त्यांनी यशस्वीरित्या पार केला. फॉकलँड बेटावरील पोर्ट स्टॅन्लेच्या दिशेने पुढे जाताना त्यांनी तिरंगा फडकावला. 

एकूण १६५ दिवसांच्या या प्रवासाचा पहिला टप्पा फ्रेमँटल (ऑस्ट्रेलिया) होता. त्यानंतर लिटलटन (न्यूझीलँड) हा दुसरा टप्पा त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये गाठला. आता पोर्ट स्टॅन्लेनंतर ते केप टाऊनच्या दिशेने रवाना होणार आहेत. 

नाविक सागर परिक्रमा या मोहिमेचे सारथ्य लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करीत आहेत. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जागतिक मंचावर ‘नारीशक्ती’चे दर्शन घडविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.



‘अग्नी-५’ लक्ष्यवेधी क्षेपणास्त्राची पाचवी उड्डाण चाचणी यशस्वी
भारताने ‘अग्नी-५’ या आंतरखंडीय लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र (ICBM) ची पाचवी चाचणी यशस्वीपणे घेतली. ओडिशाच्या अब्दुल कलाम सागरी बेट (व्हिलर बेट) वरून ही चाचणी घेतली गेली.

भारताचे स्वदेशी ‘अग्नी-५’ हे आण्विक युद्धसामुग्री वाहून नेण्यासाठी सक्षम आहे आणि लांब अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेणाची क्षमता ठेवते. 

या क्षेपणास्त्राचा विकास संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून (DRDO) २००७ सालापासून केला जात आहे. हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि २ मीटर रुंद असून त्याचे वजन ५० टन एवढे आहे.



प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीमध्ये प्रथमच रुद्र हेलिकॉप्टर भाग घेणार
भारतात निर्मित ‘रुद्र’ हेलीकॉप्टर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर होणार्‍या कवायतीमध्ये भाग घेणार आहे.

यावर्षी प्रथमच ‘रूद्र’ हेलीकॉप्टर २६ जानेवारीच्या कवायतीमध्ये सहभाग घेणार आहे. कवायतीत भारतीय वायुदलाच्या फ्लायपास्टमध्ये ३८ विमान असतल, ज्यामध्ये २१ लढाऊ विमान, १२ हेलीकॉप्टर आणि ५ ट्रांसपोर्टर असतील.

‘रूद्र’ हेलीकॉप्टर हा भारतात निर्मित एक उत्कृष्ट हल्लेखोर हेलीकॉप्टर मानला जातो. यामध्ये बसविलेले कॅमेरे कोणत्याही स्थितीत नजर ठेवू शकतात. 

हे 20MM टारगेट बंदूक, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र यांनी सुसज्जीत आहे. हवेतच क्षेपणास्त्र रोखू शकणारे हे दोन चालकाचे हेलीकॉप्टर आहे.


एप्रिल २०१८ मध्ये तामिळनाडूत देशातले प्रथम संरक्षण प्रदर्शन भरणार
एप्रिल २०१८ मध्ये तमिळनाडूत पहिले वार्षिक संरक्षण प्रदर्शन (Defence Expo) भरवले जाणार आहे. 

हे प्रदर्शन ११ ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीत भरणार आहे. यात जवळपास ८० देश भाग घेण्याची अपेक्षा आहे.

आज राष्ट्रीय पातळीवर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सुमारे १५०० कंपन्या कार्यरत आहेत आणि आतापर्यंत ७१२ तंत्रज्ञानाचे हस्तांतरण झाले आहेत.



FIFA क्रमवारीत भारत १०२ व्या स्थानी
नविनतम FIFA च्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघाने तीनने उडी घेत प्रथमच १०२ क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे.

भारत आशियाई देशांमध्ये १४ व्या क्रमांकावर आहे. आशियाई देशांमध्ये इराण संघाचा प्रथम क्रमांक असून जागतिक क्रमवारीत ३४ व्या स्थानी आहे.

जागतिक क्रमवारीत प्रथम १४ आपल्या जागेवर कायम आहेत. क्रमवारीत जर्मनी प्रथम स्थानी आहे आणि त्यानंतर अनुक्रमे ब्राझील, पोर्तुगाल, अर्जेंटिना आणि बेल्जियम यांचा क्रमांक लागतो. 

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल असोसिएशन (FIFA) हा एक खाजगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रीडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो.  

FIFA फुटबॉलच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संघटनासाठी, विशेषत: विश्वचषक (१९३० सालापासून सुरू झालेले) आणि महिला विश्वचषक (१९९१ सालापासून सुरू झालेले) यांसाठी जबाबदार आहे. 

१९०४ साली FIFA ची स्थापना करण्यात आली. याचे झुरिच (स्वीत्झर्लंड) येथे मुख्यालय आहे आणि त्याच्या सदस्यत्वामध्ये आता २११ राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.



मागील तीन वर्ष सर्वाधिक उष्ण होते: WMO
जागतिक हवामानशास्त्र संघटनेने (WMO) पाच प्रमुख आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांकडून मिळवलेल्या एकत्रित माहितीवरून असे निर्देशनास आले की, वर्ष २०१५, वर्ष २०१६ आणि वर्ष २०१७ हे तीन सर्वाधिक उष्ण नोंदवले गेले.

एल निनोच्या तापमानवाढीचा परिणाम म्हणून यामध्येही वर्ष २०१६ हा सर्वात उष्ण वर्ष नोंदवला गेला आहे. तर वर्ष २०१७ हा एल निनो नसलेला सर्वात उष्ण वर्ष होता. गेल्यावर्षी जागतिक पातळीवरील सरासरी तापमान १.१ अंश सेल्सियस (१.९८ डिग्री फेरनाइट) होते, जे पूर्व-औद्योगिक पातळीच्या वर होते.

यासोबतच हवामान आणि हवामानासंबंधी आपत्तीचा जोर वाढलेला आहे, ज्यात गेल्या वर्षी अमेरिकेत आपत्तीची विक्रमी पातळी गाठली होती. चक्रीवादळे, पूर आणि दुष्काळ यांच्यामुळे अनेक देश उध्वस्त झालेत.

जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक आंतर-शासकीय संघटना आहे, ज्याचे जगभरात १९१ सदस्य देश आहेत. १८७३ साली ‘आंतरराष्ट्रीय हवामान संघटना’ या नावाने संस्था कार्यरत झाली. 

पुढे तिला १९५० साली WMO ने पुनर्स्थित करण्यात आले. WMO चे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.
Scroll to Top