महाराष्ट्रातील महिलांचा फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरव 
विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १६ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील ११२ महिलांची निवड ‘फर्स्ट लेडी’ पुरस्कारासाठी करण्यात आली होती. 
सन्मानपत्र हे पुरस्काराचे स्वरूप होते.

भारतात सर्वप्रथम प्रवासी रेल्वे चालविण्याचा विक्रम 
करणाऱ्या सातारा येथील सुरेखा यादव यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यांनी १९८८ मध्ये रेल्वेची पहिली ‘महिला स्पेशल’ लोकल ट्रेन चालवून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. 

८ मार्च २०११ ला त्यांनी ‘डेक्कन क्वीन’ ही पुणे ते मुंबई (सीएसटी) या कठीण मार्गावरील रेल्वे चालवून असा विक्रम करणारी आशियातील पहिली महिला रेल्वेचालक बनण्याचा मान मिळविला.

देशातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक परभणी जिल्ह्यातील शीला डावरे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत त्यांनी १९८८ मध्ये सर्वप्रथम ऑटोरिक्षा चालविला. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. त्यांनी सतत १३ वर्ष ऑटोरिक्षा चालविला, त्यानंतर महिला ऑटोरिक्षा चालकांसाठी अकादमी सुरू केली. 

भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार पद्मश्री डायना एडलजी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७५ ते १९९५ पर्यंत त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करून महिला क्रिकेटला नवी दिशा दिली. महिला जागतिक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भारताचे दोन वेळा नेतृत्व केले. 

भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ पुण्याच्या अरुणा राजे पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. १९६९
 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीत प्रवेश करणार्या अरुणा राजे पाटील यांनी पटकथाकार, संपादक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

डॉ. चंद्रानी प्रसाद वर्मा या पहिल्या खाण अभियंता आहेत. 

डॉ. स्वाती पिरामल या प्रथम महिला आहेत ज्या असोचेम या संघटनेच्या अध्यक्षा झाल्या.त्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण सेवामध्ये आमूलाग्र बदल व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्या देशातील आघाडीच्या उद्योजक म्हणून गणल्या जातात.

उपासना मकाती यांनी दृष्टिहीनांसासाठी ब्रेललिपीमध्ये देशातील पहिले इंग्रजीमध्ये ‘व्हाईट प्रिंट’ नावाचे मासिक २०१३ पासून प्रकाशित केले आहे. त्यांचे हे मासिक शाळा, महाविद्यालय, वृद्धाश्रम, रुग्णालय, ग्रंथालयात ठेवले जाते. २०१६ च्या फोर्ब्सच्या यादीत स्मार्ट सीईओ म्हणून पहिल्या ३० मध्ये त्यांचे नाव नोंदविले होते.

देशातील पहिली सॅनिटरी पॅडची बँक सुरू 
करणाऱ्या आमदार म्हणून वर्सोवा, मुंबई येथील विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशीन स्थापित केल्या. त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधासह महिलांच्या आरोग्य, शिक्षणासाठी महत्त्वाचे कार्य केले.

रजनी पंडित या देशातील पहिल्या नोंदणीकृत खासगी लोकप्रिय गुप्तहेर आहेत. पंडित यांनी आतापर्यंत ७५००० पेक्षा अधिक केसेस सोडविल्या आहेत. त्यांनी या विषयावर डॉक्युमेंट्री तयार केलेली आहे.

डॉ. इंदिरा हिंदुजा या प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत ज्यांनी पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती केली आहे. १९८९ मध्ये त्यांनी आयव्हीएफ सेंटरची स्थापना केली आहे. सध्या त्या पी.डी. हिंदुजा राष्ट्रीय रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्रात कार्यरत आहेत.

जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू मुंबई येथील पद्मश्री भाग्यश्री ठिपसे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी पाच वेळा बुद्धिबळात राष्ट्रीय चॅम्पियनशीपचा खिताब मिळविला आहे. त्या १९९१ मध्ये महिला आशियाई बुध्दिबळाच्या मानकरी ठरल्या. १९९९ च्या राष्ट्रकुल देशांच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण तर तीन वेळा रजत पदकावर मोहर उमटविली आहे.

पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन 
करणाऱ्या मुंबई येथील स्नेहा कामत यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिलांसाठी वाहन चालनाचे प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या स्नेहा कामथ यांनी शी कॅन ड्रॉईव्ह हा उपक्रम सुरू केला आहे.

डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योद्ध्यांचा परिचय करून देणारी पहिली तरुणी मुंबईची १८ वर्षीय तारा आनंद.

भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबलावादक डॉ.अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला. आज दुर्गाबाई कामत यांच्यावतीने हा पुरस्कार वृषाली गोखले यांनी तर डॉ. अबन मिस्त्री यांच्या वतीने जामिनी जवेरी यांनी स्वीकारला.


६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी
बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे ६३ वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला. 

या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. 

तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. 

या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु 

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार 

सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज) 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी) 

सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन) 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार) 

सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान) 

सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन) 

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा – सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना – बद्रीनाथ की दुल्हनिया) 

सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा – सिनेमा जग्गा जासूसआनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या नव्या राज्यपाल
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्यप्रदेशच्या राज्यपाल पदाचा कार्यभार देण्यासाठी नामांकन देण्यात आले आहे.
पटेल यांची ही नियुक्ती गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्याजागी करण्यात येत आहे. कोहली यांच्याकडे मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार होता.

७६ वर्षीय आनंदीबेन पटेल १९८७ साली भारतीय जनता पक्षात (भाजप) समावेश केला आणि १९९४ साली त्यांची राज्यसभेत निवड झाली. त्या १९९१ साली मंडल (बेचराजी जिल्हा) मतदारसंघातून पहिल्यांदा राज्य विधानसभेवर निवडून आल्या. 

त्यानंतर २००७ साली उत्तर गुजरातच्या पाटण आणि २०१२ साली अहमदाबाद शहरातील घाटलोडिया मतदारसंघातून जिंकून आल्या. त्या गुजरातच्या प्रथम महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.अमेरिकेवर आर्थिक संकट, सरकार ‘शटडाऊन’
अमेरिका देशावर आर्थिक संकट आले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या वर्षपूर्तीच्या वेळीच सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे. सरकारी खर्चांसाठी आवश्यक असलेल्या एका महत्त्वाच्या विधेयकाला खासदारांची मंजुरी 
मिळू शकली नाही. त्याचमुळे शटडाऊन करावे लागले.

‘शटडाऊन’ झाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत तसेच लाखो कर्मचाऱ्यांची नोकरीही जाणार आहे त्यांना घरी बसावे लागणार आहे. 

अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू आहे. त्यामुळे निधीची कमतरता असल्यास सरकारी यंत्रणांना त्यांचे कामकाज थांबवावे लागते. 

निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे ‘स्टॉप गॅप बिल’ आणले जाते. हे डील अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाने आणि सिनेट सदस्यांनी मंजूर करावे लागते.