मुंबईत ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ उभारण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ या वास्तुचे उद्घाटन करण्यात आले. संग्रहालय दक्षिण मुंबईच्या चित्रपट विभाग संकुल येथे उभारण्यात आले आहे आणि हे संग्रहालय ऐतिहासिक काळातले गुलशन महाल आणि आणखी एक नवी इमारत अश्या दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे.


या संग्रहालयात भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. शतकापासून चित्रपटसृष्टीच्या उत्क्रांतीला छायाचित्र, ध्वनिफिती, फिल्म क्लिपींग, कलात्मक वस्तू, यंत्रसामुग्री व उपकरणे, प्रसिद्धीची सामुग्री, परस्परसंवादी प्रदर्शन अश्या विविध बाबींचे दर्शन येथे घडविण्यात आले आहे.

देशात चित्रीकरण करण्यासाठी सर्व प्रकारची परवानगी घेण्यासाठी येथे एकल खिडकीची सुविधा तयार करण्यात आली आहे. तसेच चित्रपटांची चाचेगिरी टाळण्यासाठी सिनेमासंबंधी कायद्यात बदल करण्यासाठी येथे कार्य चालणार आहे.

शिवाय याप्रसंगी, ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ तर्फे सर्व उद्योगांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी दाव्होस परिषदेप्रमाणेच जागतिक सिनेमा शिखर परिषद भरविण्यात आली.तामिळनाडू राज्यात संरक्षण क्षेत्राच्या उत्पादनासाठी देशाची दुसरी औद्योगिक मार्गिका
19 जानेवारी 2019 रोजी तिरुचिराप्पल्ली येथे भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते ‘तामिळनाडू संरक्षण औद्योगिक मार्गिका’ (Tamil Nadu Defence Industrial Corridor) याचे औपचारिकपणे उद्घाटन करण्यात आले आहे.

याप्रसंगी, संरक्षण क्षेत्राशी संबंधित तीन सामंजस्य करार देखील केले गेले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘कोयंबटूर संरक्षण नवकल्पना समूह केंद्र’ याचे उद्घाटन करण्यात आले.

उत्तरप्रदेशाच्या अलीगढ येथे देशाची पहिली संरक्षण औद्योगिक मार्गिका उभारण्यात आली. त्यानंतरची ही संरक्षण क्षेत्रातली दुसरी औद्योगिक मार्गिका आहे. या संपूर्ण प्रकल्पामध्ये त्रिची, सालेम, होसूर, कोवाई, मदुराई आणि चेन्नई असे सहा केंद्र आहेत. या सहा शहरांमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे स्वदेशी उत्पादन घेण्यासाठी विविध उद्योग उभारले जाणार आहेत.


सी. एन. आर. राव यांना पहिला-वहिला ‘पदार्थ संशोधनासाठीचा शेख सौद आंतरराष्ट्रीय पारितोषिक’ जाहीर
भारताचे नामांकित शास्त्रज्ञ भारतरत्न सी. एन. आर. राव यांची पहिला-वहिला ‘पदार्थ संशोधनासाठीचा शेख सौद आंतरराष्ट्रीय पारितोषिक’ (Sheikh Saud International Prize for Materials Research) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

यावर्षीपासून संयुक्त अरब अमिरात या आखाती देशाच्या सेंटर फॉर ऍडवान्सड मटेरियल या संशोधन संस्थेकडून हा पुरस्कार दिला जात आहे. एक लक्ष डॉलर एवढी रोख रक्कम, एक पदक आणि चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी रास अल खैमान (UAE) येथे आयोजित ‘इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन अॅडव्हान्स्ड मटेरियल्स’ या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.अँड्री राजोलीना:मादागास्करचे नवे राष्ट्रपती
19 जानेवारी 2019 रोजी अँड्री राजोलीना यांनी मेडागास्कर या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

स्वातंत्र्यानंतर आफ्रिकेमधील या देशाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा निवडलेल्या दोन राष्ट्रपतींदरम्यान लोकशाही सत्तेचे हस्तांतरण झाले आणि शांततेने पदाची जबाबदारी दुसर्‍याला सोपविण्यात आली.NROL-71: अमेरिकेचा अत्याधुनिक गुप्तचर उपग्रह
19 जानेवारी 2019 रोजी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेनी “NROL-71” या नावाचा नवा गुप्तचर उपग्रह अवकाशात पाठवला.

‘युनायटेड लॉन्च अलायन्स (ULA) डेल्टा IV हेवी रॉकेट’ या अग्निबाणाच्या सहाय्याने हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवला गेला. हा उपग्रह ‘यू.एस. नॅशनल रिकोनिसन्स ऑफिस’द्वारे संचालित केला जाणार आहे आणि याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.फेलिक्स ताशीसेकदी: काँगो देशाचे नवे राष्ट्रपती
काँगो देशाच्या घटनात्मक न्यायालयाने फेलिक्स ताशीसेकदी यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत बहुमताने निवडून येणारे राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे आणि निवडणूकीत त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या मार्टिन फायुलू यांची याचिका फेटाळून लावली.

आफ्रिकन यूनियन या आंतरराष्ट्रीय संस्थेनी निवडणूकीच्या निकालाविषयी गंभीर शंका व्यक्त केल्या होत्या आणि त्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील नेमले होते. मात्र देशाच्या घटनात्मक न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळून लावली.